व्यायामासाठी खास वेळ काढणे अनेकांना जमत नाही. कामाच्या डेट लाईन, प्रवास यामध्ये व्यायामासाठी वेळ काढणं फारसं जमत नाही. पण आज आम्ही तुम्हाला असा सोपा प्रकार सांगणार आहोत जे तुम्ही रात्री झोपताना किंवा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा करु शकता. दिवसातून केवळ 20 मिनिटं तुम्ही हा व्यायाम केला तरी तुम्हाला त्याचे फायदेच फायदे मिळू शकतील आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते जाणून घेऊया
फिट राहण्यासाठी करिना करते ‘ही’ कठीण योगासने
काय आहे हा व्यायाम प्रकार
shutterstock
आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की, नेमकं काय असं काय करायचे आहे तुम्हाला . तर तुम्हाला पाय वर करुन किमान 20 मिनिटं झोपायचे आहे. भिंतीचा आधार घेऊन तुम्ही हा प्रकार करु शकता. तुम्हाला भितींचा आधार न घेता पाय वरुन करता आले तर फारच उत्तम पण सुरुवातीला तुम्ही भितींचा आधार घेऊन हा व्यायाम करु शकता.
जाणून घ्या याचे 5 फायदे
पाठीच्या कण्याला मिळतो आराम
तुमचा दिवसभर प्रवासात आणि ऑफिसमध्ये बसून जात असेल तर तुमच्या पाठीच्या मणक्याची होणारी बिकट अवस्था आम्हालाही माहीत आहे. तुम्हालाही तुमच्या पाठीला आराम द्यायचा असेल तर मग तुम्ही पाय वर करुन राहायलाच हवे. तुमच्या पाठीला आवश्यक असलेला आराम यामध्ये मिळू शकतो. तुमची पाठ दुखत असेल तर तुम्हाला त्यामुळे बरे वाटू शकते.
योगासनांचा सराव सुरू करताय, मग या गोष्टी जरूर लक्षात ठेवा
पायातील फॅट होते कमी
shutterstock
काही जणांचे पाय हे तुलनेने फारच जाड असतात. म्हणजे त्यांच्या पोटऱ्या या फार मोठ्या वाटतात.अशांनी तर हा व्यायाम अगदी हमखास करायला हवा. कारण जर तुम्हाला पायांचा व्यायाम करण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही याने तुमच्या व्यायामाची सुरुवात करु शकता. पाय वर करुन तुम्ही हवेत ठेवू शकता. तुम्हाला कालांतराने यामध्ये झालेला फरक जाणवेल. पाय वर केल्यानंतर तुमचा रक्तप्रवाह बदलतो. तुमच्या पायांसाठी आवश्यक असलेली उर्जा निर्माण होऊन तुमच्या शरीरातील फॅट कमी होते.
पायाची सूज कमी करण्यास मदत
काहींना पायांना सूज येण्याची सवय असते. अशांना व्यायाम करणे फारच कठीण होते. अशावेळी पायांची सूज कमी करण्यासाठी तुम्ही हा व्यायाम प्रकार करु शकता. तुम्हाला भिंतीचा आधार घेऊन पाय वर करुन ठेवता येईल. तुमच्या पायाचे दुखणे आणि सूज दोन्ही कमी होईल.
रक्तपुरवठा होतो चांगला
shutterstock
आपण दिवसभर उभे असतो. अशावेळी आपले रक्त पायांच्या दिशेने धावत असते. शिर्षासनासारखी आसने प्रत्येकालाच करायला जमतात असे नाही काहींना खाली डोकं वर पाय अशा स्थितीत राहता येत नाही. जर तुम्हाला शरीरातील इतर भागांना रक्तपुरवठा करायचा असेल तर तुम्ही हा व्यायाम करायला हवा. कारण पाय वर केल्यामुळे रक्त तुमच्या इतर अवयवांना मिळते.
आराम मिळतो
तुम्ही जर खूप थकलेले असाल तर तुम्हाला पाय वर करुन 20 मिनिटं ठेवायला हवीत. कारण अनेकदा आपण पायांची काळजी घेत नाही. त्यांनाही आरामाची गरज असते. जर तुम्ही पायांना आराम मिळावा म्हणून पाय वर हवेत ठेवले तर तुम्हाला आराम मिळू शकेल. चांगली झोप लागेल आणि तुम्हाला पायांसदर्भातील तक्रारी होणार नाहीत.
त्यामुळे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे नक्की ट्राय करा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.