वजन कमी करण्याचा विचार करत असाल आणि वेगवेगळे प्रयोग केले असतील तर तुम्ही क्रॉस फिट या वर्कआऊटबद्दलही नक्कीच ऐकले असेल. क्रॉस फिट वर्कआऊट हा फार दमवणारा असा वर्कआऊट असून यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही या प्रकारचा वर्कआऊट नक्की ट्राय करु शकता. या वर्कआऊटमुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या शरीरात फरक झालेला दिसेल. पण क्रॉस फिट वर्कआऊट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? नाही तर आज आपण जाणून घेऊया क्रॉस फिट वर्कआऊटची माहिती आणि काही व्यायामप्रकार जे तुमचं वजन कमी करण्यास मदत करतील.
सैंधवने करा वजन कमी, जाणून घ्या काळ्या मिठाच्या पाण्याचे फायदे
दूध उकळताना उतू जाऊ नये यासाठी सोप्या टिप्स
क्रॉस फिट म्हणजे काय?
क्रॉस फिट हा हाय इन्टेन्सिटी वर्कआऊट आहे. हा एक स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगचा वर्कआऊट प्लॅन असून हा शारीरिक रित्या थकवणारा असा वर्कआऊट आहे. ज्याप्रमाणे तुम्ही कार्डिओ वर्कआऊट करता अगदी त्याचप्रमाणे हा वर्कआऊट असतो. पण हा वर्कआऊट तुमच्या कार्डिओ वर्कआऊटपेक्षा थोडा वेगळा असतो. कारण यामध्ये संपूर्ण शरीराचा वर्कआऊट केला जातो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासोबत तुमच्या शरीराला बळकटी आणण्याचे काम देखील हा वर्क आऊट करतो. त्यामुळे हा वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही चुकिच्या पद्धतीने बारीक दिसत नाही तर तुमचे शरीर अधिक सुदृढ आणि चांगले दिसू लागते. खूप ठिकाणी जीममध्ये अशा प्रकारे वर्कआऊट हा काही जणांना दिला जातो. या अशा वर्कआऊटमुळे वजन झपाट्याने उतरत नाही. तर अगदी योग्य पद्धतीने आणि शरीरानुसार ते बदलत जाते. पण हा वर्कआऊट करणे फारच मेहनतीचे काम
वजन कमी करायचं आहे, मग हे अॅक्युप्रेशर पॉईंट आहेत फायदेशीर
करा हे क्रॉसफिट वर्कआऊट
आता जर तुम्ही गुगल करुन क्रॉसफिटचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील तर आता तुम्ही नेमके कोणते व्यायामप्रकार यामध्ये करायला हवेत ते देखील जाणून घेऊया.
१. फ्रंट स्कॉट्स– पायांच्या वर्कआऊटपासून सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या एका व्यायामप्रकारापासून सुरुवात करु शकता. फ्रंट स्कॉट्स हा प्रकार पायांसाठी फारच उत्तम आहे. त्यामुळे तुमच्या पायांना चांगली बळकटी मिळते त्यामुळे तुम्ही हा व्यायामप्रकार नक्कीच करा.
२.केटल बेल स्विंग: हा एक व्यायामप्रकार तुम्हाला वजन घेऊन करावा लागतो. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला केटल बेलची गरज असते जी तुम्हाला थोडासा स्कॉट करुन स्विंग करायचा असते. असे करताना तुम्हाला दोन पायांमध्ये अंतर ठेवायचे आहे त्यानंतर दोन हातात वजन पकडून ते स्विंग करायचे आहे.
३. बर्पीस: जर तुम्हाला थोडा इंटेन्स वर्कआऊट करायचा असेल तर तुम्ही बर्पीस वर्कआऊट करु शकता. यामध्ये थोडासा वेळ लागतो आणि थकवा सुद्धा पण तरीदेखील हा व्यायाम कमालीचा फरक पाडणारा आहे. त्यामुळे तुम्ही याचा व्हिडिओ पाहून नीट व्यायाम करा.
आता हे नक्की वर्कआऊट करुन पाहा तुम्हाला तुमच्यामध्ये नक्कीच फरक झालेला जाणवेल.