ADVERTISEMENT
home / Fitness
गुळवेलाच्या रसाचे आरोग्यासाठी फायदे घ्या जाणून

गुळवेलाच्या रसाचे आरोग्यासाठी फायदे घ्या जाणून

गुळवेल म्हणजे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त वनस्पती ठरते. सध्या कोविड कालावधीत तर गुळवेलाला अधिक मागणी प्राप्त झाली आहे. गुळवेलाचे अनेक फायदे (Benefits of Giloy) आहेत. केवळ गुळवेलाच्या चूर्णाचेच नाहीत तर गुळवेलाच्या रसाचेही आरोग्यासाठी फायदे होतात. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सर्वात चांगले औषध म्हणजे गुळवेल समजण्यात येते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार याचा प्रमाणात आणि योग्य नियमित वापर केल्यास, तुमची प्रतिकारशक्ती चांगली वाढते आणि तुम्हाला याचा फायदा मिळतो. अनेक आजारांपासून तुम्हाला सुटका मिळते. गुळवेलाच्या रसाचे नेमके काय फायदे होतात (Benefits of giloy juice) ते आपण या लेखातून जाणून घेऊया.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

instagram

गुळवेलामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असते. जे शरीरातील टॉक्झिन्स अर्थात विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते. तसंच गुळवेलाचा रस हा रक्त शुद्ध करून बॅक्टेरियाशी लढण्यास फायदेशीर ठरतो. तुम्हाला जर तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या डाएटमध्ये गुळवेलाच्या रसाचा समावेश करून घ्या. तुम्ही रोज सकाळी नियमित उपाशीपोटी एक कप गुळवेलाचा रस प्यायलात तरी तुम्हाला याचा फायदा होतो. तसंच या रसामुळे तुम्हाला मधुमेह, रक्तदाब यासारखे आजारही होत नाहीत.

ADVERTISEMENT

अन्नपचनासाठी उत्तम

काही व्यक्तींना अन्नपचनाचा खूपच त्रास असतो. तुम्हालाही जर अॅसिडीटी अथवा अन्नपचन यासारखा त्रास असेल तर तुम्ही नियमित गुळवेलाचा रस प्यावा. तुमची डायजेस्टिव्ह सिस्टिम (digestive system) सुरळीत करण्याचे काम गुळवेलाचा रस करून देते. तसंच तुम्ही याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या छातीत अॅसिडीटीमुळे होणारी जळजळही थांबते. अन्नपचनाची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी याचा फायदा होतो. पोट जडजड राहत नाही आणि शिवाय तुम्हाला कडवट ढेकर येणे अथवा जळजळ होणे यासारखा त्रासही होणे बंद होते. 

तापासाठी उत्तम उपाय

तापासाठी उत्तम उपाय

Shutterstock

कोणत्याही व्यक्तीला सतत ताप येण्याचा त्रास असेल तर तुम्ही अशा व्यक्तीला गुळवेलाचा रस पिण्याचा सल्ला नक्की देऊ शकता. अशा व्यक्तींनी नियमित गुळवेलाचा रस प्यावा. कोणत्याही प्रकारच्या तापावर मात करण्याची ताकद गुळवेलाच्या रसामध्ये आहे. तापावर गुळवेलाचा रस हा उत्तम औषध पर्याय आहे. यातील अँटिपायरेरिक गुणांमुळे तापावर मात करण्यासाठी याचा फायदा होतो. याच्या सेवनाने ताप त्वरीत उतरण्यास मदत मिळते. त्यामुळेच कोविडसारख्या (Covid 19) आजारावरही याचा चांगला परिणाम होताना दिसून येत आहे. 

ADVERTISEMENT

मधुमेहासाठी अप्रतिम

मधुमेहासाठी अप्रतिम

Shutterstock

मधुमेह हा शरीरातील साखरेच्या वाढीव पातळीमुळे होतो. गुळवेलाच्या रसामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत मिळते. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळवेलाचा रस नियमित सेवन करावा. याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी लवकरच कमी होण्यास मदत मिळते. गुळवेलाची पावडरही यासाठी फायदेशीर ठरते. 

आर्थरायटिससाठीही फायदेशीर

ज्या व्यक्तींना आर्थरायटिस आहे अशा व्यक्तींना केवळ सांधेदुखी होत नाही तर त्यांना चालण्याफिरण्यातही खूपच त्रास होतो. हा त्रास घालविण्यासाठी गुळवेलाचा रस उत्तम ठरतो. गुळवेलाच्या रसात अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिआर्थ्रिटीक गुण असतात, जे यावर उपचार करण्यास उत्तम ठरतात. त्यामुळे नियमित तुम्ही याचा वापर करून घ्या. 

ADVERTISEMENT

ताण कमी करण्यासाठीही उपयोगी

ताण कमी करण्यासाठीही उपयोगी

Shutterstock

गुळवेलाच्या रसात असणाऱ्या अॅडाप्टोजेनिक गुणधर्मामुळे नसांना शांत करण्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला जर सतत ताण येत असेल तर तुम्ही याचा रस रोज नियमितपणे प्यावा. तणावापासून सुटका मिळवून देणाऱ्या हार्मोन्सना गुळवेलाचा रस फायदेशीर ठरतो. ताण दूर करण्यासाठी तयार करण्यात औषधांमध्येही गुळवेलाच्या रसाचा उपयोग करण्यात येतो. 

 

ADVERTISEMENT

 

 

 

 

ADVERTISEMENT

त्वचेसाठी उत्तम

त्वचेसाठी उत्तम

Freepik

गुळवेलाच्या रसामध्ये अँटिएजिंग गुणही आढळतात. याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन, फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी करू शकता. गुळवेलाच्या रसाच्या सेवनाने तुमची त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर दिसते. त्यामुळे याचा नियमित आपल्या आहारात तुम्ही समावेश करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

03 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT