ADVERTISEMENT
home / Diet
हिवाळ्यात खा रोस्ट केलेला लसूण, प्रतिकार शक्ती होईल मजबूत

हिवाळ्यात खा रोस्ट केलेला लसूण, प्रतिकार शक्ती होईल मजबूत

हिवाळ्याचे वातावरण हे दमट आणि कोरडे असल्यामुळे या  काळात आजारपणांचा धोका वाढतो. अशा वेळी आजारपणापासून दूर राहण्यासाठी आहारात प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ असायला हवेत. या काळात लसूण भाजून खाणे हे एखाद्या औषधापेक्षा नक्कीच कमी नाही. लसणामध्ये व्हिटॅमिन, लोह, कॅल्शिअम, मॅग्ननिज, पोटॅशिअम, अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे लसूण आहारात असेल तर तुमची रोग प्रतिकार शक्ती नक्कीच वाढते. या गुणधर्मांमुळे हिवाळ्यात होणाऱ्या इनफेक्शनला तोंड देण्यास शरीर तयार राहते. यासाठीच लसूण कच्चा खाण्यासोबत तो भाजून म्हणजेच रोस्ट करून खावा. जाणून घ्या भाजलेल्या लसणाचे अफलातून फायदे

रोग प्रतिकार शक्ती वाढते –

आज जगभरात कोरोनामुळे भितीचं वातावरण आहे. अशा काळात इनफेक्शनपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाची प्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भाजलेला लसूण फायदेशीर आहे. यासाठी दररोज सकाळी उठल्यावर अथवा रात्री झोपण्यापूर्वी भाजलेल्या लसणाच्या एक ते दोन पाकळ्या मधासोबत खाव्या. ज्यामुळे शरीरात पुरेशी प्रतिकार शक्ती निर्माण होते. वातावरणातील बदलामुळे होणारी सर्दी, खोकला अथवा तापाचा धोका कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय  आहे.

Shutterstock

ADVERTISEMENT

ह्रदयासाठी उत्तम –

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचा थर जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॅाक होतात. ज्यामुळे ह्रदयावर ताण येतो आणि ह्रदयाच्या समस्या निर्माण होतात. मात्र भाजलेला लसूण खाण्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. सहाजिकच शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे रूग्णाचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ह्रदयाच्या समस्या असणाऱ्या लोकांच्या आहारात यासाठी भाजलेला लसूण असणं फायदेशीर ठरेल. 

वजन नियंत्रणात राहते –

आजकाल प्रत्येकालाच वजन कमी कसं करावं ही समस्या भेडसावत आहे. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, कामाचा ताण, अयोग्य आहार, चुकीच्या  सवयी यांचा परिणाम तुमच्या वजनावर होत असतो. एकदा वजन अनियंत्रित झालं तर ते पुन्हा नियंत्रणात आणणं एक कठीण काम आहे. मात्र भाजलेल्या लसणामुळे तुमचे वजन कमी होऊ शकतं.कारण यातील पौष्टिक घटक तुमच्या शरीरातील फॅट्स कमी करतात आणि शरीराचे योग्य पोषण करतात. वजन नियंत्रणात असेल तर आजारापणांचा धोकादेखील आपोआप कमी होतो.

Shutterstock

ADVERTISEMENT

अस्थमापासून बचाव होतो –

लसणामध्ये असलेले पोषक घटक तुमचे अस्थमाच्या त्रासापासून संरक्षण करतात. यासाठीच ज्यांना अस्थमा अथवाा दम्याचा त्रास आहे त्यांच्या आहारात लसूण असायला हवा. लसणामुळे श्वसनाच्या समस्या नियंत्रणात येतात ज्यामुळे अस्थमामध्ये आराम मिळू शकतो. अशा लोकांनी दररोज भाजलेल्या लसणाच्या एक ते दोन पाकळ्या कोमट पाण्यासोबत घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो. 

कर्करोगाचा धोका कमी –

लसणामध्ये अॅंटि ऑक्सिडंट, अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि व्हायरल गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरात कर्करोगाची वाढ होत नाही. अशा गंभीर आजारपणाचा धोका टाळण्यासाठी लसणाचा वापर आहारात असायला हवा. 

भाजलेला लसूण खाण्याचे शिवायही अनेक आरोग्य फायदे आहेत. यासाठीच हिवाळ्यात तुमच्या आहारात लसणाचा वापर करा आणि सकाळी अथवा संध्याकाळी लसूणाच्या एक ते दोन पाकळ्या भाजून अवश्य खा.

आम्ही शेअर केलेल्या या टीप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

सोललेला लसूण फ्रेश राहण्यासाठी असा ठेवा साठवून

ADVERTISEMENT

सुकलेलं लसूण फेकण्याआधी हे वाचा.. तुम्हालाही बसेल धक्का

काळी लसूण आणि त्याचे आरोग्यदायी फायदे

04 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT