ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
मध खाण्याचे फायदे त्वचा, केस आणि आरोग्यासाठी (Honey Benefits In Marathi)

मध खाण्याचे फायदे त्वचा, केस आणि आरोग्यासाठी (Honey Benefits In Marathi)

मध हा असा पदार्थ असतो जो प्रत्येकाच्या घरात आपल्याला दिसून येतो. मधाचे अनेक फायदे आहेत. अगदी सौंदर्यापासून ते आरोग्यापर्यंत अनेक फायदे आपल्याला मधापासून मिळत असतात. मध हा खरं तर प्रत्येकाच्याच आवडीचा पदार्थ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधाचा आपल्या आरोग्यासाठी बराच फायदा होत असतो. अगदी खोकल्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मधाचा उपयोग करून घेता येतो. पण त्याचा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कशा रितीने उपयोग करून घेण्यात येतो हे या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अगदी अनादी काळापासून आयुर्वेदातही मधाचे फायदे (madh khanyache fayde in marathi) सांगण्यात आले आहेत. मधामुळे तुमचं सौंदर्यच नाही तर तुमचं आरोग्यदेखील तितकंच चांगलं राहातं. मधामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहाता. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुम्हाला मध नक्कीच सापडेल. मध खाण्याचे फायदे (madh khanyache fayde in marathi) नक्की काय आहेत ते आपण जाणून घेऊया. 

मधाचे काय आहेत पोषक तत्व (Nutritional Value Of Honey)

Nutritional Value Of Honey

Nutritional Value Of Honey

ADVERTISEMENT

मधामध्ये तुमच्या आरोग्याला पोषक अनेक तत्व आपल्याला सापडतात. मध हे अगदी आयुर्वेदातपासून औषध म्हणून वापरण्यात आलेलं आहे. साधारण 100 ग्रॅम मधामध्ये 304 कॅलरीज असतात. यामध्ये अजिबात फॅट अर्थात चरबी साठण्यासाठी कोणतंही तत्व नाही. तसंच कोलेस्ट्रॉल आणि सोडियमदेखील 0% इतकं असतं. त्यामुळे मध हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ समजण्यात येतो. विशेषतः चरबी कमी करण्यासाठी याचा जास्त उपयोग करण्यात येतो. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यातून रोज एक चमचा मध घेतल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते. दिवसातून एक चमचा मध हा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम करतो हे नेहमी लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही नियमितपणे मधाचा उपयोग करून घ्यायला हवा. मधामधील पोषक तत्व तुम्हाला नेहमीच वजन कमी करण्यासाठी आणि तुमचं आरोग्य संतुलित राखण्यासाठी मदत करतं. त्याशिवाय घरात मध नेहमीच असतं. तुम्हाला फक्त याचा वापर तुमच्या आयुष्यात रोजच्या रोज करायचा आहे. जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य आणि सौंदर्य अबाधित राखू शकता. तुम्हाला तुमच्या शरीरातील चरबी कमी करायची असल्यास तर याचा उपयोग नक्कीच करून घ्या.

मध खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे (Honey Benefits In Marathi For Health)

वर आपण म्हटल्याप्रमाणे मध हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आपण मधाने नक्की शरीराच्या आरोग्यासाठी काय उपयोग करून घेता येतो ते पाहूया – 

वजन नियंत्रणात आणण्यासाठी (Weight Loss)

Weight Loss

ADVERTISEMENT

तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी रोज गरम पाण्यातून एक चमचा कच्चा मध घेतल्यास, तुम्हाला तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी फायदा होतो. तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी डॉक्टरदेखील तुम्हाला हा उपाय करण्याचा सल्ला देतात. इतकंच नाही तर तुम्ही जिममध्ये जात असाल तर तुम्हाला तिथेदेखील हा सल्ला देण्यात येतो. आरोग्यासाठी मधाचा हा सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे. 

वाचा – Ajwain Benefits In Marathi On Health

घसादुखी थांबण्यासाठी (Cure Throat Infection)

Throat Infection

घरात कोणालाही घसादुखी अथवा खोकल्याचा त्रास होत असेल तर सर्वात पहिलं औषध दिलं जातं ते म्हणजे मध. मधाने घसादुखी अर्थात घशाला कोणतंही इन्फेक्शन झालं असेल अथवा खोकला असेल तर तो बरा होण्यासाठी मदत होते. अगदी लहान मुलांनादेखील मध दिलं जातं. कारण मध हा खोकला थांबवण्यासाठी रामबाण इलाज समण्यात येतो. तसंच याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्यामुळे कोणाच्याही सल्ल्याशिवाय हा प्रमाणात तुम्हाला अगदी लहान मुलांनादेखील देण्यात येतो.

ADVERTISEMENT

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी (Boost Memory)

मधाने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. एका रिसर्चनुसार हे सिद्ध झालं आहे. रोज तुम्ही किमान 20 ग्रॅम मधाचं सेवन केल्यास, तुमच्या हार्मोन्सना एनर्जी मिळते आणि तुमची स्मरणशक्ती वाढते असं एका रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. 

ऊर्जा वाढते (Energy Source)

मध हा तुमची शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो. मधामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही. त्याने तुम्हाला काम करण्याची अधिक एनर्जी मिळते. यामध्ये असणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतामुळे तुम्हाला थकव्याची जाणीव होत नाही. 

शरीरातील साखरेच्या पातळीवर राहातं नियंत्रण (Blood Sugar Regulation)

Blood Suger Regulation

तुम्ही रोज मधाचं सेवन केल्यास, तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहातं. साखरेच्या सेवनाने तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र योग्य प्रमाणात रोज मध खाल्ल्यास, त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. मधामध्ये डेक्स्ट्रिन नावाचं फायबर असल्याने तुमच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं.

ADVERTISEMENT

कॅन्सरपासून करतं बचाव (Prevents Cancer)

हल्ली कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. पण नियमितपणे तुम्ही जर मधाचं सेवन केलं तर तुम्हाला प्रोटेस्ट कॅन्सर, त्वचेचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, कोलेस्ट्रॉल कॅन्सर यापासून बचाव करण्यासाठी याचा उपयोग होतो. मधात असलेल्या फ्लेवोनॉईड्स आणि अँटिऑक्सिडंट्समुळे कॅन्सरचे विषाणू शरीरापासून दूर राहण्यास मदत होते. 

पचनशक्तीसाठी उपयोगी (Helps Digestion)

Digestion

बऱ्याच जणांना पचनशक्तीची मोठी अडचण असते. नियमित मध खाल्ल्याने याचा शरीरावर अधिक चांगला परिणाम होऊन तुमची पचनक्रिया नियमित होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठ, पोट फुगणं यासारख्या आजारांवर मध हे चांगलं औषध आहे. मधातील बायफायडोबॅक्टेरियामुळे तुम्हाला या पोटाच्या त्रासापासून सुटका मिळण्यास मदत होते.

वाचा – तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे उपाय

ADVERTISEMENT

प्रतिकारशक्ती वाढवण्यास होते मदत (Increase Immune System)

रोज मध खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि त्यामुळेच तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्तीदेखील वाढते. मधामध्ये असणाऱ्या अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट्समुळेच तुमचं शरीर इतर आजारांशी लढण्यास समर्थ ठरतं.

वर्कआऊट इंजिन (Workout Fuel)

दिवसभर अनेक काम करण्यासाठी तुम्हाला अर्थात तुमच्या शरीराला ऊर्जेचं इंधन लागतं. तसंच तुम्ही जर जिमला जात असाल तर तुम्हाला व्यवस्थित एनर्जी लागते. मधाच्या सेवनाने रक्तप्रवाह अत्यंत उत्तम राहतो आणि त्यामुळे तुमच्या शरीराची सिस्टिमदेखील योग्य राहाते. त्यामुळे याचं नियमित सेवन करणं अत्यंत उपयुक्त आहे. 

अल्सरवर आहे उपायकारक (Reduce Ulcer)

बऱ्याच जणांची प्रकृती ही उष्ण असल्याने त्यांना वरचेवर अल्सरच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मधामध्ये नैसर्गिक अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल पोषक तत्व असल्याने अल्सरवर याचा चांगला औषधी परिणाम होतो. 

ADVERTISEMENT

मध खाण्याचे सौंदर्यवर्धक फायदे (Honey Benefits In Marathi For Skin)

आपण सर्वात जास्त आपल्या चेहऱ्याची काळजी घेत असतो. तुमचं अधिक खुलवण्यासाठी तुम्ही मधाचा उपयोग करून घेऊ शकता. नक्की मध खाण्याचे फायदे (honey benefits in marathi) सौंदर्यसाठी काय आहेत पाहूया – 

त्वचा दिसते तरूण (Smooth Youthful Skin)

Smooth Youthful Skin

मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. आपल्या शरीरातील रॅडिकल्ससह लढण्यासाठी मधात असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. तसंच आपल्या त्वचेला त्रासदायक ठरणाऱ्या UV किरणांपासूनदेखील मध रक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे तुम्ही तुमची त्वचा अधिक तरूण दिसण्यासाठी मधाचा वापर करू शकता. 

कसा करावा वापर – 

ADVERTISEMENT
  • आंघोळीला जाण्याआधी कच्चा मध तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा
  • साधारण 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग चेहरा धुवा

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी (Fades Scars)

Fades Scars

मधामध्ये असणाऱ्या अँटिइन्फ्लेमेटरी गुणामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यासाठी मदत होते. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील टिश्यूजचा त्रासही यामुळे कमी होण्यास फायदा होतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने डाग कमी होतात. 

कसा करावा वापर – 

  • नारळाचं तेल अथवा ऑलिव्ह ऑईल एक चमचा घेऊन त्यामध्ये एक चमचा कच्चं मध मिसळा
  • डाग असलेल्या ठिकाणी हे मिश्रण लावा आणि किमान दोन मिनिट्स हलक्या हाताने तुम्ही मसाज करा
  • एक टॉवेल गरम पाण्यात भिजवा त्यानंतर पाणी निथळून हा टॉवेल तुम्ही चेहऱ्यावर ठेवा. तो टॉवेल थंड झाल्यानंतर काढा
  • असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते

डोळ्यांसाठीही ठरतं फायदेशीर (Good For Eyes)

Good For Eyes

ADVERTISEMENT

मधाचा त्वचेसाठी खूपच चांगला उपयोग होतो. मुळात मधाने तुमची त्वचा अधिक चमकदार होते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली जरी ताणतणावामुळे काळी वर्तुळं जमा झाली असतील तरीही तुम्ही ते कमी करण्यासाठी मधाचा वापर करून घेऊ शकता. 

कसा करावा वापर – 

  • मध आणि बदामाचं तेल समप्रमाणात मिक्स करून घ्या
  • डोळ्यांखाली काळ्या वर्तुळांवर हे मिश्रण झोपायला जाण्यापूर्वी लावा
  • संपूर्ण रात्रभर असंच ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर धुऊन टाका

डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यास होतो उपयोग (Lighten Up Dark Circles)

Lighten Up Dark Circles

मधाचा त्वचेसाठी खूपच चांगला उपयोग होतो. मुळात मधाने तुमची त्वचा अधिक चमकदार होते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली जरी ताणतणावामुळे काळी वर्तुळं जमा झाली असतील तरीही तुम्ही ते कमी करण्यासाठी मधाचा वापर करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

कसा करावा वापर – 

  • मध आणि बदामाचं तेल समप्रमाणात मिक्स करून घ्या
  • डोळ्यांखाली काळ्या वर्तुळांवर हे मिश्रण झोपायला जाण्यापूर्वी लावा
  • संपूर्ण रात्रभर असंच ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर धुऊन टाका

त्वचा मॉईस्चराईज ठेवण्यासाठी होतो उपयोग (For Moisturize Skin)

For Moisturize Skin

मधामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स तुमची त्वचा अधिक मॉईस्चराईज ठेवण्यास फायदेशीर ठरतं. यासाठी तुम्ही घरच्या घरी फेशियल मास्क तयार करून तुमची त्वचा व्यवस्थित मॉईस्चराईज ठेऊ शकता. 

कसा करावा वापर – 

ADVERTISEMENT
  • एक चमचा कच्चा मध, एक चमचा मुलतानी माती आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्या
  • याची पेस्ट करून तुमच्या चेहऱ्यावर लावा
  • साधारण 15 मिनिट्सने पाण्याने तुमचा चेहरा साफ करा

केसांसाठी कसा कराल मधाचा उपयोग (Benefits Of Honey In Marathi For Hair)

केवळ चेहरा आणि आरोग्यासाठी नाही तर तुम्हाला मधाचा उपयोग केसांच्या सौंदर्यासाठीही करता येऊ शकतो याची माहिती आहे का? नसेल तर कसा त्याचा उपयोग करून घेता येऊ शकेल आणि काय आहेत मध खाण्याचे फायदे पाहूया – 

कोरड्या केसांसाठी (For Dry Hair)

Dry Hair

घनदाट, मऊ आणि मुलायम केस कोणाला आवडत नाहीत? पण हेच केस कोरडे झाले तर त्यावर तुम्ही मधाचा उपयोग करून घेऊ शकता. स्काल्पसाठीही मधाचा उपयोग होतो. यासाठी अत्यंत सोपी पद्धत तुम्ही करून पाहू शकता. 

ADVERTISEMENT

कसा करावा वापर – 

  • एक चमचा कच्चा मध घेऊन त्यामध्ये तुमचा नेहमीचा शँपू मिक्स करा
  • हे मिश्रण केसांना लावा आणि मग साधारण दोन ते तीन मिनिट्स तसंच बसा आणि मग धुवा

केसांना अधिक चमकदार बनवण्यासाठी (Make Your Hair Shiny)

Make Your Hair Shiny

चमकदार केस हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं आणि त्यासाठी आपण काहीही करत असतो. पण त्यासाठी तुम्ही घरच्या घरी मधाचा वापर करूनही केसांना चमक आणू शकता. 

कसा करावा वापर – 

ADVERTISEMENT
  • पाव कप नारळ तेल अथवा ऑलिव्ह ऑईलमध्ये अर्धा कप मध मिक्स करा
  • हे मिश्रण केसांना मुळांपासून लावा
  • साधारण 20 मिनिट्स असंच राहू द्या आणि त्यानंतर केस धुवा

स्काल्पमध्ये येणाऱ्या खाजेपासून मिळते सुटका (Relief From Itchy Scalp)

Relief From Itchy Scalp

काही जणांना स्काल्पमध्ये सतत खाज येण्याची समस्या असते. यावर मध हा उत्तम उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही त्रास घ्यायची गरज नाही. मधामध्ये असणाऱ्या अँटिफंगल गुणामुळे ही खाज निघून जाण्यासाठी मदत होते.

कसा करावा वापर – 

  • दोन चमचे पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळा
  • तुमच्या स्काल्पवर हे लावून किमान दोन मिनिट्स मसाज करा
  • त्यानंतर धुवा आणि परिणाम पाहा

हेअर कलर उजळवण्यासाठी परिणामकारक (Lightning Hair Colour)

Lightning Hair Colour

ADVERTISEMENT

हेअर कलर केल्यानंतर तो टिकवण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सच्या शँपूचा वापर केला जातो. पण त्यावर तुम्ही मधाचा सोपा आणि नैसर्गिक उपाय करून अधिक चांगल्या प्रकारे हेअर कलर उजवळण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. 

कसा करावा वापर – 

  • दोन चमचे पाण्यामध्ये तीन चमचे मध मिसळा
  • तुमच्या धुतलेल्या केसांवर हे मिश्रण लावा आणि किमान अर्धा तास तरी तसंच राहू द्या
  • त्यानंतर धुवा आणि परिणाम पाहा

कंडिशनर म्हणून करा वापर (As Hair Conditioner)

Hair Conditioner

आपण बाजारातून अनेक कंडिशनर आणत असतो. पण नैसर्गिक कंडिशनर म्हणून तुम्ही मधाचा वापर करून घेऊ शकता. यामुळे केसांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि शिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्सदेखील मिसळलेले नसतात. 

ADVERTISEMENT

कसा करावा वापर – 

  • दोन चमचे नारळाच्या तेलात एक चमचा मध मिसळा
  • केसांना खालपासून वरपर्यंत हे मिश्रण लावा
  • साधारण 20 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग धुवा

मधासंदर्भात प्रश्नोत्तरं (FAQ’s)

1. मधाचे काही दुष्परिणाम होतात का?

कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात खाणं योग्य आहे. मधाचंही तसंच आहे. तुम्ही नियमित मध हा एक चमचा खाल्ल्यास त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. मात्र तुम्ही जर त्यापेक्षा अधिक जर खाल्लात तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता अधिक निर्माण होते.  

2. मधाचा वापर केल्याने केसांना नुकसान पोहचत नाही ना?

मधामध्ये अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट्स गुण असल्याने मध हे नैसर्गिक औषध आहे. त्यामुळे केसांना मधाने काही नुकसान पोहचत नाही. 

ADVERTISEMENT

3. आरोग्यासाठी मधाने काही नुकसान पोहचतं का?

तुम्ही योग्य प्रमाणात मधाचं सेवन केल्यास आरोग्याला कोणतंही नुकसान पोहचत नाही. मध हे आयुर्वेदातील एक अत्यंत उपायकारक औषध आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

 

06 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT