दिवसाची सुुरुवात आरोग्यदायी व्हावी यासाठी अनेक जण उठल्या उठल्या चांगल्या गोष्टींचे सेवन करतात. उपाशी पोटी काही गोष्टी गेल्या की, त्याचा फायदा शरीरासाठी होतो. उपाशी पोटी जर तुम्ही काही हेल्दी घेण्याचा विचार करत असाल तर आवळा- ॲलोवेरा हे कॉम्बिनेशन तुमच्यासाठी खूपच चांगले आहे. आवळ्याचा तुरटपणा आणि कोरफडीचा चिकटपणा असा हा या रसामध्ये असतो. त्यामध्ये अनेक असे घटक असतात जे त्वचा, आरोग्य यासाठी फायद्याचे असतात. जाणून घेऊया आवळा-ॲलोवेेरा रसाचे फायदे
आवळा- ॲलोवेरा आहे गुणकारी
आवळा हा व्हिटॅमिन C चा भंडार आहे. त्याच्या सेवनामुळे त्वचा आणि केसांना चमक मिळण्यास मदत मिळते. जर तुम्हाला सुंदर त्वचा हवी असेल तर तुमच्या शरीरात या गोष्टी असायलाच हव्यात. इतकेच नाही तर अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास हा कमी करायचा असेल तर तुम्ही ॲलोवेराचे सेवन करणे फायद्याचे ठरते. त्यमुळे पोटात अडकलेला मल: हा बाहेर काढण्यास मदत मिळते. या शिवाय या दोघांमध्ये अँटी ऑक्सिडंट, पॅलिफोनॉल्स नावाचा घटक असतो. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठीदेखील मदत करतो. रिकाम्या पोटी तुम्ही आवळ्याचा रस आणि ॲलोवेराचा रस एकत्र करुन घेतला तर त्याचा फायदा मिळण्यास तुम्हाला मदत मिळते.
असे करा याचे सेवन
जर तु्म्हाला उपाशी पोटी आवळा-ॲलोवेरा रसाचे सेवन करायचे असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला
- हल्ली बाजारात आवळा-ॲलोवेरा याचे एकत्र मिश्रण मिळते. त्यामुळे तुम्हाला फार काही कष्ट असे घ्यावे लागत नाही. पण जर तुम्हाला असे मिश्रण मिळत नसेल तर तुम्ही एक एक चमचा घेऊनही पाण्यात घालून ते घेऊ शकता.
- खूप जणांच्या शरीराला आंबट चालत नाही. त्यामुळे तुम्हाला आवळा रस ठेवणे हे घातक ठरु शकते. अशावेळी तुम्ही आवळा रस वगळून किंवा कमी करुन त्याचे सेवन केले तरी देखील चालू शकते.
- आवळा-ॲलोवेरा रस एक-एक चमचा पाण्यामध्ये घेऊन ते पाणी गरम करा. गरम पाणी तुम्ही प्या. त्यामुळे सकाळी तुम्हाला गरम पाणी प्यायचे असते ते देखील काम होईल आणि त्याचे फायदे मिळण्यात मदत मिळेल.
- जर तुम्हाला सकाळी याचे सेवन करणे शक्य नसेल तर तुम्ही त्याचे सेवन सकाळच्या नाश्त्यानंतरही करु शकता. खूप जणांना अगदीच सकाळी अशा रसांचे सेवन आवडत नसेल तर त्याचे सेवन नंतरही चालू शकते.
ताजा रस करत असाल तर
खूप जणांना साठवलेले रस प्यायला आवडत नाही. अशावेळी जर तुम्ही ताजा रस प्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला रोजच्या रोज रस करुन त्याचे ठराविक वेळात सेवन करणे हे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही ताज्या रसाचा पर्याय निवडत असाल तर तुम्हाला आवळा हा काही काळासाठीच मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला वर्षभर या रसाचे सेवन करता येणार नाही.
आता तुम्ही आवळा-ॲलोवेरा असे कॉम्बिनेशन प्यायचा विचार करत असाल तर तुम्ही या रसाचे सेवन करु शकता.
पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते खास ड्रिंक