ADVERTISEMENT
home / Care
केसांच्या वाढीसाठी मसाजचे फायदे मराठीत (Benefits Of Head Massage For Hair)

केसांच्या वाढीसाठी मसाजचे फायदे मराठीत (Benefits Of Head Massage For Hair)

 

आपण आपल्या केसांची नियमित काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. विशेषतः शहरांमध्ये धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केस लवकर खराब होतात. इतकंच नाही तर वयाच्या आधीच केस पांढरे होण्यासही सुरुवात होते. मग अशावेळी केसांचं संरक्षण कसं करायचं असा प्रश्न मनात निर्माण होणं साहजिक आहे. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी नियमित केसांची काळजी घेण्यासाठी मसाज करू शकता. केस मऊ आणि मुलायम होण्यासाठी तुम्हाला केसांची काळजी घेणं आणि त्यांना नियमित मसाज देणं हे अत्यंत आवश्यक आहे. तसंच तुम्हाला रोजचा ताण असेल तर त्यापासूनदेखील तुम्हाला मसाजमुळे सुटका मिळते. पण मसाज जर योग्य पद्धतीने झाला नाही तर त्याचा केसांना फायदा होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या केसांना फायदा मिळवून द्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच केसांना योग्य पद्धतीने मसाज करायला हवा हे लक्षात ठेवा. आता योग्य पद्धतीने मसाज करायचा म्हणजे नेमकं काय करायचं असाही प्रश्न निर्माण होतो. तर तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुम्हाला यासाठी या लेखाद्वारे सर्व माहिती देणार आहोत.

स्काल्प मसाज म्हणजे काय ? (What Is Scalp Massage In Marathi)

Scalp Massage In Marathi

Scalp Massage In Marathi

 

खरं तर भारतीय मसाज हा सोपा नाही.  हा केसांना आणि केसांच्या स्काल्पना देण्याच्या विविध पद्धती आहेत. स्काल्प मसाज म्हणजे तुम्हाला अगदी केसांच्या मुळांपासून मसाज द्यावा लागतो. ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास आणि तुमचा नियमित तणाव कमी होण्यास मदत होते. खरंतर तुमच्या स्काल्पमुळे केसांना जास्त त्रास होतो. तुमच्या स्काल्पमध्ये कोंडा झाला अथवा कोरडा स्काल्प झाल्यास, केसगळती तसंच खाज अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे तुमच्या केसांचा स्काल्प योग्य आणि निरोगी राखणं आवश्यक आहे. त्यामुळेच नियमति केसांच्या स्काल्पना मसाज करणंही आवश्यक आहे. यामुळे केस मऊ आणि मुलायम राहून केसांच्या समस्यांपासून तुम्ही दूर राहाता. 

वाचा – घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

ADVERTISEMENT

केसांसाठी मसाज करण्याचे फायदे (Hair Benefits Of Head Massage In Marathi)

 

केसांना मसाज करण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण असेल तर त्याचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला केसांना अथवा डोक्याला मसाज करण्याने होतो. जाणून घेऊया नक्की काय फायदे होतात तुमच्या केसांना – 

मायग्रेन अथवा डोकेदुखीतून होते सुटका

 

सतत ताण असल्यास, तुम्हाला मान आणि डोकेदुखीचा अथवा मायग्रेनचा त्रास सुरू होतो. तसंच तुम्ही दिवसभर काम करत असताना बसून राहाता. सतत लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये लक्ष घालून तुमची मान नक्कीच दुखते. पण तुम्हाला त्याचा ताण तुमच्या डोक्यावर अथवा मानेवर येत आहे हे त्या क्षणी जाणवत नाही. यापासून सुटका हवी असल्यास, तुम्हाला डोक्याचा, केसाचा आणि मानेचा मसाज करता येतो. यामुळे केसांमध्ये तेल लावून व्यवस्थित मसाज केल्यास, तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह उत्तम होतो आणि त्यामुळे तुम्हाला अधिक चांगलं वाटतं आणि रिलॅक्स वाटतं.

केसांची वाढ उत्तम होते

 

केसांची वाढ उत्तम होण्यासाठी तुम्हाला केसांचा मसाज उपयोगी ठरतो. केसांना मसाजमुळे अधिक चांगलं पोषण मिळतं आणि त्याव्यतिरिक्त स्काल्पला योग्य ऑक्सिजन मिळून केसातील कोंडा आणि इतर फॉलिकल्सपासूनही सुटका मिळते. उत्तम केसवाढीसाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी तुम्ही नियमित केसांचा तेलाने मसाज करणं आवश्यक आहे. तसंच तुमच्या केसांची काळजी घेणंही गरजेचं आहे. जे तुम्ही नियमित मसाज केल्याने केस व्यवस्थित राहतात. त्यावर प्रदूषण, धूळ आणि मातीचा जास्त परिणाम होत नाही आणि केसगळतीपासूनही तुमचे केस दूर राहतात.

शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकण्यास मदत

Benefits Of Head Massage In Marathi

Benefits Of Head Massage In Marathi

ADVERTISEMENT

 

तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी केसांच्या मसाजाचा उपयोग होतो. तसंच तुमच्या शरीरातील अयोग्य घटक अर्थात टॉक्झिन्स बाहेर काढून टाकण्यासाठीही याची मदत होते. केसांचा मसाज व्यवस्थित केल्यास, तुम्हाला अधिक रिलॅक्स वाटतं आणि रक्तप्रवाह नीट झाल्याने शरीरातील अपोषक तत्व निघून जाण्यास मदत होते. कदाचित तुम्हाला नक्की शरीरातील टॉक्झिन्स कसे निघतील असा प्रश्न पडू शकतो. पण तुमच्या केसांना मसाज केल्यामुळे तुमच्या शरीराला थंडावा मिळतो आणि शरीरातील टॉक्झिन्स निघून जायला मदत होते.

वाचा – केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

झोप येत नसल्यास, मिळवून देते आराम

 

बऱ्याचदा तणावामुळे आणि शारीरिक त्रासमुळेही झोप येत नाही. पण अशावेळी तुम्हाला केसांच्या मसाजची अत्यंत आवश्यकता असते. तुमच्या शरीराला अधिक रिलॅक्स होण्यासाठी अशा मसाजची गरज होते. कारणम या मसाजमुळे तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या होतात आणि त्यामुळे शरीराला जितका त्रास झालेला असतो तो निघून जाण्यास मदत होते. तसंच अधिक ताण निघून जातो आणि झोप लवकर लागण्यासदेखील मदत होते. केसांच्या मसाजमुळे डोकं हलकं होऊन पटकन झोप लागते.

ताणापासून सुटका

Head Massage In Marathi

Head Massage In Marathi

ADVERTISEMENT

 

आपण पहिल्यापासून हेच म्हणत आहोत की केसांच्या मसाजमुळे ताणापासून पटकन सुटका मिळते. केसांच्या मसाजमुळे डोकं हलकं होतं आणि त्यामुळे शरीरातील नसा मोकळ्या होतात. तुम्हाला व्यायाम केल्यानंतर ज्याप्रमाणे आराम मिळतो.  तसंच ताणापासून सुटका मिळाल्यानंतर तुम्ही अगदी रिलॅक्स फिल करू शकता. म्हणूनच नेहमी दिवसभर थकवा आल्यास केसांचा मसाज करणं योग्य मानलं जातं.  कारण त्यामुळे शरीरातील सर्व थकवा काढून टाकण्यास केसांच्या मसाजची मदत होते.

उत्साह वाढवण्यास होते मदत

 

दिवसभर आपण अत्यंत कामात असतो.  त्यामुळे आपला उत्साह रात्रीपर्यंत पूर्ण निघून गेलेला असतो. पण तुम्हाला जर तुमचा उत्साह कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला केसांचा व्यवस्थित मसाज करून घेता येतो. त्यामुळे तुमच्या मेंदूलाही शांतता मिळते. 

वाचा – केसांच्या वाढीसाठी सर्वोत्कृष्ट तेल

स्मरणशक्ती वाढवण्यास होते मदत

 

स्मरणशक्ती एका वेळेनंतर तुम्हाला त्रासदायक ठरते. तुम्हाला बरंच काही आठवत नाही. त्यामुळे तुम्हाला केसांच्या मसाजमुळे स्मरणशक्ती वाढवणं अतिशय फायदेशीर ठरतं. एका ठराविक वयानंतर तुम्हाला स्मरणशक्तीमध्ये बदल दिसून येतो. त्यामुळे तुम्ही नियमित केसांना मसाज केल्यास, तुम्हाला याचा फायदा होतो. तुमची स्मरणशक्ती व्यवस्थित राखण्यास याचा उपयोग होतो.

ADVERTISEMENT

केसांचा मसाज करण्यासाठी उत्कृष्ट तेल (Best Hair Oils For Head Massage In Marathi)

 

केसांचा मसाज करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्याला लागतं ते म्हणजे तेल. पण यासाठी नक्की कोणतं तेल वापरायचं आणि कोणतं तेल फायदेशीर ठरेल हे आपण बघूया – 

1. तीळ आणि बदाम तेल (Sesame and Almond Oil)

 

तीळाचे आणि बदामाचे तेल बेस ऑईल म्हणून वापरण्यात येतात. तुमच्या स्काल्पमध्ये टाईटनेस आणि स्टिफनेस ठेवण्यासाठी आणि केसांना पोषण देण्यासाठी या दोन्ही तेलांचा वापर तुम्ही करू शकता. या दोन्ही तेलांचं मिश्रण करून तुम्ही केसांना मसाज केल्यास,  तुम्हाला केसवाढीसाठी याचा फायदा होतो. तसंच या तेलांमुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहातो आणि तुमच्या केसांना त्यामुळे पोषण चांगलं मिळतं. 

2. नारळ तेल (Coconut Oil)

 

नारळ तेल तर प्रत्येकाच्या घरात असतं. नेहमी मसाज करायचा असेल तेव्हा आपल्याला नारळाचं तेल पहिले आठवतं. कारण याचे केसांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे नेहमी वापरताना नारळाचं तेल आपण अधिक वापरतो. नारळाचं तेल थोडं गरम करून केसांना मसाज दिल्यास, याचा तुमच्या केसांवर जास्त चांगला परिणाम होतो. तसंच या मसाजमुळे तुमचा ताण कमी होऊन तुम्हाला अधिक चांगला आराम मिळतो. त्याशिवाय तुमचे केस लवकर पांढरे होत नाहीत. 

3. आयुर्वेदिक ऑईल (Ayurvedic Oil)

 

विविध वनस्पतीचे घटक घालून हे आयुर्वेदिक तेल वापरता येतं. या वनस्पती शिजवून त्याचं तेल काढण्यात येतं. त्यामुळे यामध्ये विविध पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांना योग्य पोषक तत्व व्यवस्थित मिळतात. तुम्ही आयुर्वेदिक तेलामुळे व्यवस्थित तुम्हाला केसांना मसाज करण्यात येतो. तसंच केसगळती थांबवण्यासाठी याचा उपयोगही होतो. 

ADVERTISEMENT

Also Read: Winter Skin Care Tips In Marathi

4. जास्वंदीचं तेल (Hibiscus Oil)

 

जास्वंदीच्या तेलाचे अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तेलाने तुम्ही केसांना मसाज केल्यास, तुम्हाला डोक्यालाही थंडावा मिळतो. विशेषतः तुम्ही गरमीच्या दिवसांमध्ये या तेलाचा केसांना मसाज करण्यासाठी वापर करू शकता. यामुळे तुमच्या केसांना तर नक्कीच फायदा होतो.  त्याशिवाय तुमच्या शरीरालाही फायदा होतो. तुमच्या केसांची मूळ मजबूत ठेवण्यासाठी आणि केसांचा योग्य रंग राखण्यासाठीही या तेलाच्या मसाजामुळे तुम्हाला फायदा मिळतो हे लक्षात घ्या. 

5. लव्हेंडर ऑईल (Lavender Oil)

 

लव्हेंडर ऑईलचा फायदा होतो, महत्त्वाचे म्हणजे तुम्ही केसांना मसाज केल्यास, तुम्हाला तुमचे केस लवकर वाढण्यासाठी फायदा होतो. यामध्ये अँटिबायोटिक्स आणि अँटिबॅक्टेरियल घटक असल्यामुळे केसांना योग्य पोषण मिळतं. तुम्ही यासाठी साधारण 3 चमचे कॅरिअर ऑईल, ऑलिव्ह ऑईल, नारळ तेल आणि लव्हेंडर तेल सर्व एकत्र करून त्याचं मिश्रण एकत्र करून केसांना मसाज करा. मसाज करून किमान 10 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर शँपू करून केस धुवा. तुम्ही आठवड्यातून असं दोन वेळा केल्यास, तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

6. पेपरमिंट एसेन्शियल ऑईल (Peppermint Essential Oil)

 

तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहासाठी या ऑईलचा मसाज केसांना उपयुक्त ठरतो. तसंच केसांची वाढ यामुळे चांगली होते. या तेलाने मसाज करून तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये शांतता निर्माण करू शकता. नारळ तेलामध्ये दोन थेंब पेपरमिंट एसेन्शियल ऑईल मिसळा आणि तुम्हाला याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून येईल.

ADVERTISEMENT

7. रोझमेरी ऑईल (Rosemary Oil)

 

तुमच्या केसांचा जाडपणा वाढवायचा असेल आणि केस व्यवस्थित वाढवायचे असतील तर तुम्हाला रोझमेरी ऑईलने केसांना व्यवस्थित मसाज केल्यास, त्याचे चांगले परिणाम मिळतात. तसंच तुमचा रक्तप्रवाह अधिक चांगला करण्यासाठीही रोझमेरी ऑईलचा उपयोग होतो. तुम्ही केस वाढवण्यासाठी काही उपचार करत असाल तर तुम्हाला याचा वापर करता येऊ शकेल. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम नसून स्काल्पमध्ये खाज येत असल्यासदेखील याचा मसाज तुम्ही करून घेऊ शकता. 

8. लेमनग्रास ऑईल (Lemongrass)

 

कोंडा हा प्रत्येकासाठी समस्या नक्कीच ठरतो. तुम्हाला तुमच्या केसांचं आरोग्य अधिक चांगलं ठेवयाचं असेल तर लेमनग्रास ऑईलचा तुम्हाला उपयोग करून घेता येतो. कोंड्याच्या समस्येवर या रामबाण उपाय आहे. तुम्ही लेमनग्रास ऑईलने व्यवस्थित मसाज केल्यास, तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होतो. तुम्ही तुमच्या नेहमीच्या शँपू अथवा कंडिशनरमध्ये  दोन थेंब हे ऑईल मिसळूनसुद्धा याचा उपयोग मसाजसाठी करू शकता. 

9. टी ट्री ऑईल (Tea Tree Oil)

 

अँटिबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबायल घटक या ऑईलमध्ये असतात. ज्यामुळे केसांना चांगलं पोषण मिळतं. तसंच तुमच्या  केसांच्या वाढीसाठी या तेलाचा मसाज केसांना करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही तुमच्या नियमित शँपू आणि कंडिशनरमध्ये जर 10 थेंब टी ट्री ऑईल मिसळलंत तर तुमच्या केसांना नक्कीच त्याचा फायदा मिळतो. त्याचप्रमाणे याचा वापर तुम्हाला लाभदायक ठरत असेल तर तुम्ही नियमित याचा वापर करा. त्यामुळे तुमचे केस अधिक चांगले वाढतील. 

10. सीडरवूड एसेन्शियल ऑईल (Cedar-Wood Essential Oil)

 

सीडरवूड एसेन्शियल ऑईलमध्ये केसांना वाढवण्यासाठी सर्व आवश्यक पोषक तत्व असतात. तसंच तुमच्या स्काल्पमधील तेलनिर्मिती करणाऱ्या ग्रंथीद्वारे केसगळती थांबण्यासही या केसांच्या मसाजमुळे शक्य होतं. तसंच यामध्ये अँटिफंगल आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात. ज्यामुळे केसांतील कोंडा निघून जाण्यास मदत होते. तसंच केसांची वाढ यामुळे व्यवस्थित चांगली होते. 

ADVERTISEMENT

हेअर मसाजसाठी टिप्स (Tips For Head Massage In Marathi)

 

  • स्काल्प व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही नेहमी हेअर मसाज  आपल्या बोटांनी करावा
  • तुम्ही केसांना नीट मसाज केल्यास, तुमच्या रक्तप्रवाहामध्ये सुधारणा होते
  • नेहमी तुमच्या केसांना  मसाज करताना तुम्ही कानांपासून सुरूवात करा. त्यानंतर मध्यभागी मसाज करा आणि मग पुन्हा अशीच प्रक्रिया तुम्ही करा. या पद्धतीला ओरिएंटल मसाज पद्धत असंही म्हणतात
  • तसंच तुम्ही सर्क्युलर मोशनमध्येही मसाज करू शकता. ज्यमुळे तुमचं डोकं आणि मानदेखील रिलॅक्स राहते. या केसाच्या मसाजमुळे तुमच्या शरीराला योग्य थंडावा मिळतो आणि रिलॅक्सेशनही मिळतं. 
  • तुमचा मसाज जास्तीत जास्त नीट होण्यासाठी तुम्ही नेहमी बोटांनी मसाज करत सर्क्युलर मसाज करावा

प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. हेअर मसाज आठवड्यातून किती वेळा करू शकतो ?

 

हेअर मसाज आपण आठवड्यातून दोन वेळा तर नक्कीच करू शकतो. आपल्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही तीनवेळादेखील तुम्ही मसाज करू शकता.

2. हेअर मसाज करण्याने काही दुष्परिणाम होतात का ?

 

हेअर मसाज करण्याने तसं तर काही दुष्परिणाम होत नाहीत. पण तुम्ही त्यासाठी कोणतं तेल वापरत आहात हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे मसाज करताना नेहमी आपण कोणतं तेल वापरणार आहात त्याची खात्री करून घ्या. 

3. हेअर मसाज नियमित करण्याने केसांना फायदा मिळतो का ?

 

केसांची योग्य वाढ होण्यासाठी आणि केसगळती थांबण्यासाठी तुम्ही नियमित हेअर मसाज करायला हवा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळतो.

13 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT