गरम गरम भाकरी आणि पिठलं म्हटलं की आपोआपच तोंडाला पाणी सुटतं. आपल्याकडे महाराष्ट्रात तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी अशा अनेक धान्यांच्या भाकऱ्या केल्या जातात. पण महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात येते. ग्रामीण भागांमध्ये बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. खरं तर बाजारी खाण्याचे फायदे अनेक आहेत. यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात. केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर भारतामध्ये अनेक ठिकाणी बाजरीची भाकरी अगदी चवीने खाल्ली जाते. विशेषतः म्हाताऱ्या व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी ही अधिक शक्तीवर्धक आणि पोषक समजण्यात येते. बाजरी ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरते. बाजरी खाण्याचे फायदे नक्की काय आहेत हे आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
बाजरीचे पोषक तत्व (Nutritional Value Of Bajari)
बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक घटक मानले जातात. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी ही पोषक तत्व शरीराला आवश्यक असतात. विशेषतः हिवाळ्यात बाजरी खाण्याला जास्त महत्व आहे. अंगामध्ये उष्णता निर्माण करण्याचे काम बाजरी करते. यामुळे शरीराला आवश्यक असणाारी ऊर्जा मिळते आणि दिवसभर काम करण्यासाठी उत्साह राहतो. शेतकरी वर्गाला अशा भाकरीची जास्त गरज भासते. दिवसभर शेतात राबण्यासाठी लागणारी ऊर्जा या बाजरीतून मिळते. त्यामुळे कष्टकरी अशा व्यक्तींसाठी बाजरी अत्यंत उपयुक्त ठरते. बाजरीमध्ये पोळीपेक्षा कॅलरीही कमी असल्याने वजन वाढत नाही. गव्हाची पोळीही आरोग्याला चांगलीच असते. पण बाजरी (Bajra grain) ही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. बाजरीच्या दाण्यामध्ये अठरा टक्क्यापर्यंत आर्द्रता अर्थात ओलावा असतो. कर्बोदके 25 टक्के, फायबर 17 टक्के, प्रथिने 22 टक्के, कॅलरी, विटामिन बी6, कॅल्शियम, लोह याचे प्रमाण असते. बाजरीमधील घटकांमुळे शरीरातील स्निग्ध पदार्थांचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते. बाजरी खाण्याचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया.
बाजरी खाण्याचे फायदे (Benefits Of Bajari In Marathi)
बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच नाही तर अगदी सध्या असलेल्या कोरोनावरही बाजरी उपयुक्त ठरते. प्रतिकारशक्ती वाढते. बाजरी खाण्याचे फायदे अधिक काय आहेत ते पाहूया.
कोलेस्ट्रॉलवर आणते नियंत्रण (Cholesterol Control)
बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार राखण्यास मदत करते. बाजरीची भाकरी, तूप आणि गुळाचा खडा हे ग्रामीण भागातील नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ आहेत. हिवाळ्याच्या दिवसात शरीराला अधिक उष्णतेची गरज असते आणि त्यामुळे याचा चांगला परिणाम होते. शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मिळतो. बाजरीची भाकरी हा त्यांचा प्रमुख आहार असते. बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.
बद्धकोष्ठतेवर परिणामकारक (Piles)
बाजरीमध्ये असे काही तंतू आढळतात ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते. पण काही लोकांना बाजरी खाल्ल्याने मलावरोध होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे असा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाजरी खावी. बद्धकोष्ठतेचा त्रास हा बऱ्याच जणांना असतो. बाजरी पचण्यास थोडी कठीण असल्याने तुम्ही आहारात याचा समावेश करून घ्यावा मात्र काळजीपूर्वक. पचनासाठी कठीण असली तरीही बद्धकोष्ठतेचा त्रास यामुळे टाळता येतो.
जळजळ थांबविण्यास उपयुक्त (To Avoid Acidity)
काही जणांना आम्लपित्त आणि जळजळीचा त्रास असतो. बाजरी खरं तर उष्ण असते. त्यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते असं काही जणांना वाटतं. उष्णतेच्या दिवसात याचं सेवन टाळा. पण थंडीत तुम्हाला जळजळ कमी करण्यासाठी नक्कीच बाजरीची उपयोग करून घेता येतो. मात्र प्रमाणात याचे सेवन करा. याबरोबर लोणी अथवा तूप नक्की खा.
शरीराच्या चांगल्या पोषणासाठी (Nutritional)
बाजरीची भाकरी ही तूप अथवा लोण्याचा गोळा आणि पालेभाजी यासाह नक्की खावी. तसंच त्यामध्ये पांढरे तीळ असतील तर अधिक उत्तम. ही भाकरी चवीला उत्तम असते आणि शरीरासाठी पौष्टिक असते. लहान मुलांनी आणि अगदी मोठ्या माणसांनीही बाजरीची भाकरी दुधात कुस्करून खाल्ली तर शरीराला अधिक चांगले पोषण मिळते आणि लहान मुलांची तब्बेतही सुधारते. तसंच म्हशीच्या दुधातून बाजरीची भाकरी खाल्ली तर पुरुषांचे वीर्य वाढण्यासही मदत मिळते.
हाडांना मिळते मजबूती (To Improve Bone Health)
बाजरीची भाकरी असेल तर पालेभाजी, कढी अथवा घट्ट ताक अतिशय चविष्ट लागते. याशिवाय बाजरीपासून तुम्हाला खिचडी, पातळ घाटा, उंडे हे पदार्थही बनवता येतात. बाजरीचे नियमित सेवन केल्याने हाडांना चांगली मजबूती मिळते आणि तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहता. विशेषतः थंडीच्या दिवसात तुम्ही बाजरी खायला हवी. बाजरी खाण्याचे फायदे अनेक आहेत. तसंच केवळ भाकरीच नाही तर बाजरीचे अनेक पदार्थ तुम्हाला घरच्या घरी तयार करता येतात. पण जेवणात याचा समावेश करून घेणे गरजेचे आहे.
बाळंतीण महिलांसाठीही उपयुक्त (For Pregnant Women)
बाळंतीण झालेल्या महिलांसाठी तर बाजरी हे धान्य वरदान आहे असंच म्हणावं लागेल. बाळासाठी दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. महिलांना भरपूर दूध येण्यासाठी आणि पोटातील वातामुळे येणाऱ्या कळा घालविण्यासाठी बाळ झालेल्या बाळंतिणींना बाजरी नक्कीच वरदान ठरते. जेवणात बाजरीची भाकरी आणि सकाळी उपाशीपोटी जर बाजरीच्या पिठाचा घाटा घेतला तर दूधही चांगल्या प्रमाणात येते. तसंच या दुधामुळे बाळ अधिक गुटगुटीत आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. बाळंत झाल्यानंतर शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा बाजरीतून मिळते. बाजरीच्या भाकरीचा जेवणात समावेश करून घेतल्यास बाळाला दुधाची कमतरता अजिबात भासणार नाही.
सर्दी खोकला टाळण्यासाठी (To Avoid Cough And Cold)
तुम्हाला सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच बाजरीचा आपल्या आहारात समावेश करून घ्या. सकाळी नाश्त्याला गूळ घालून बाजरीचा घाटा तयार करून तुम्ही नियमित प्यायल्यास ही समस्या दूर होते. कोरोना काळात (Corona) प्रतिकारशक्ती वाढविण्याची आणि उष्ण पदार्थ खाण्याची गरज आहे. त्यामुळे बाजरीचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल. बाजरी खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि उर्जा राहते आणि त्यामुळे कोरोनाचीही लागण होत नाही. सर्दी खोकला हे कोरोनाचे मूळ आहे. त्यामुळे नक्की बाजरीचे पदार्थ खा.
वजन कमी करण्यासाठी (Weight Loss)
तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर बाजरीची भाकरी आणि पालेभाजी याचा समावेश तुम्ही नियमितपणे तुमच्या जेवणात करून घ्यायला हवा. बाजरीसारखा दुसरा घटक तुम्हाला मिळणार नाही. बाजरीमुळे तुमचे वजन झटकन कमी होण्यास मदत मिळते. बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर पटकन भूक लागत नाही आणि तुमचे पोट भरलेले राहते. तसंच बाजरी तुमचे वजन नियंत्रित करण्यास मदत करते. तुम्हालाही जर वजन कमी करायचे असेल तर बाजरीची भाकरी तुम्ही नक्की खा. सध्या फास्ट फूड आणि अन्य पदार्थांचा मारा आपल्याकडे वाढत चालला आहे. पण असे पदार्थ लठ्ठपणाला आमंत्रण देतात. पण बाजरीच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा दूर होण्यास मदत मिळते.
बाजरीची भाकरी कशी बनवावी (How To Make Bajari Bhakri)
बाजरीची भाकरी बनवणे सोपे आहे. तुम्हाला तांदळाची उकड काढावी लागते. त्यासारखे कष्ट बाजरीची भाकरी करताना घ्यावे लागत नाहीत. बाजरीची भाकरी (Bajra Bhakri) बनवणे तितकेसे कठीण काम नाही. भाकरी शिकायची असेल तर तुम्ही ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
- पाणी कोमट करून घ्या
- एका परातीमध्ये बाजरीचे पीठ (bajra flour), तेल आणि मीठ घाला. तुम्हाला हवे तर तुम्ही पांढरे तीळही यामध्ये मिक्स करू शकता
- वरून कोमट पाणी घालत पीठ व्यवस्थित भिजवून घ्या. तेलाने मळून घ्या
- लहान गोळे करा आणि मग ते थापा
- थापल्यावर तव्यावर खरपूस भाजा आणि पुन्हा चिमट्याने ही भाकरी मंद आचेवर डायरेक्ट भाजून गरमागरम खायला द्या. त्यावर तूप आणि लोणी सोडल्यास, अधिक चविष्ट लागते.
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
कोणताही त्रास नसेल तर तुम्ही रोजच्या जेवणात नक्कीच बाजरीचा समावेश करून घेऊ शकता. पण तुम्हाला उष्ण पदार्थांचा त्रास असेल तर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा नक्कीच खाऊ शकता. अतिशयोक्ती मात्र करू नका.
गव्हापेक्षा बाजरीमध्ये कॅलरी कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही बाजरी फायदेशीर ठरते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, बाजरी गव्हापेक्षा नक्कीच चांगली आहे. पौष्टिक आणि चविष्टही आहे.
वजनवाढीमुळे ही पीसीओएसची समस्या निर्माण होते. बाजरीमुळे तुम्हाला वजन नियंत्रणात आणण्यास मदत मिळते आणि अर्थातच त्यामुळे पीसीओएसची समस्या दूर करण्यासाठीही याची मदत मिळते. तुम्हाला वजनावर नियंत्रण आणायचे असेल तर तुम्ही नक्कीच बाजरीचा उपयोग करून घेऊ शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक