मॅचा टी हा ग्रीन टी चा एक प्रकार आहे. हा एक जपानी चहा आहे. बहुतांश जपानी लोक रोजच या चहाचे सेवन करतात. हा चहा खूप आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते. कॅमेलिया सिनेन्सिस या झाड्याच्या पानांपासून हा चहा बनवला जातो. या झाडाची पाने नैसर्गिक पद्धतीने सुकवून, हाताने कुस्करून किंवा पाट्यावर वाटून चहाची पावडर बनवली जाते. या पावडरला मॅचा असे म्हणतात. ग्रीन टीचे फायदे आपल्याला माहीतच आहेत. मॅचा टीमध्येही अनेक आवश्यक पोषणमूल्ये व अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यांचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. मॅचा टी त्वचेच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असल्याने अनेक ऑरगॅनिक सौंदर्यप्रसाधनांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. इतर प्रकारच्या ग्रीन टीच्या तुलनेत, मॅचा टी अनेक पौष्टिक घटकांनी समृद्ध असल्याचे सांगितले जाते. या चहामध्ये संपूर्ण पानातील पोषक घटक उतरले असतात.
मॅचा टी ची चव कशी असते
खरं सांगायचं तर ग्रीन टीची चव काही फार सुंदर लागत नाही. ज्याला आपला साधा आलं घालून केलेला कडक चहा आवडतो, त्याला ग्रीन टीची चव फार आवडेल अशी शक्यता नसते. पण आरोग्यासाठी चांगला म्हणून ग्रीन टी प्यायचा असतो. त्याची चव एखाद्या माईल्ड आयुर्वेदिक काढ्यासारखी लागते. मॅचा टी दिसायला तर खूप छान असतो.त्याचा रंग सुंदर व्हायब्रण्ट हिरवा असतो. त्याची चव मात्र एखाद्या ताज्या पालेभाजीसारखी लागू शकते कारण त्यात क्लोरोफिल भरपूर प्रमाणात असते. त्यात असणाऱ्या अमिनो ऍसिड्स मुळे त्याला नंतर थोडीशी गोडसर चव देखील येते. हा चहा आपल्या नेहमीच्या काळ्या चहाप्रमाणे भरपूर खळखळ उकळायचा नसतो तर उकळलेल्या पाण्यात चहाची पावडर घालून थोड्यावेळ मुरला की प्यायचा असतो. म्हणून याची चव माईल्ड असतो.
मॅचा टीचे आरोग्यदायी फायदे
भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स
इतर प्रकारच्या ग्रीन टीपेक्षा मॅचा टीमध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात. मॅचा मध्ये Epigallocatechin Gallate (EGCG) नावाचे नैसर्गिक अँटिऑक्सिडन्ट हे चायना ग्रीन टी पेक्षा 137 पट जास्त आहे, असे एका अभ्यासात म्हटले आहे. रोज मॅचा टीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट जातात जे शरीरातील निरोगी पेशींना फ्री रॅडिकल अटॅक आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतात.
कर्करोगाचा धोका कमी होतो
मॅच ग्रीन टीमध्ये असलेले पॉलीफेनॉल कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करून कर्करोगापासून शरीराचे संरक्षण करतात. EGCG या अँटिऑक्सिडंटमध्ये मध्ये ट्यूमरच्या दिशेने रक्ताचा प्रवाह रोखून धरण्याची व ट्यूमरची वाढ रोखण्याची क्षमता असते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा कर्करोगाशी जवळचा संबंध आहे. मॅचा टी अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्त्रोत असल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढा देतो आणि कर्करोगाचा धोका कमी करतो.
अधिक वाचा – सुंदर त्वचेसाठी असा करा टी बॅगचा वापर
टाईप-2 डायबिटीज वर नियंत्रण
तज्ज्ञांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की मॅचा टीमध्ये असलेल्या EGCG या अँटिऑक्सिडंटमध्ये रक्तातील ग्लुकोजची उच्च पातळी कमी करण्याची क्षमता आहे. मॅचा टी नियमितपणे प्यायल्याने स्वादुपिंडातील बीटा पेशींचे नियमन होते त्यामुळे इंसुलिन स्राव सुरळीत होण्यास मदत होते. वजन आणि शरीरातील चरबी कमी झाल्याने टाइप 2 मधुमेहाचा त्रास कमी होतो. मॅचा टी अतिरिक्त वजन आणि चरबी कमी करण्यास मदत करतो , इंसुलिनची क्रिया वाढवतो आणि स्नायूंमध्ये ग्लुकोजच्या प्रवेशास चालना देतो. अशा रीतीने रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज कमी करतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढणे
मॅचा टीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स रोगप्रतिकारक पेशींची क्रिया वाढवतात आणि ऑटोइम्युन डिसीज होण्याचा धोका कमी करतात. मॅचा टी रोगप्रतिकारक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या “रेग्युलेटरी टी सेल्स” ची संख्या वाढवतो. या पेशी आपल्या शरीराचे जंतूंच्या हल्ल्यापासून संरक्षण करतात.
ही कारणे वाचल्यावर मॅचा टी ट्राय करण्यास हरकत नाही.
अधिक वाचा – तुमच्या स्किन टाईपनुसार बनवा ग्रीन टी फेसपॅक, त्वचेसाठी होईल फायदा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक