ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
benefits of almond peel

भिजवलेले बदाम सोलून साले फेकून देऊ नका,आहेत त्वचेसाठी फायदेशीर

शतकानुशतके, जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात बदाम सोलून खाण्याची प्रथा आहे. यामुळे बुद्धी तर तीक्ष्ण होतेच, पण त्वचेला पूर्ण पोषणही मिळते. पण तुम्हांला माहीत नसेल की कचरा समजल्या जाणाऱ्या बदामाच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. तुम्हाला हे वाचून थोडं विचित्र वाटत असेल, पण हे खरं आहे की बदाम आणि अक्रोडाच्या सालीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे आपले आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी खूप चांगले असतात. बदामाच्या सालींचा काही प्रकारे पुनर्वापर केल्याने तुमची त्वचा आणि केसांची समस्या बर्‍याच प्रमाणात सुटू शकते. आज आम्ही तुम्हाला स्किनकेअरमध्ये बदामाची साल कशी वापरायची ते सांगणार आहोत.

त्वचा करा एक्सफोलिएट 

तुम्ही बदामाच्या सालीने त्वचा एक्सफोलिएट करू शकता. यासाठी 10 ते 12 बदामाची साले घेऊन तीन चमचे दुधात मिसळा. त्यात  थोडे पाणीही टाका. तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन तुम्ही त्यात दही देखील वापरू शकता. हे सगळे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता तयार केलेली पेस्ट भांड्यात काढून घ्या आणि नंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर आणि हातांवर मसाज करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे मिश्रण बॉडी स्क्रब म्हणूनही वापरू शकता. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होईल.

Benefits of Almond Peel
Benefits of Almond Peel

बॉडी वॉश म्हणून वापरा 

बदामाच्या सालीपासून बनवलेले बॉडी वॉश त्वचेचे वृद्धत्वाच्या लक्षणांपासून संरक्षण करते. ते एक उत्तम मॉइश्चरायझर देखील आहे त्यामुळे ते त्वचा मऊ ठेवण्याचे काम करते. यासाठी बदामाच्या सालीमध्ये २ चमचे दूध, थोडी हळद आणि गुलाबपाणी घालून पेस्ट करा. तुम्हाला हवे असल्यास, त्यात मध देखील घालू शकता. अंघोळ करण्यापूर्वी ही पेस्ट अंगावर लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका.

बदाम स्क्रब

बदामाप्रमाणेच त्याची सालेही तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. फक्त १ कप बदामाची साले उन्हात वाळवा, एक कप रोल्ड ओट्स, एक कप बेसन, कप कॉफी हे सगळे एकत्र बारीक करा. याचे मिश्रण बनवा, त्यात दही मिसळा आणि डागरहित त्वचेसाठी हे स्क्रब वापरा. 

ADVERTISEMENT

केसांसाठी हेअर पॅक

केस मऊ करण्यासाठी बदामाच्या सालींचा हेअर पॅक लावा. हा सुलभ हेअर मास्क बनवण्यासाठी अर्धा कप बदामाची साले घ्या, त्यात एक अंडे, एक टेबलस्पून खोबरेल तेल, दोन टेबलस्पून एलोवेरा जेल आणि मध घाला. हे मिश्रण चाळणीतील वापर करून गाळून घ्या आणि केसांवर लावा. हे हेअर स्पासारखे काम करेल कारण त्यात व्हिटॅमिन ईचे चांगले गुण आहेत.

बदामाच्या साली टाकून नाईट क्रीम बनवा

तुम्ही बदामाच्या सालीपासून नाईट क्रिम देखील बनवू शकता, ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या, फाईन लाईन्स ,काळी वर्तुळे इत्यादी दूर होतील आणि त्वचेच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत होईल. बदामाच्या सालींना ब्लेंडरमध्ये बारीक करून पावडर बनवा. आता एलोवेरा जेल, क्रीम, ऑलिव्ह ऑईल आणि ही पावडर नीट मिक्स करा आणि एका छोट्या डब्यात ठेवा. ही पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुवा आणि नंतर कोरडा करा आणि हे क्रीम लावा.

Benefits of Almond Peel
Benefits of Almond Peel

लाडू बनवून खा

ब्युटी हॅक्स व्यतिरिक्त तुम्ही बदामाच्या सालीचे लाडू बनवून देखील खाऊ शकता. हे लाडू खूप पौष्टिक आहेत. हा साधा लाडू बनवण्यासाठी ब्लेंडर घ्या आणि त्यात १ कप बदामाची साले, एक वाटी अळशीच्या बिया, १ वाटी खोबरं आणि गूळ घाला. हे सगळं बारीक वाटून घ्या आणि त्यात गरम तूप/दुधात मिसळा. छोटे छोटे लाडू करून खा.

बदामाच्या सालीचा असा वापर करा.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

25 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT