लव्हेंडर हे एक सुंगधित फुलझाड आहे. या वनस्पतीवर लव्हेंडर रंगाची सुरेख आणि सुंगधित फुले येतात. प्राचीन काळापासून लव्हेंडर वनस्पतीपासून काढल्या जाणाऱ्या तेलाचा वापर आरोग्य आणि सौंदर्यासाठी केला जातो ज्याला लव्हेंडर ऑईल (Lavender Oil Meaning In Marathi) असं म्हणतात. या तेलाच्या वापरामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ उत्तम राहते. लव्हेंडरच्या सुकलेल्या फुलांचा आणि तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधनात मोठ्या प्रमाणात केला जातो. बाजारात सध्या लव्हेंडर इसेंशिअल ऑईल, लव्हेंडर बाथ जेल, लव्हेंडर स्क्रब, लव्हेंडरची सुकलेली फुलं आणि ताज्या फुलांचा अर्क, लव्हेंडर साबण, लव्हेंडर क्रीम आणि लोशन अशा स्वरूपात ते तुम्हाला उपलब्ध होते. मात्र असं असूनही आजही अनेकांना या औषधी आणि सुगंधित वनस्पतीबद्दल अज्ञान आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत लव्हेंडर तेल म्हणजे काय आणि त्याचा वापर आरोग्य आणि सौंदर्यासाठी कसा करावा (Benefits And Meaning Of Lavender Oil In Marathi) यासोबतच वाचा आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी ‘नारळाचे तेल’ (Benefits Of Coconut Oil In Marathi).
लव्हेंडर तेलाचे आरोग्यावर होणारे फायदे | Health Benefits Lavender Oil In Marathi
लव्हेंडरचा वापर अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी केला जातो कारण त्यातील औषधी गुणधर्म तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.
चिंता काळजी कमी होते
सध्याची जीवनशैली इतकी धकाधकीची आणि स्पर्धेची आहे की नकळत यातून चिंता, काळजी आणि ताणतणाव वाढत जातो. आजकाल यामुळे नैराश्याचे प्रमाणही वाढत जाते. नैराश्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी ताणतणाव नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे.ताण कमी करण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी आणि शांतता मिळण्यासाठी लव्हेंडर तेल नक्कीच फायदेशीर आहे. यातील औषधी गुणधर्मामुळे तुम्हाला शांतता मिळते आणि शरीराला आराम मिळतो. यासाठी तुम्ही घरात लव्हेंडर वनस्पती लावू शकता. घराच्या एखाद्या कोपऱ्यात लव्हेंडर तेलाचा अॅरोमा असलेले दिवे लावू शकता. या तेलाच्या वासामुळे तुम्हाला तरतरीत आणि फ्रेश वाटू लागते. तळहात आणि पायाच्या तळव्यांना लव्हेंडर तेल लावण्यामुळे तुम्हाला निवांत वाटते.
झोप लागण्यास मदत होते
सतत काळजी चिंता आणि ताणतणावाचा परिणाम तुमच्या झोपेवर होत असतो. कामानिमित्त रात्री उशीरापर्यंत जागरण करणे आणि पुन्हा सकाळी लवकर उठण्याची चिंता सतावणे यामुळे तुमची झोप कमी होते. कामासोबतच नातेसंबध आणि कौटुंबिक जबाबदारीच्या चिंतेमुळेही तुमची झोप कमी होते. एखाद्या आरोग्य समस्येमुळेही झोप कमी लागण्याची शक्यता असते. अशा वेळी लव्हेंडर तेलाचा वापर केल्यास तुम्हाला शांत निवांत झोप लागण्यास मदत होते. यासाठी रात्रीच्या वेळी घरात लव्हेंडर तेलाच्या अरोमाचा वापर करा अथवा हातपायाच्या तळव्यांना लव्हेंडर तेल चोळा. ज्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास मदत होईल.
वेदना कमी होतात
डोकेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, सांधेदुखी अशा अनेक आजारपणात वेदना असह्य झाल्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होते. पण अशा वेळी लव्हेंडर तेलाच्या मसाजमुळे तुमच्या वेदना कमी होतात. कारण या तेलामध्ये दाह आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात.
पचनशक्ती सुधारते
अयोग्य जीवनशैली आणि चुकीचा आहार याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. ज्यामुळे अपचनाचा त्रास वाढलेला दिसून येतो. पचनशक्ती कमजोर असेल तर त्यामुळे वारंवार पोटात दुखणे, उलटी, जुलाब, बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. लव्हेंडर तेलामुळे तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. यासाठी तुम्ही दिवसातून एकदा लव्हेंडर टी घेऊ शकता. ज्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होते आणि आतड्यांना आराम मिळतो. लव्हेंडरच्या सुकलेल्या पाकळ्या पाण्यात उकळून त्यापासून तुम्ही हा काढा अथवा चहा बनवू शकता. यासोबतच कडुलिंब तेलाचा उपयोग जाणून घ्या (Neem Oil Uses In Marathi)
श्वसनाचे आजारात आराम मिळतो
अस्थमा अथवा दम्यासारखे श्वसनाचे आजार लव्हेंडर तेलाने नियंत्रित ठेवता येतात. याचं कारण या तेलामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि सेप्टिक आणि अॅंटि इनफ्लैमटरी घटक आढळतात. ज्यामुळे त्याच्या औषधी सुंगधामुळे श्वसनमार्गातील जीवजंतू नष्ट होतात. काही संशोधनात असं आढळून आलं आहे की लव्हेंडर तेलाचा श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी चांगला फायदा होतो. अॅलर्जी कमी करण्यासाठी आणि श्वसनामार्ग निरोगी ठेवण्यासाठी या लव्हेंडर तेलाच्या सुंगधाचा वापर होऊ शकतो.
मूड सुधारतो
लव्हेंडर तेलामध्ये तुमच्या चिंता, काळजी कमी करण्याची आणि मेंदू आणि शरीराला आराम देण्याची क्षमता असते. लव्हेंडर तेलामुळे तुम्हाला शांत आणि निवांत वाटू लागतं. त्यामुळे मूड स्विंगच्या समस्येवर उपाय करण्यासाठी लव्हेंडर तेल नक्कीच परिणामकारक ठरते. मॅनोपॉज अथवा काही हॉर्मोनल समस्येमध्ये मूड स्विंग होण्याची शक्यता वाढते. अशावेळी लव्हेंडर तेलाचा मसाज केल्यामुळे अथवा घरात या अॅरोमाचा वापर केल्यामुळे तुमचा मूड लगेच बदलतो आणि तुम्हाला टवटवीत वाटू लागते.
सौंदर्यावर होणारे लव्हेंडर तेलाचे फायदे | Beauty Benefits Lavender Oil In Marathi
आरोग्याप्रमाणेच केस आणि त्वचेवरही लव्हेंडर तेलाचा चांगला परिणाम दिसून येतो. यासाठी जाणून घ्या सौंदर्यावर होणारे लव्हेंडर तेलाचे अफलातून फायदे
सनबर्नपासून आराम
लव्हेंडर तेलात अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅंटि सेप्टिक गुणधर्म असतात. ज्याचा वापर तुमच्या त्वचेवर एखाद्या औषधाप्रमाणे करता येतो. जर तुमची त्वचा सनबर्नमुळे पोळली असेल त्यामुळे त्वचेवर काळे डाग निर्माण होतात आणि त्वचा पोळली गेल्यामुळे त्वचेमध्ये दाह जाणवतो. मात्र अशा वेळी नारळाच्या तेलात मिक्स करून लव्हेंडर तेल अशा जखमा अथवा त्वचेवर लावण्यामुळे चांगला आराम मिळतो.त्वचेमध्ये जाणवणाऱ्या वेदना तर यामुळे कमी होतातच शिवाय सनबर्नचे डागही हळू हळू कमी होतात. आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठी फायदेशीर आहे आर्गन ऑईल (Benefits Of Argan Oil).
टोनरप्रमाणे करता येतो वापर
स्किन केअर रूटिनमध्ये क्लिंझिंग आणि मॉईस्चराईझिंग प्रमाणे टोनिंगही खूप गरजेचं असतं. कारण त्यामुळे त्वचेला चांगला थंडावा मिळतो. लव्हेंडर तेलाचा वापर तुम्ही एखाद्या टोनरप्रमाणे त्वचेवर करू शकता. कारण यामुळे सैल त्वचा पुन्हा खेचली जाण्यास मदत होते. त्वचेखाली रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. त्वचेला तजेला मिळाल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते. यासाठी थोड्या पाण्यात लव्हेंडर तेलाते काही थेंब मिसळून तुम्ही घरच्या घरी त्वचेसाठी टोनर तयार करू शकता. थोड्यावेळ हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा आणि मग त्याचा वापर करा ज्यामुळे चांगला परिणाम त्वचेवर जाणवेल.
त्वचा डिटॉक्स होते
त्वचा निरोगी राहण्यासाठी ती मुळापासून स्वच्छ आणि डिटॉक्स करणं गरजेचं असतं. कारण दैनंदिन जीवनात त्वचेचा सतत धुळ, माती, प्रदूषण आणि मेकअपमधील हानिकारक केमिकल्ससोबत संपर्क येत असतो. ज्यामुळे त्वचेचे पोअर्स ब्लॉक होतात आणि त्वचेवर याचा वाईट परिणाम होतो. मात्र लव्हेंडर ऑईलमुळे तुमच्या त्वचेच्या मुळाशी असलेले जीवजंतू नष्ट होतात. यातील अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे त्वचा योग्य पद्धतीने डिटॉक्स होते.
अॅक्ने कमी होतात
लव्हेंडर तेलामध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात. ज्यांचा वापर तुमच्या त्वचेवरील पिंपल्स म्हणजेच अॅक्नेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. या तेलात असलेले अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅंटि सेप्टिक गुणधर्म तुमच्या त्वचेमधील जीवजंतूना नष्ट करतात आणि मुळापासून त्वचा निरोगी आणि स्वच्छ करतात. शिवाय या तेलामुळे अॅक्नेमुळे त्वचेवर होणारा दाह आणि जळजळही कमी होते. यासाठी एका कॉटनपॅड अथवा बडवर थोडं लव्हेंडर तेल घ्या आणि पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात
वातावरणातील फ्री रेडिकल्सचा तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर वयाआधीच फाईन लाईन्स आणि सुरकुत्या निर्माण होतात. एजिंग मार्क कमी करण्यासाठी तुम्ही लव्हेंडर तेलाचा वापर करू शकता. कारण या तेलात भरपूर प्रमाणात अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचा पुन्हा तजेलदार आणि चिरतरूण दिसू लागते.
डार्क स्पॉट्सवर उपाय
वातावरणातील बदलांमुळे त्वचेवर काळे डाग आणि व्रण निर्माण होतात. अती जागरण आणि कामाच्या चिंतेचा परिणाम तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. मात्र अशा परिस्थितीत त्वचेला नैसर्गिक उजाळा देत काळे डाग कमी करण्यासाठी तुम्ही लव्हेंडर तेलाचा वापर करू शकता. लव्हेंडर तेलामध्ये तुमच्या त्वचेवरील हायपरपिंगमेंटेशनला कमी करणारे गुणधर्म असतात.
केसांची वाढ होण्यास मदत
आजकाल केस गळणे ही अनेकांची समस्या आहे. सतत केस गळण्यामुळे डोक्यावर टक्कल पडण्याची शक्यता असते. अशा वेळी लव्हेंडर तेल लावण्यामुळे केसांची वाढ होऊन केस गळणे नक्कीच कमी करता येते. लव्हेंडर तेल केसांना लावण्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते, ताणतणाव कमी होतो आणि स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते. ज्याचा चांगला परिणाम केसांच्या मुळांवर होतो. केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.
उवा मरतात
लव्हेंडर तेलात अॅंटि सेप्टिक गुणधर्म असल्यामुळे आणि या तेलाला एकप्रकारचा उग्र सुगंध असल्यामुळे याचा वापर तुम्ही उवा मारण्यासाठी करू शकता. लहान मुले अथवा उवा असलेल्या मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे उवा होतात. उवा आणि लिखांवर वेळीच उपाय केले नाहीत तर त्याची वाढ जोमाने होते आणि मग त्रास वाढत जातो. उवांमुळे केसांच्या त्वचेत सतत जळजळ होत राहते. यासाठीच उवा मारण्यासाठी केसांच्या मुळांना लव्हेंडर तेल लावून ठेवा. या तेलाच्या वासाने उवा मरतात आणि त्वचेची जळजळ कमी होते. वीस मिनीटांनी उवा मारण्याचा शॅंपू लावून केस धुवा आणि केस विंचरून मेलेल्या उवा काढून टाका.
लव्हेंडर तेलाचे फायदे आणि निवडक प्रश्न – FAQ’s
1. लव्हेंडर तेलाचा वास घेणे सुरक्षित आहे का ?
लव्हेंडर तेलाला एक प्रकारचा उग्र सुगंध असतो. या सुंगधामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होतात. मात्र यासाठी थेट नाकात हा गंध ओढून घेऊ नये. यामुळे कधी कधी रक्तदाब वाढण्याची, ताप येण्याची शक्यता असते.
2. त्वचेवर थेट लव्हेंडर तेल लावता येतं का ?
लव्हेंडर तेल हे एक इसेशिअल ऑईल आहे. त्याला एक उग्र अरोमा आहे. त्यामुळे असं तेल थेट त्वचेवर लावण्यापेक्षा नारळाच्या तेलात अथवा पाण्यात मिसळून ते डायल्यूट करावं आणि मग त्वचेवर लावावं.
3. लव्हेंडर तेलाचे काही दुष्परिणाम आहेत का ?
लव्हेंडर तेल जरी औषधी तेल असलं तरी त्याचा किती प्रमाणात वापर करावा हे खूप महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने आणि अती वापर केल्यास त्यामुळे त्वचेचं आणि आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. या तेलाच्या अती वापरामुळे डोकेदुखी, चक्कर, बद्धकोष्ठता, मळमळ, उलटी होण्याची शक्यता आहे.