ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आठवड्यात होतील केस घनदाट, असे वापरा राईचे तेल

आठवड्यात होतील केस घनदाट, असे वापरा राईचे तेल

तुमच्या केसांची वाढ चांगली आहे पण प्रदूषण आणि इतर गोष्टींमुळे केस निस्तेज आणि पातळी झाले आहेत असं वाटतंय का? अर्थात नक्कीच तुम्ही या सगळ्यात आनंदी नसणार. त्यामुळे तुमचं दुःख आम्ही नक्कीच समजून घेऊ शकतो. प्रत्येक मुलीला आपले केस अत्यंत सुंदर असावेत असं वाटतं. सुंदरपेक्षाही केस घनदाट असणं कोणला नाही आवडणार. पण जेव्हा केस गळू लागतात आणि पातळ होऊ लागतात तेव्हा त्याचं दुःख हे वेगळंच असतं. कंगव्यात अडकलेले केस, हातात येणारे गळलेले केस नक्कीच तुम्हाला त्रासदायक ठरते. यामागे अनेक कारणे असू शकतात. आरोग्यसंबंधातील त्रास, खराब जीवनशैली, हार्मोनल असंतुलन अथवा केसांची काळजी न घेणे काहीही कारण असेल, पण तुम्ही आता जास्त काळजी करू नका. तुमचे केस आठवड्यातही घनदाट होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही राईच्या तेलाचा वापर करा. आता याचा नक्की कसा घरगुती वापर करायचा आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगत आहोत. तुम्हीही याचा वापर करून पाहा. 

सर्वात प्रभावी आजीचा बटवा

सर्वात प्रभावी आजीचा बटवा

Freepik

केसांना घनदाट बनविण्यासाठी बाजारामध्ये तुम्हाला अनेक उत्पादने खुणावतात. यामध्ये अगदी शँपूपासून ते कंडिशनर आणि हेअर ऑईलपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. पण आजीचा बटवा हा सर्वात सुंदर उपाय आहे. अगदी पुरातन काळापासून चालत आलेले नुस्खे तुम्हाला कामी येतात. इतकंच नाही तर याचा वापर करणे अत्यंत सुरक्षित आहे. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. खरं तर हे उपाय अनेक घरगुती गोष्टींवर आधारित आहेत. घनदाट केस करण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची गरज भासते – 

ADVERTISEMENT
  • 500 ग्रॅम अर्थात अर्धा लिटर राईचे तेल
  • 1 कप मेथीचे दाणे 
  • एक मूठ कडीपत्ता 
  • टी ट्री ऑईल

बनविण्याची पद्धत

  • सर्वात पहिले लोखंडाच्या कढईत तेल गरम करायला ठेवा 
  • तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात मेथीचे दाणे घाला. मेथीचे दाणे थोडे गोल्डन दिसू लागल्यावर त्यात कडिपत्ता टाका आणि मग अत्यंत मंद आचेवर हे भाजा 
  • हे तेल साधारण तुम्ही 15 मिनिट्स गरम होऊ द्या. मेथीचे दाणे गडद रंगाचे झाले की गॅस बंद करा 
  • नंतर तेल थंड होऊ द्या आणि मग गाळून एखाद्या बाटलीत भरून ठेवा 
  • बाटलीत भरल्यानंतर टी ट्री ऑईल त्यात मिक्स करा आणि मग व्यवस्थित बाटली हलवून मिक्स करून घ्या 
  • एक दिवस पूर्ण तसंच ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशीपासून याचा उपयोग करा. केसांवरून आंघोळ करण्याआधी एक तास तुम्ही हे तेल लावा आणि केसांना मस्त मसाज करा. आठवड्याभरात तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल

 

अनेक समस्यांचे एकच समाधान

अनेक समस्यांचे एकच समाधान

Freepik

  • हे तेल तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांना लावा आणि मसाज करा. तुम्ही असं करू शकत नसाल तर शँपू करण्याच्या आधी किमान एक तास केसांना तेल लावा आणि मग आंघोळ करा
  • आपल्या केसांच्या मुळाशी बोटाच्या सहाय्याने हलकी मालिश करा आणि तेल केसांमध्ये मुरवा 
  • हे तेल तुमच्या केसांना घनदाट करण्यास मदत करते. त्याशिवाय केसगळती थांबविण्यास आणि केसांची दुरूस्ती करण्यासही मदत करते 
  • यामध्ये असणारे टी ट्री ऑईल केसांमध्ये येणारी खाजेची समस्या आणि कोंडा संपुष्टात आणण्याचे काम करते. कारण टी ट्री ऑईलमध्ये अँटिफंगल असते जे कोंड्यापासून सुटका मिळवून देते 

 

ADVERTISEMENT

किती वेळा लावावे

  • आठवड्यात तुम्हाला या तेलाचा परिणाम हवा असेल तर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावा आणि मसाज करा. दुसऱ्या दिवशी सकाळी शँपूने लावा आणि केसांवरील तेल काढा 
  • केसांना मालिश करताना केवळ मुळाशी नाही तर अगदी केसांच्या टोकांनाही तेल लावा 
  • शँपू करताना काळजी घ्या की हा शँपू माईल्ड असावा. अर्थात सल्फेट फ्री शँपूचा वापर करा. यासाठी तुम्ही हर्बल शँपूचा वापरही करू शकता

 

केसांना नुकसान पोहचत नाही

रोज केसांवरून आंघोळ करणे शक्य नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आठवड्यातून पाच दिवस याचा वापर करा. तुम्ही या तेलाचा उपयोग पाच दिवस अर्थात एक दिवस आडदेखील करू शकता. तुम्हाला चांगला परिणाम हवा असेल तर किमान 3-4 वेळा आठवड्यातून याचा उपयोग करायलाच हवा. यामुळे केसांना कोणतेही नुकसान पोहचत नाही आणि केस घनदाट होण्यास नक्की मदत मिळते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT