ADVERTISEMENT
home / आरोग्य
यासाठी खा कुरमुरे

आहारात असे समाविष्ट करा कुरमुरे, होतील फायदे

हलके फुलके कुरमुरे खायला कोणाला आवडत नाहीत. कुरमुरे ( Murmura) हा खूप जणांच्या आवडीचा असा स्नॅक आहे. तांदूळ फुलवून जे तयार केले जाताता. त्याला कुरमुरे असे म्हणतात. खूप जण त्याला चुरमुरे असे देखील म्हणतात. कुरमुऱ्यांपासून भेळ, भडंग, चिवडा असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. कुरमुऱ्यांचा आहारात समावेश हा फारच फायद्याचा असतो. तुम्हीही काहीतरी चांगले हेल्दी खाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आहारात कुरमुऱे समाविष्ट करायला हवे.कधी? कोणत्यावेळी कुरमुरे खायला हवेत. कुरमुऱ्यांचे फायदे नक्की काय ते जाणून घेऊया.

कुरमुरे कसे होतात तयार

कुरमुरे तयार करण्याची पद्धत फार काही कठीण नाही. तुम्ही पॅकेट व्यतिरिक्त कधी गरम गरम कुरमुरे खाल्ले आहेत का? कुरमुरे फुलवण्याची पद्धतही खास असते. कुरमुऱे फुलवण्यासाठी खास कढई वापरली जाते. या कढईत रेती टाकून त्यामध्ये तांदूळ टाकून ते छान फुलवायला घेतले जाते. बारीक सुके तांदुळ अचानक फुलून असा कुरमुरा होतो हे पाहणे खूपच जास्त समाधानकारक असते.

कुरमुरे खाण्याचे फायदे

कुरमुरे खाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदे माहीत असायला हवेत.

  1. तुम्हाला खूप काही खाण्याची इच्छा झाली असेल अशावेळी पटकन एनर्जी मिळवण्यासाठी कुरमुऱ्यांचे सेवन करु शकता. कुरमुऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असते. ज्यामुळे पटकन एनर्जी मिळण्यास मदत मिळते. यामध्ये असलेले कार्ब्ज ग्लुकोजमध्ये बदलते. जी शरीराला उर्जा देण्याचे काम करते. 
  2. कुरमुऱ्यामध्ये डाएटरी फायबर असते हे डाएटरी फायबर तुमच्या पोटाची समस्या दूर करण्याचे काम करते. त्यामुळे ज्यांना पोटाचा त्रास असेल तर त्यांनी कुरमुऱ्याचे सेवन करावे. 
  3. कुरमुऱ्यामध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअम असते. त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले करण्याचे काम करते. हाडांचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी कुरमुऱ्याचे सेवन करणे फारच जास्त गरजेचे असते. 
  4.  कुरमुऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असते जे ग्लुकोजला चालना देण्याचे काम करतात.  त्यामुळे कुरमुऱ्याचे सेवन फायद्याचे ठरते. 
  5. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कुरमुरे खूपच जास्त फायद्याचे ठरते. जे सतत आजारी पडतात अशांसाठी तर कुरमुरे चांगले. कुरमुऱ्यामध्ये विटामिन, मिनरल आणि फाईटोमिकल्स असते जे रोगांशी सामना करण्याचे काम करते. 
  6. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचेला विटामिन बी मिळण्यासाठी मदत करते.  त्वचेला आवश्यक असलेले मिनरल आणि विटामिन मिळाल्यामुळे त्वचा चांगली दिसते.
  7.  कॅन्सरसारख्या समस्येपासून दूर ठेवण्यासाठीही कुरमुरे चांगले असतात. म्हणून देखील कुरमुऱ्याचे सेवन करणे चांगले मानले जाते. 

आता घरातील लहान मुलांपासून सगळ्यांना कुरमुरे द्यायला अजिबात विसरु नका.नित्यनेमाने त्याचे सेवन करायला विसरु नका. 

ADVERTISEMENT
07 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT