शरीराला फायबर पुरवण्यासाठी फळं ही आहारात समाविष्ट करण्यास सांगितले जाते. फळांचे वेगवेगळे प्रकार तुम्ही आतापर्यंत नक्कीच खाल्ले असतील. पण तुम्ही कधी रामफळ खाल्ले आहे का? रामफळ हे फारच कमी लोकांना माहीत असेल. हे फळ दिसायला सीताफळ या गटातील असले तरी याची चव ही थोडीशी वेगळी लागते. बाजारात अगदी मोजक्याच फळवाल्यांकडे दिसणारे हे फळ आरोग्यासाठी फारच लाभदायक आहे. याच्या सेवनामुळे शरीराला इतके अप्रतिम फायदे मिळतात की, हे फळ तुम्ही अगदी नक्कीच खायला हवे. जाणून घेऊया रामफळाचे फायदे
सतत खाऊ नका ओवा,संभवतील या आरोग्य तक्रारी
अॅडल्स अॅक्नेवर फायदेशीर
वयाची तिशी पार झाली की, खूप जणांना अॅडल्ट अॅक्नेचा त्रास होऊ लागतो. पौंगडावस्थेत आलेले पिंपल्स आणि तिशीनंतर येणारे पिंपल्स हे अधिक त्रासदायक असतात. अशा पिंपल्सवर रामफळ हे चांगला उपाय आहे. रामफळाच्या सेवनामुळे या अॅक्नेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. त्वचेचे इतर विकार तुम्हाला सतावत अतील तर तुम्ही रामफळ खायचा हवे. ते खाल्ल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्वचेच्या इतर विकारांपासूनही सुटका मिळण्यास मदत होईल.
मधुमेहींसाठी फायदेशीर
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशांनी रामफळाचे सेवन अगदी हमखास करायला हवे. रामफळाच्या सेवनामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तिंना त्यांच्या आहारवर भयंकर नियंत्रण ठेवण्याची गरज असते. अशावेळी मधल्या भुकेच्यावेळी रामफळ खाल्ले तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा मिळतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी रामफळ खायलाच हवे.
दम्याच्या रूग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक, तज्ज्ञांचे मत
प्रतिकारशक्ती वाढवते
जर तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर कोणत्याही वातावरणात आजारी पडण्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रामफळ हे फारच फायद्याचे आहे. रामफळाच्या सेवनामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.या फळामध्ये असलेले व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन B हे घटक असतात जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
सुंदर केस
केसांसाठीही रामफळ हे फारच फायद्याचे असते. रामफळामध्ये असलेले व्हिटॅमिन C केसांना चमक देण्याचे काम करते. रामफळाचे सेवन केल्यामुळे केसांचे गळणे कमी होते. आणि केसांना अधिक मजबूती मिळते. त्यामुळे सुदंर केस हवे असतील तर अशांनी रामफळाचे सेवन करायला काहीच हरकत नाही.
असे स्टोअर करा रामफळ
रामफळ हे अगदी सहज सगळीकडे मिळेल असे फळ नाही. तुम्हाला जर हे फळ कधी मिळाले तर तुम्ही ते स्टोअर करुन ठेवा म्हणजे जेव्हा हवं त्यावेळी या फळाचा गर घालून तुम्ही मिल्कशेक बनवू शकता आणि रामफळाचे फायदे मिळवू शकता.
रामफळाचे फायदे वाचल्यानंतर रामफळाचे सेवन नक्की करा
उन्हाळ्यात होतोय का मुळव्याधीचा त्रास, वाचा कारणं आणि उपाय