ADVERTISEMENT
home / Natural Care
एरंडेल तेलाचे फायदे

सौंदर्य आणि आरोग्यासाठी एरंडेल तेलाचे फायदे (Castor Oil Benefits In Marathi)

कॅस्टर ऑईल (Castor Oil) अर्थात एरंडाचं तेल जे तुमच्या सौंदर्य आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर समजलं जातं. साधारण पिवळ्या रंगाचं असलेलं हे तेल खूपच उपयोगी आहे. कॅस्टरच्या बिया जेव्हा तुम्ही ठेचता तेव्हा त्यातून एक थंड आणि चिकट पदार्थ निघतो, ज्यापासून हे तेल बनवण्यात येतं. वैज्ञानिक भाषेमध्ये याला रिसिनस कॉम्यूनिस (Risinus Communis) म्हणून ओळखण्यात येतं. कॅस्टरचं झाड हे केवळ भारत आणि आफ्रिका या दोनच देशांमधील काही जंगलांमध्ये सापडतं. कॅस्टर ऑईलच्या वापराने तुमची त्वचा आणि केसांची समस्या या पटकन सुटतात. तसंच आरोग्यासाठी कोणत्याही वनस्पतीपेक्षा हे कॅस्टर ऑईल कमी नाही. आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी एरंडेल तेलाचे फायदे (castor oil benefits in marathi) अधिक जाणून घ्या. 

एरंडाचं तेल त्वचा ठेवतं निरोगी को रखे स्वस्थ (Castor Oil For Healthy Skin In Marathi)

एरंडेल तेल उपयोग मराठी

एरंडेल तेलाचे फायदे

कॅस्टर ऑईलमध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण आढळतात. या गुणांमुळे याचा प्रयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये करण्यात येतो. केमिकलयुक्त उत्पादनांंमध्ये प्रयोग करण्याऐवजी नैसर्गिक कॅस्टर ऑईल तुमच्या त्वचेच्या अनेक समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळवून देतं. त्यामुळे सौंदर्यासाठी आणि अधिक चांगली त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. 

टरपेंटाईन तेलाचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकित

ADVERTISEMENT

त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी (Removes Dryness On The Skin)

त्वचेवरील कोरडेपण

त्वचेवरील कोरडेपणा – एरंडेल तेलाचे फायदे

त्वचा तीन प्रकारची असते. कोरडी, तेलकट आणि कॉम्बिनेशन. कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी एरंडाचं तेल हे वरदान ठरतं. तुम्ही जर कोरड्या त्वचेमुळे हैराण असाल तर कॅस्टर ऑईलचा वापर नक्की करा. याचा तुम्हाला फायदा मिळतो. यामुळे तुमच्या त्वचेमध्ये कायम ओलावा राहातो. 

टिप : कापूस तुम्ही कॅस्टर ऑईलमध्ये भिजवा आणि चेहऱ्याला लावा. 1 तास तसंच ठेवा आणि नंतर चेहरा धुवा. याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर खूपच चांगला होतो. 

पिंपल्सची समस्या नष्ट होते (Castor Oil For Acne)

पिंपल्सची समस्या

पिंपल्सची समस्या नष्ट होते

ADVERTISEMENT

साधारणतः तेलकट त्वचा अथवा पिंपल्सच्या समस्या असतील तर कोणतंही तेल त्यावर लावण्यासाठी मनाई करण्यात येते. पण एरंडाचं तेल पिंपल्ससाठी अतिशय फायदेशीर आहे. तुमच्या त्वचेवर अॅक्ने (Acne) प्रोन असतील तर तुम्ही कॅस्टर ऑईल वापरा त्याने कोणतंही नुकसान होणार नाही. 

टिप : तुमचा चेहरा गरम पाण्याने धुवा, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्स ओपन होतील. त्यानंतर कॅस्टर ऑईल रात्रभर चेहऱ्यावर लावा आणि सकाळी थंड पाण्याने चेहरा साफ करा. 

वाढतं वय लपवण्यास होते मदत (Fights Signs of Aging)

वाढतं वय

अँटी एजिंगसाठी – एरंडेल तेलाचे फायदे

अँटी एजिंगसाठी हे तेल फायदेशीर समजण्यात येतं. तुम्ही जर या तेलाचा उपयोग नित्यनियमाने केला तर वाढतं वय लपवण्यासाठी याचा उपयोग होतो. हे तुमची त्वचा हायड्रेट करतं ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या (Wrinkles) असल्यास त्याची समस्या दूर होते आणि त्वचा मऊ, साफ आणि तरूण दिसते. 

ADVERTISEMENT

टिप : कॅस्टर ऑईलचे काही थेंब घ्या आणि चेहऱ्यावर मालिश करून रात्रभर चेहरा तसाच ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाण्याने धुवा. 

मॉइस्चराईजरला म्हणा गुडबाय (Castor Oil As A Moisturizer)

मॉइस्चराईजर

Moisturizer – एरंडेल तेलाचे फायदे

कॅस्टर ऑईल त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठीही मदत करतं. तुम्ही तुमची त्वचा मॉईस्चराईज ठेवण्यासाठी स्वस्त आणि घरगुती उपाय शोधत असाल तर कॅस्टर ऑईलपेक्षा चांगला उपाय तुम्हाला मिळूच शकत नाही. याचा वापर केल्यानंतर तुम्ही केमिकलयुक्त मॉईस्चराईजर (Moisturizer) वापरणं स्वतःहून सोडून द्याल

टिप : आपला चेहरा नीट साफ करून घ्या. त्यानंतर कॅस्टर ऑईलने हळूहळू चेहऱ्यावर मालिश करा.

ADVERTISEMENT

मालिशने जातात स्ट्रेच मार्क्स (Castor Oil For Stretch Marks)

मालिश

Castor Oil For Stretch Marks – एरंडेल तेल उपयोग मराठी

गर्भावस्थेनंतर बऱ्याचदा महिलांना स्ट्रेच मार्क्सची समस्या असते. डिलिव्हरीनंतर काही दिवसांपर्यंत पोटाचा खालच्या बाजूची त्वचा ही खेचली जाते. बऱ्याचदा त्वचेवर स्ट्रेच मार्क्स असल्यानंतर आपल्याला हवे तसे कपडे घालता येत नाहीत. त्यामुळे कॅस्टर ऑईलने मालिश केल्यानंतर स्ट्रेच मार्क्सचे डाग निघून जाण्यास मदत होते. तुम्हाला यासाठी व्यवस्थित मसाज करता यायला हवा. 

टिप : कॅस्टर ऑईलने 15- 20 मिनिट्स पर्यंत स्ट्रेच मार्क असलेल्या ठिकाणी मसाज करा. चांगल्या परिणामांसाठी कॅस्टर ऑईलचा रोज प्रयोग करा.  

चेहऱ्यांवरील डागांपासून मिळते सुटका (Removes Face Blemishes)

डागांपासून

Removes Face Blemishes – castor oil in marathi

ADVERTISEMENT

तुमच्या चेहऱ्यावर डाग (Face blemishes) असतील अथवा तुम्ही पिंपल्सने त्रासला असाल तर त्यासाठी तुम्ही कॅस्टर ऑईलचा वापर करू शकता. एरंडेलच्या तेलामध्ये आढळळणारे फॅटी अॅसिड चेहरा साफ करतं. हे फॅटी अॅसिड्स त्वचेच्या स्कार टिश्यू (Tissue) मध्ये प्रवेश करतात आणि चारही बाजूने टिश्यूचा विकास करून डाग काढून टाकण्यास मदत करतात. 

टिप : हे हळूहळू काम करतं, त्याचा योग्य परिणाम दिसण्यासाठी नियमित स्वरूपात कॅस्टर ऑईलचा वापर करा.  

डार्क सर्कल्सपासून मिळते सुटका (Removes Dark Circles)

डार्क सर्कल्स

Removes Dark Circles – castor oil meaning in marathi

रात्री उशीरापर्यंत जागण्याने अधिक तणावाच्या स्थितीत डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होतात. हे काळे डाग अर्थात डार्क सर्कल्स विचित्र दिसतात. यामुळे व्यक्तीची नक्की मानसिक स्थिती काय आहे हे समजून येतं. तुम्हालासुद्धा अशी समस्या असेल तर एरंडेल तेलाचा वापर (castor oil uses in marathi) तुम्ही करू शकता. 

ADVERTISEMENT

टिप : डोळ्यांखाली काळे डाग अर्थात डार्क सर्कल्स असतील तर कॅस्टर ऑईलने मसाज करा. यामुळे समस्या सुटण्यास मदत मिळते. 

ओठांसाठी वरदान (Boon For Lips)

ओठ

Boon For Lips – castor oil meaning in marathi

काही लोकांना काळजी घेऊनही ओठ काळे होण्याची समस्या असते त्याचबरोबर त्यांचे ओठ जास्त प्रमाणात फुटतात. अधिक धुम्रपान (Smoking) केल्याने अथवा लिप केअरचा अधिक वापर केल्याने अशी स्थिती उद्भवते. तुमच्या ओठांचा गुलाबी रंग परत मिळवण्यासाठी तुम्हाला कॅस्टर ऑईलचा उपयोग करता येतो. 

टिपः ओठांवर कॅस्टर ऑईल लावून हलक्या हाताने मसाज करा

ADVERTISEMENT

कॅस्टर ऑईल फेसपॅक (Castor Oil Face Pack In Marathi)

कॅस्टर ऑईलचा फेसपॅक बनवणं सोपं आहे.

कसं बनवावं फेसपॅक  

  • 2 चमचे कॅस्टर ऑईल,
  • 1 अंड्याचा (Egg white) सफेद भाग,
  • 5 थेंब लिंबाचा रस (Lemon juice)
  • 2 थेंब जास्मिन ऑईल (Jasmine Oil)

वरील सर्व मिश्रण घेऊन ब्लेंड करा. त्यानंतर याचा एक लेअर स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि साधारण 2-3 मिनिट्सच्या अंतराने त्यावर दोन लेअर लावा. हा पॅक 15- 20 मिनिट्स चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर हलक्या कोमट पाण्याने धुवा. हे तुम्ही तुमच्या आयब्रो आणि ओठांवरही लावू शकता. 

एरंडेल तेल उपयोग केसांसाठी (Castor Oil For Hair In Marathi)

कॅस्टर ऑईल

काळ्या, लांबसडक आणि घनदाट केसांसाठी अगदी आजीच्या बटव्यापासून ते डॉक्टरांच्या सल्ल्यापर्यंत सगळ्याच गोष्टी आपण करत असतो. केसांची इतकी काळजी करूनही आपली बदलती जीवनशैली आणि प्रदूषणामुळे केसांच्या समस्येशी लढणं ही अतिशय साधारण गोष्ट झाली आहे. एरंडेल तेल केसांच्या वाढीसाठी सर्वोत्कृष्ट तेल आहे.

ADVERTISEMENT

ऑईल मसाज करून चमक राहाते (Oil Massage For Glow)

ऑईल मसाज

केसांना लांबसडक ठेवण्यासाठी आणि त्याची घनदाट आणि नैसर्गिक चमक राखण्यासाठी नियमित स्वरूपात तुम्ही कॅस्टर ऑईलने केसांना मसाज करण्याची आवश्यकता आहे. भारतामध्ये सापडणाऱ्या बरडॉकच्या मुळांचा (Burdock plant) चा वापर तुम्ही कॅस्टर ऑईलसह करून केसांवर केल्यास, केसांची गेलेली चमक परत मिळण्यास मदत मिळते. 

केसगळतीपासून मिळते सुटका (Gets Rid Of Hairfall)

केसगळतीप

केसगळती (Hairfall) आता एक अतिशय साधारण समस्या आहे. केसांंची गळती रोखण्यासाठी मेथीच्या दाण्यांच्या पावडरमध्ये कॅस्टर ऑईल मिसळून एक पॅक तयार करा. हा पॅक तुमच्या केसांना आठवड्यातून एकदा तरी लावा. यामुळे तुमच्या केसांची मूळं मजबूत होतात आणि केसगळती रोखली जाते. एरंडेल ऑईल हेअर पॅक हे केसांच्या वाढीसाठी चांगला उपाय आहे.

कोंड्याला करा गुडबाय (Say Bye To Dandruff)

कोंड्याला

काही व्यक्तींना स्काल्पमध्ये इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे केसांमध्ये खाज, टक्कल पडणं आणि कोंडा (Dandruff) यासारखे त्रास दिसून येतात. तुम्ही केस धुण्याआधी नेहमी जर कॅस्टर ऑईलने मालिश केलं तर तुम्ही या समस्या होण्यापासून वाचू शकता. हे तेल केसांच्या मुळापर्यंत जाऊन कोंड्याचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

हेअर कंडिशनरदेखील आहे एरंडेलाचं तेल (Castor Oil As A Hair Conditioner)

हेअर कंडिशनर

Castor Oil As A Hair Conditioner

ADVERTISEMENT

केसांचा मऊपणा कायम जपून ठेवण्यासाठी हेअर कंडिशनर्सचा वापर करण्यात येतो. केसांना त्यांच्या मुळांपासून कंडिशन करण्यासाठी कॅस्टर ऑईला उपयोग करता येऊ शकतो. कॅस्टर ऑईलमध्ये विटामिन ई तत्व असतात. ज्यामुळे केसांना योग्य पोषण मिळतं. कॅस्टर ऑईलमुळे कोरड्या आणि खराब केसांवरही उपचार करता येऊ शकतात. 

केस होतील घनदाट आणि लांबसडक (Castor Oil For Long Hair)

केस होतील घनदाट आणि लांबसडक

Castor Oil For Long Hair

कॅस्टर ऑईलने नियमित केसांचं मालिश केल्यास, तुम्हाला लांबसडक आणि घनदाट केस मिळू शकतात. या तेलामध्ये आढणाऱ्या ओमेगा 9 (Omega 9) फॅटी अॅसिडमुळे केस अधिक निरोगी होतात. केसांमध्ये येणारी खाज आणि कोंड्यानेही केसगळती होते. कॅस्टर ऑईल या सर्व समस्यांपासून लवकर सुटका मिळते.

केस पांढरे होण्यापासून रोखते (Prevents Grey Hair)

केस पांढरे

Prevents Grey Hair

ADVERTISEMENT

हल्ली बऱ्याच जणांचे केस वयापेक्षा आधीच सफेद होतात. केसांचा नैसर्गिक रंग वाचवण्यासाठी तुम्हाला कॅस्टर ऑईलचे होणारे फायदे नाकारता येणार नाहीत. तुम्हाला जर तुमच्या केसांमध्ये सफेदी दिसायला लागली असेल तर वेळेवर कॅस्टर ऑईलचा वापर तुम्ही करून घेऊ शकता. 

आयब्रोसाठी फायदेशीर (Beneficial For Eyebrows)

आयब्रो

Beneficial For Eyebrows

काही मुलींच्या आयब्रोची ग्रोथ ही कमी असते. यासाठी तुम्ही रोज कॅस्टर ऑईलने आयब्रोची मालिश करा. जर तुमच्या भुवयांमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी कॅस्टर ऑईलचे काही थेंब भुवईला लावून मालिश करा. एका आठवड्यात याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. 

कॅस्टर ऑईलचा हेअर ऑईल पॅक (Hair Pack Of Castor Oil In Marathi)

कॅस्टर ऑईलचा हेअर ऑईल पॅक बनवणं अतिशय सोपं आहे. तुम्ही घरच्या घरी हे तयार करून याचा वापर करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

कसं बनवावं हेअरपॅक

  • 2 टेबलस्पून कॅस्टर ऑईल (एरंडेल तेल)
  • 2 टेबलस्पून नारळाचं तेल ( Coconut oil)
  • 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल (Olive oil)

हे सर्व एकत्र मिसळून घ्या. एका बाटलीत भरून ठेवा. या तेलाने तुम्ही आठवड्यातून एकदा मसाज करा. 

आरोग्यासाठी वरदान आहे कॅस्टर ऑईल (Castor Oil Benefits In Marathi For Health)

आरोग्यासाठी कॅस्टर ऑईल

Health Benefits Of Castor Oil In Marathi

कॅस्टर ऑईलमध्ये नैसर्गिक अनेक गुण असतात जे तुमच्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा नक्कीच कमी नाहीत. यामध्ये अँटिइन्फ्लामेटरी आणि अँटिबॅक्टेरियाल गुण असल्याने त्याचा आरोग्यासाठी चमत्कारच होतो. आरोग्याविषयक अनेक समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी कॅस्टर ऑईलचा तुम्हाला व्यवस्थित वापर करता येऊ शकतो. 

ADVERTISEMENT

बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी (Relieves Constipation)

कॅस्टर ऑईलमध्ये चरबीयुक्त फॅटी अॅसिड असतं. ज्यामुळे आतड्यांधील (Intestines) मांसपेशी मजबूत होतात. बद्धकोष्ठतेपासून (Constipation) सुटका मिळवण्यासाठी दिवसाच्या वेळी कॅस्टर ऑईल साधारण 15 मिलीलीटर इतकं प्यावं. वास्तविक गर्भवती महिला आणि लहान मुलांनी मात्र हे पिणं टाळावं. 

आर्थरायटिससाठी फायदेशीर (Beneficial In Arthritis)

एरंंडेल तेल आर्थरायटिस (Arthritis) या आजारावर चांगलं फायदेशीर आहे. कॅस्टर ऑईल हे सांधेदुखी (Joints) आणि टिश्यू (Tissues) मध्ये होणारा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. एक कपडा एरंडेल तेलात बुडवून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल तिथे लावा. यामुळे तुम्हाला आलेली सूज कमी करण्यासाठी एरंडेल तेलचा उपयोग मराठीत आवश्यक आहे.

जखम भरण्यासाठी प्रभावी (Effective For Healing Wounds)

कॅस्टल ऑईलने कट्स (Cuts) आणि जखम या दोन्ही गोष्टींवर अँटीसेप्टिक (Antiseptic) प्रमाणे उपयोग करता येतो. अभ्यासात सिद्ध झाल्यानुसार एखाद्या मलममध्ये कॅस्टर ऑईल असेल तर जखम विशेषतः अल्सर (Ulcer) ठीक करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो आणि त्रासही निघून जातो. 

दादीवरील रामबाण उपाय (Good For Ringworm)

दादी (Ringworm) एक साधारण अशी समस्या असली तरी अतिशय जिद्दी समस्या आहे. कोणत्याही व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कॅस्टर ऑईलचा चांगला फायदा होतो. 2 चमचे एरंडेल तेलामध्ये 4 चमचे नारळाचं तेल घालून दाद आलेल्या ठिकाणी लावल्यास हे अत्यंत प्रभावी औषध समजलं जातं. 

ADVERTISEMENT

इम्यून सिस्टम होते मजबूत (Strengthens Immune System)

नॅच्युरोपॅथी (Naturopathy) च्या विशेषज्ञांनुसार, कॅस्टर ऑईलमुळे रोगप्रतिकारक क्षमता (Immune system) मजबूत होते. वास्तविक बाहेरून कॅस्टर ऑईलचा वापर केल्याने टी- 11 पेशींची संख्या वाढते. ज्यामुळे तुमचं आरोग्य अधिक सुदृढ होतं. टी- 11 पेशी या अँटिबॉडीप्रमाणे काम करतात. 

पाठीच्या दुखण्यातून मिळते सुटका (Relieves Back Pain)

पाठीच्या दुखण्यातून सुटका मिळवण्यासाठी कॅस्टर ऑईल हा रामबाण इलाज समजण्यात येतो. जर तुमची पाठ दुखत असेल तर एरंडेल तेल लावा आणि स्वच्छ आणि मुलायम कपड्याने तो भाग झाकून ठेवा. त्यानंतर त्यावर गरम पाण्याची पिशवी ठेवा आणि तीन दिवस असाच प्रयोग करा. त्यामुळे तुमच्या पाठीचं दुखणं गायब होईल. 

वजन कमी करण्यासाठी होते मदत (Helps In Weight Loss)

वजन कमी

Shutterstock

जीवनशैली (Lifestyle) मध्ये आजकाल झालेल्या बदलामुळे जास्त लोकांना जाडेपणा आणि वाढत्या वजनाच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. वजन कमी करण्यासाठी (Weight loss) अनेक उपाय शोधले जातात. पण तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज उपाशी पोटी सकाळी उठल्यावर एक चमचा कॅस्टर ऑईल प्या. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

दातदेखील होतात चमकदार (Teeth Becomes Shiny)

दातदेखील होतात चमकदार

Teeth Becomes Shiny – Arendal Oil Benefits In Marathi

काही लोक आपल्या डेन्टिस्टच्या सल्ल्यानुसार दातांची काळजी (Dental care) घेतात, तर काही लोकांना डेन्टिस्टकडे जायचं नसतं. पण तुम्हाला तुमच्या दातांची योग्य काळजी घ्यायची असेल तर तुम्ही कॅस्टर ऑईलचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया आणि दुर्गंध दूर होतो. 

डोळ्यांना ठेवतो साफ (Keeps Eye Clean)

डोळ्यांना

Keeps Eye Clean – Arendal Oil Benefits In Marathi

कॅस्टर ऑईलमध्ये विटामिन ई सह फॅटी अॅसिड आणि रिसिनोलिक अॅसिड आढळतं. ज्यामुळे डोळ्यांमधील घाण बाहेर येण्यास मदत होते. हे तेल डोळ्यांची स्वच्छता राखण्यासाठी सर्वात चांगलं आहे. तसंच डोळ्यांखाली येणारा काळेपणा हटवण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

कॅस्टर ऑईलचे दुसऱ्या तेलासह कॉम्बिनेशन (Combine Castor Oil With Another Oil)

साधारणतः कॅस्टर ऑईल हे शुद्ध स्वरूपातच वापरलं जातं. पण असं नाही की, दुसऱ्या तेलांबरोबर मिक्स केल्यानंतर याने काही नुकसान होतं. असे कितीतरी तेल आहेत, जे कॅस्टर ऑईलसह अगदी सहजपणे मिक्स करून त्याचा उपयोग करता येऊ शकेल.  

हेअर सिरम : कॅस्टर ऑईल + जोजोबा ऑईल – हेअर सिरम बनवण्यासाठी 3 चमचे कॅस्टर ऑईल आणि 1 चमचा जोजोबा ऑईल (Jojoba oil) अथवा आर्गन ऑईल (Argan oil) एकत्र करून घ्या. हे मिश्रण लावून 5 मिनिट्स केसांना मसाज करा. 

अँटी एजिंग ऑईल : कॅस्टर ऑईल + ऑलिव्ह ऑईल – एरंडेल तेल आणि ऑलिव्ह ऑईल हे साधारण 1:3 अशा भागात (Ratio) एकत्र करा. त्यानंतर मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करा. त्वचा तेलकट असेल तर ऑलिव्ह ऑईलऐवजी तुम्ही जोजोबा ऑईलचा वापर करू शकता. 

हँड क्रीम : कॅस्टर ऑईल + सिसम ऑईल – हँड क्रीम बनवण्यासाठी कॅस्टर ऑईल और सिसम ऑईल अर्थात तिळाच्या तेलाचे साधारण 1:1 इतका भाग करून घ्यावे.  हे मिक्स रून हाताला लावा. त्यानंतर तुमचे हात मऊ मुलायम होतील.  

ADVERTISEMENT

हेअर ग्रोथ : कॅस्टर ऑईल + आमंड ऑईल – केसांची चांगली वाढ हवी असेल तर तुम्ही कॅस्टर ऑईल आणि आमंड ऑईल (Almond oil) अर्थात बदामाचं तेल योग्य प्रमाणात घेऊन स्काल्पचा मसाज करा. त्यानंतर डोकं झाकून ठेवा आणि सकाळी ऊठल्यावर केस धुवा. 

कोरडी त्वचा : कॅस्टर ऑईल + कोकोनट ऑईल – बऱ्याच कालावधीपासून जर त्वचेमध्ये कोरडेपणा असेल तर तुम्ही कॅस्टर ऑईल आणि कोकोनट ऑईल (Coconut oil) अर्थात नारळाचं तेल 1:1 या प्रमाणात घ्या. मिक्स करून दिवसातून दोन वेळा याने चेहरा साफ करा. 

कॅस्टर ऑईलने होणारं नुकसान (Side Effects Of Castor Oil In Marathi)

प्रत्येक गोष्टीच्या जशा दोन बाजू असतात तसंच फायदे आणि नुकसानदेखील असतं. कॅस्टर ऑईलचे खूपच फायदे आहेत हे जरी खरं असलं तरी त्याचे दुष्परिणामदेखील आहेत. एरंडेल तेल वापरण्याआधी त्याचे नुकसान जाणून घेणंदेखील गरजेचं आहे. 

1. त्वचा, डोळे अथवा केसांसाठी कॅस्टर ऑईलचा वापर करण्यापूर्वी याची तपासणी नक्की करा. काही लोकांना यामुळे शरीरावर रॅशेस अथवा अलर्जी होण्याचाही धोका असतो. 

ADVERTISEMENT

2. कॅस्टर ऑईल बरचं उष्ण स्वरूपाचं असतं. याचं जास्त सेवन केल्यास, समस्या निर्माण होतात. त्यामुळे याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

3. कॅस्टर ऑईलचा जास्त वापर केल्यास, पोटामध्ये गोळा येणं, उलटी होणं, कमजोरपणा अथवा चक्कर येणं यासारख्या समस्याही उद्भवतात. 

4. गर्भवती महिलांनी याचं सेवन करू नये. स्तनपान देत असलेल्या महिलांनीदेखील डॉक्टरांना विचारल्याशिवाय याचं सेवन करू नये. 

5. बऱ्याच लिपस्टिक ब्रँड्स (Lipstick) मध्ये कॅस्टर ऑईलचा वापर करण्यात येतो. जर तुम्हाला कॅस्टर ऑईलची अलर्जी असेल तर अशा लिपस्टिकचा वापर टाळा. 

ADVERTISEMENT

6. या तेलाचा वापर केल्यानंतर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास झाला अथवा त्वचेवर लाल चट्टे, खाज, सूज काही दिसलं तर लगेच डॉक्टरांना भेट द्या.

पुढे वाचा –

Castor Oil Benefits in Hindi

कॅस्टर ऑईलसंदर्भात प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. कॅस्टर ऑईल केसांना लावता येतं का?

कॅस्टर ऑईल हे तुमच्या केसांच्या वाढीसाठी चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही ते केसांना लावू शकता. फक्त ते कशाप्रकारे लावायचं हे जाणून घ्या आणि तेलकट केसांवर याचा जास्त वापर करू नका.

2. कॅस्टर ऑईल इतर तेलांबरोबर मिक्स करू शकतो का?

तुमच्या चेहऱ्याच्या आणि केसाच्या देखभालीसाठी तुम्ही वेगवेगळ्या तेलाबरोबर कॅस्टर ऑईल मिक्स करून त्याचा वापर करून घेऊ शकता.

3. कॅस्टर ऑईलचा सांधेदुखीसाठी फायदा होतो का?

कॅस्टर ऑईल हे सांधेदुखीसाठी खूपच चांगलं आहे. तुम्ही नियमित याने मालिश केल्यास, तुमची सांधेदुखी नष्ट होण्यास मदत मिळते.

30 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT