आजीबाईच्या बटव्यामधील एक महत्वाची अशी वनस्पती म्हणजे ‘ब्राम्ही’. या वनस्पतीची मुळ,पाने फायदेशीर असतात. ब्राम्हीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. ब्राम्हीचे उपयोग हा अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. याच्या वापरामुळे सुंदर केस आणि निरोगी आरोग्य मिळण्यास मदत मिळते. त्यामुळेच कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच याची पावडर किंवा प्रॉडक्ट मिळतील. ब्राम्ही ही वनस्पती दलदलीच्या ठिकाणी वाढते.आपल्या देशात जवळपास 20 हून अधिक प्रजातीची ब्राम्हीची झाडं आढळतात. यामधील 3 मुख्य प्रकार हे चांगले मानले जातात. त्यांचा अधिकाधिक उपयोग केला जातो. ब्राम्हीला अंडाकृती आकाराची फळं येतात, या झाडाची पानं कोरीव काम केल्यासारखी असतात. त्यामुळे ती चटकन ओळखता येतात. जाणून घेऊया ब्राम्हीचे फायदे ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल.
मोठ मोठे पिंपल्स येण्याचा त्रास असा करा कमी
सुंदर केस
ब्राम्हीचा उपयोग हा बरेचदा सुंदर केसांसाठी केला जातो. अनेक शॅम्पू आणि हेअर मास्कमध्ये ब्राम्हीचा उपयोग केला जातो. ब्राम्हीचा वापर केसांसाठी केल्यामुळे कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया
- ब्राम्हीची पावडर केसांवर लावल्याने केसांवर एक संरक्षण कवच तयार होते. त्यामुळे केस डॅमेज होत नाही.
- ब्राम्हीमध्ये असलेले बायोकेमिकल कपाऊंड हे केसांना पोषण देण्याचे काम करतात. केसांना टक्कल पडत असेल तर केसांना मजबूत करण्याचे काम ब्राम्ही करते.
- ब्राम्हीमध्ये असलेले अँटी- ऑक्सिडंट घटक केसांची गळती कमी करतात. शिवाय स्काल्प हेल्दी करण्याचे काम करतात. त्यामुळे केसगळती थांबून केस अधिक चांगले दिसू लागतात.
- ब्राम्ही टाळू शुद्ध करण्याचे काम करते. त्यामुळे स्काल्प चांगली राहते आणि केस अधिक सुंदर दिसतात
- ब्राम्ही हे केसांना आराम देण्याचे काम करते. त्यामुळे याच्या तेलाची मालिश ही केसांसाठी अधिक पोषक आहे असे मानली जाते.
फक्त 15 दिवस लावा कांद्याचा रस आणि मिळवा दाट केस
आरोग्यासाठी फायदेशीर
केसांसाठीच नाही तर आरोग्यासाठीही ब्राम्हीही फार फायदेशीर आहे. ब्राम्हीचे सेवन योग्यपद्धतीने केले तर त्याचा अधिक फायदा होतो.
- ब्राम्हीचा उपयोग हा मेंदूसाठी फारच फायदेशीर आहे. ब्राम्हीचे सेवन केल्यामुळे मेंदूचे कार्य अगदी योग्य पद्धतीने होते. मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ब्राम्ही मदत करते.
- एखाद्याला सतत जांभया येण्याचा किंवा कायमच आळसावलेले वाटत असेल तर तुम्ही ब्राम्ही पावडरचे सेवन तुपासोबत करावे. आळशीपणा कमी होऊन काम करण्याची इच्छा होईल.
- हार्मोन्स असंतुलित झाले असतील तर त्यासाठी तुम्ही ब्राम्हीची पानं तुम्ही तोंडात ठेवून चघळायला हवी. त्यामुळे हार्मोन्स संतुलित जाते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम देखील ब्राम्ही करते. घरात ब्राम्हीचे झाड आणून ठेवा. कारण त्याचा उपयोग करुन तुम्हाला तंदरुस्त राहता येईल.
- चहामध्ये ब्राम्हीची पाने घालून चहा प्यायल्याने अनेक आजार दूर रहतात.
आता बाजारात जाऊन लगेचच ब्राम्हीचे झाडं किंवा पावडर आणा फारच फायदेशीर ठरेल.
घरीच करा लिप स्पा, फॉलो करा या सोप्या टिप्स
पानफुटी वनस्पतीचे फायदे