ADVERTISEMENT
home / आरोग्य
बदामाच्या दुधानंतर आता बटाट्याचा दुधाला मोठी मागणी, जाणून घ्या फायदे

बदामाच्या दुधानंतर आता बटाट्याचा दुधाला मोठी मागणी, जाणून घ्या फायदे

दूध हे पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. पण हल्ली दुधात इतकी बनावट आहे की, शुद्ध दुध कोणते? याची पारख करणे फारच कठीण जाते. त्यातच खूप जणांना लॅक्टोसची एलर्जी असल्यामुळे खूप जणांनी गायीचे किंवा म्हशीचे दूध पिणे सोडून दिले आहे. या दुधाला पर्याय म्हणून हल्ली बाजारात सोया मिल्क, बदाम मिल्क असे प्रकार मिळू लागले आहेत.त्यातच भर म्हणून की काय हल्ली बाजारात बटाट्याचे दूध असा प्रकारही मिळू लागला आहे. बटाट्याचे दूध हे आरोग्यासाठई फारच फायदेशीर असते असे म्हटले जाते. त्यामुळेच आता या दुधाची मागणी वाढू लागली आहे. वीगन नावाचा प्रकार जो आता फारच प्रचलित झाला आहे. अशांसाठी बटाटच्याचे दूध हे शाकाहारी मानले जाते. त्यामुळे त्यांच्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे.

असे काढले जाते बटाट्याचे दूध 

बटाट्याचे दूध आता अगदी सहज मिळू लागले आहेत. हे दूध आता अनेक ब्रँडसनी सुरु केेले आहेत. पूर्वी पाश्चिमात्य देशात हे दूध मिळत होते. पण आता मात्र आपल्या देशातही दे दूध मिळू लागले आहेत. बटाट्याचे दूध तयार करताना बटाटा चांगला सोलला जातो. किस काढून तो पिळून त्याचे दूध काढले जाते. त्यानंतर ते टिकण्यासाठी त्यावर प्रोसेस केली जाते आणि हे दूध पिण्यास योग्य केले जाते. त्यानंतर ते बाजारात मिळते. तुम्ही दूध थेट आणि मस्त पिऊ शकता. बटाट्याटचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत हे दूध प्यायल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात. बटाट्याच्या दुधाचे नेमके फायदे काय ते जाणून घेऊया.

आज आहे वर्ल्ड वडापाव डे, जाणून घ्या वडापावची रंजक कहाणी

बटाट्याच्या दुधाचे फायदे 

बटाट्याच्या दुधाची निर्मिती उगीचच झाली नाही. ते आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. त्याचे नेमके फायदे काय आहे ते जाणून घेऊया.

ADVERTISEMENT
  1.  बटाट्याचे दूध हे चरबीमुक्त असते. त्यामुळे त्यापासून फॅट वाढण्याची शक्यता मुळीच नसते. कारण यामध्ये चरबीचे प्रमाण खूपच कमी असते.  
  2. बटाटच्याच्या दुधामध्ये व्हिटॅमिन D B1  आणि फॉलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असते.  
  3. बटाट्याच्या दुधात फायबर, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट असते जे शरीरासाठी फारच चांगले असते. 
  4. बटाट्याचे दूध हे पर्यावरण अनुकूल आहे त्यामुळे त्याचे कोणतेही साईड इफेक्टस होत नाहीत.
  5. अनेक आजारांपासून सुटका मिळण्यास बटाट्याचे दूध फारच फायद्याचे ठरते. 
  6. जर तुम्हाला फॅट वाढण्याची भीती असेल तर तुम्ही बटाट्याचे दूध प्यायला हवे. कारण बटाट्याच्या दुधामध्ये फारच कमी प्रमाणात फॅट असते. 

मधुमेहींनी असे करावे दुधाचे सेवन, नाही वाढणार ब्लड शुगर

बटाट्याच्या दुधाची किंमत

बटाट्याचे दूध पिण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बटाट्याचे दूधाची किंमतही माहीत हवी. बटाट्याचे दूध हे गायीच्या दुधाचा तुलनेत फारच महाग असा पर्याय आहे. बटाट्याचे दूध हे गायीच्या दुधाच्या चौपट महाग असते.

आता जर तुम्ही बटाट्याच्या दुधाचे सेवन करु शकता आणि त्याचे फायदे अनुभवू शकता.

मासिक पाळीचा त्रास होईल कमी, आहारात सोयाबीनचा करा वापर

ADVERTISEMENT
06 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT