काळे मीठ आपण जेवणामध्ये अथवा जेवणाचे पचन व्हावे म्हणून ताकात अथवा अन्य पेयांमध्येही वापरतो. पण या काळ्या मीठाचा उपयोग आपल्याला त्वचा आणि केसांसाठीदेखील करता येतो हे तुम्हाला माहीत आहे का? अगदी वेगवेगळ्या रायत्यापासून ते फ्रूट आणि सलाडपर्यंत स्वाद वाढवणारे हे काळे मीठ प्रत्येकाच्या घरात असते. पण तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या समस्या सोडविण्यासाठीही हे उपयुक्त ठरते. कदाचित तुम्हाला याचे जर अन्य उपयोग माहीत नसतील तर आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. केवळ पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठीच नाही तर आपली त्वचा आणि केस अधिक सुंदर दिसण्यासाठी आणि त्याची अधिक चांगली काळजी घेण्यासाठीही याचा उपयोग होतो. याचा कसा वापर करायचा असाही प्रश्न तुम्हाला पडेल. तर त्याचा वापर कसा करायचा याचीदेखील माहिती आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.
1. आंघोळीसाठीच्या पाण्यात घाला काळे मीठ
Shutterstock
आपण आंघोळीसाठी जातो तेव्हा आपल्या बाथटबमध्ये अथवा आपल्या बादलीमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये काळे मीठ घाला. तुमच्या पायांना भेगा पडल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी आणि तुमची डेड स्किन हटविण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. तसंच तुमच्या पायाला सूज आली असेल तर पाण्यात काळे मीठ टाकल्यावर ही समस्यादेखील दूर होते. काळ्या मिठामुळे पायांच्या भेगा लवकर बऱ्या होतात. यामध्ये असणारे गुण या भेगा भरून टाकण्यास मदत करतात.
2. त्वचेवरील पोअर्स करते साफ
Shutterstock
त्वचेवरील अर्थात चेहऱ्यावरील पोअर्सची समस्या ही प्रत्येकालाच असते. त्यासाठी अनेक ब्युटी पार्लरच्या फेऱ्याही माराव्या लागतात. पण तुम्ही घरच्या घरी काळ्या मिठाचा वापर करून सोप्या तऱ्हेने ही समस्या दूर करू शकता. फेसवॉशने आपण नेहमीच चेहरा स्वच्छ करत असतो. पोअर्सची समस्या असेल तर फेसवॉशमध्ये काळे मीठ मिक्स करा आणि मग हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे पोअर्स क्लीन होतील आणि पिंपल्स अर्थात मुरूमं आणि अॅक्नेसारखी समस्यादेखील तुमच्यापासून दूर राहील. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासही मदत मिळेल.
चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका – घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही
3. केसगळती थांबविण्यासाठी
Shutterstock
काळ्या मिठामध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स असतात. केसगळतीची तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही तेलामध्ये काळे मीठ मिक्स करा आणि त्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण तुम्ही तुमच्या स्काल्पला लावा. यामध्ये असलेले मिनरल्स तुमची केसगळती रोखण्यासाठी अर्थात थांबविण्यासाठी मदत करतात. इतर कोणत्याही बाजारातील तेलापेक्षा हा सोपा आणि रामबाण इलाज आहे.
तुम्हालाही सवय आहे का जेवताना कच्चं मीठ खाण्याची
4. कोंडा करा दूर
Shutterstock
हिवाळ्यात सर्वात जास्त कोंड्याची समस्या होते. पण तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल तर काळ्या मिठाचा वापर यासाठी योग्य आहे. काळं मीठ टॉमेटोच्या रसात अथवा लिंबाच्या रसात मिसळून केसांच्या मुळापासून हा रस लावा. त्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवून केस व्यवस्थित धुवा. तुम्हाला पहिल्या हेअरवॉशमध्येच परिणाम दिसून येईल. कोंडा कमी झालेला दिसून येईल. असाच आठवड्यातून दोन वेळा किमान प्रयोग केल्यास, तुमचा कोंडा नक्की निघून जाईल.
कोंडा असण्याची असतील 5 कारणं तर करा ‘हे’ सोपे उपाय
5. डोळ्यांखालील काळी वर्तुळं होतील दूर
Shutterstock
काळ्या मिठात मिनरल्स असतात जे डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालविण्यासाठी उपयोगी ठरतात. पाण्यात काळं मीठ घाला आणि त्यात कापूस बुडवा. हा भिजलेला कापूस डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर काही वेळ ठेवा. असं तुम्ही नियमित केल्यास, डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी होतील आणि चेहरादेखील फ्रेश दिसेल.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.