वर्षांनुवर्ष आपल्या जेवणात, मालिशसाठी आणि अगदी मंगल कार्यातही तिळाच्या तेलाचा (Sesame Oil) वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने तिळाचं तेल फायदेशीर मानलं जातं. कदाचित याचमुळे भारतात धार्मिक किंवा मंगल कार्यात तिळाचं तेल वापरण्यावर जोर दिला जातो. म्हणूनच हवन, पूजा- अर्चना आणि लग्नाच्या विधींमध्येही याचा वापर अनिवार्य मानला जातो. तिळाच्या तेलाचा वापर अनेक अन्नपदार्थात तर केला जातोच पण यातील औषधीय गुणांमुळे तिळाच्या तेलाचा वापर हा त्वचेला उजळवण्यासाठी आणि केसांचं पोषण करण्यासाठीही केला जातो. तिळाच्या तेल हे बियांपासून (sesame seeds) काढलं जातं. तिळाच्या बिया या छोट्या आणि पिवळ्या करड्या रंगाच्या असतात. ज्याचं मुख्यतः उत्पादन हे आफ्रिकेमध्ये आढळतं. चायनीज, जपानी आणि अन्य देशातील विविध पदार्थांमध्येही तिळाच्या तेलाचा वापर केला जातो.
Shutterstock
तिळाच्या तेलाचे इतके फायदे आहेत की, तुम्ही जर याबाबत ऐकलं तर जाणून हैराण व्हाल. तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमीन ई (Vitamin E), कॅल्शियम (Calcium), मॅग्नेशियम (Magnesium), फॉस्फोरस (Phosphorus) आणि प्रोटीन (Protein) आढळतं. केसांच्या संपूर्ण पोषणासाठी तिळाचं तेल हे खूपच फायदेशीर मानलं जातं.
तिळाचं तेल हलकं गरम करून घ्या, मग या तेलाचा हलक्या हाताने तुमच्या स्कॅल्पला मसाज करा. काही वेळ हे तेल केसांमध्ये असंच राहू द्या आणि मग नॉर्मल पाण्याने केस धुवून टाका. यामुळे केसांना आतून पोषण (nutrition) मिळेल.
मोहरीच्या बियाणांमध्ये अनेक फायदे
केसांना तिळाचं तेल लावल्याने त्यांचा कोरडेपणा दूर होतो आणि त्यांची हरवलेली चमक पुन्हा येते. जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असतील तर तिळाच्या तेलाचा वापर नक्की करा.
तिळाचं तेल केसांना फक्त चमकच नाहीतर त्यांना मजबूतीही देतं. जर तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर तिळाच्या तेलाचा वापर करा नक्की फायदा होईल.
तिळाच्या तेलाने मसाज केल्यास ब्लड सर्क्युलेशन (blood circulation) चांगलं होतं. ज्यामुळे केस लवकर वाढतात. जर केस पूर्ण वाढण्याआधीच तुटत असतील तर तिळाच्या तेलाचा वापर करावा.
केसांमध्ये कोंडा म्हणजेच डँड्रफ (dandruff) झाला असेल किंवा उवा झाल्या असतील तर तिळाचं तेल हे तुमच्यासाठी वरदान ठरेल. कारण कोंडा असो वा उवांचा त्रास दोन्हीपासून तुम्हाला लगेच सुटका मिळेल.
जाणून घेऊया टरपेंटाईन तेलाचे काही आश्चर्यकारक फायदे
Shutterstock
तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सुंदरता मिळवण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर नक्की करा.
सकाळी आणि संध्याकाळी तिळाचं तेल चेहऱ्याला लावल्यास त्वचेला आर्द्रता मिळते. थंडींच्या दिवसात चेहऱ्यावर तिळाचं तेल लावल्याने त्वचेवर ग्लो (glow) ही येतो.
या तेलातील अँटीऑक्सीडेंट (antioxidant) आणि व्हिटॅमिन ई (Vitamin E) या घटकांमुळे तुमच्या त्वचेतील फ्री रॅडीकल्सचं (free radicals) चा बचाव होऊन हे तेल सनस्क्रीनचं काम करतं.
चेहऱ्यावर तिळाचं तेल लावा आणि 5 मिनिटानंतर चेहऱ्यावर तांदूळाची पिठी लावून स्क्रब करा. स्क्रब केल्यावर तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि काही काळाने चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा. यामुळे तुमची त्वचा कोमल होईल.
तिळाच्या तेलामध्ये मुलतानी माती आणि हळद (turmeric) मिक्स करून 30 मिनिटं चेहऱ्यावर लावून तसंच ठेवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल आणि सन टॅनपासूनही बचाव होईल.
तिळाच्या तेलामध्ये एपल साईडर व्हिनेगर (apple cider vinegar) मिक्स करून चेहऱ्यावर लावा. मग थोड्या वेळाने गरम पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर जमलेली धूळ आणि घाण निघून जाईल आणि चेहरा तेलकटही दिसणार नाही.
वाचा – विषाणूच्या संसर्गावर उपयुक्त निलगिरी तेलाचे फायदे
Shutterstock
त्वचा आणि केसांसोबतच तिळाच्या तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. चला जाणून घेऊया हे फायदे.
तिळाचं तेल तुमच्या तोंडाच्या आत चारीबाजूला लावल्यास हिरड्यांची सूज कमी होते. सकाळी ब्रश करण्याआधी 10 मिनिटं दातांवर तिळाचं तेल चोळल्यास दात निरोगी राहतात. तिळाच्या तेलाचा उपयोग ऑईल पुलिंग (oil pulling) प्रक्रियेदरम्यानही केला जातो. या प्रक्रियेमध्ये काही काळासाठी तोंडात तेल धरून नंतर चूळ भरली जाते. असं म्हणतात की, तिळाच्या तेलाने तोंडातील सर्व हानीकारक कीटाणूंचा नाश होतो आणि दात चमकदार होतात.
तांब (Copper) हा स्वाभाविक रूपाने सूज कमी करणारा पदार्थ आहे. तिळाच्या तेलामध्ये तांब्याचं प्रमाण खूप जास्त असतं. ज्यामुळे सूज आणि गाठींसारख्या गंभीर समस्या कमी करण्यासाठी मदत मिळते. तसंच हे सांधेदुखीवरही गुणकारी आहे. हे सांध्यांची सूज कमी करतं आणि हाडं व रक्तवाहिन्यांना मजबूती देतं.
तिळाच्या तेलात तांब, जस्त आणि कॅल्शियम (Calcium) आढळते. हे तिन्ही खनिज पदार्थ शरीरातील हाडांना बळकटी देण्यात सहाय्य करतात. जर तुमच्या दैनंदिन जेवणात तेलाचा वापर केल्यास तुमची हाडं नक्कीच बळकट होतील. तिळाचं तेल वृद्धांमध्ये ऑस्टियोपोरोसिस (ostioporosis) आणि वयासंबंधित हाडाच्या अनेक आजारांपासून आपलं रक्षण करतं. तिळाच्या तेलातील जस्त आणमि तांब हे रेड ब्लड सेल्स (red blood cells), ब्लड सर्क्युलेशन (blood circulation) आणि मेटाबॉलिज्म (metabolism) च्या निर्मितीत मदत करतात. हे हाडांच्या पुननिर्मितीत मदत करतं.
तिळाच्या तेलामध्ये टायरोसिन (tyrosine) नावाचं अमिनो एसिड अधिक प्रमाणात आढळतं. टायरोसिन शरीरातील काही अशा एंजाइम (enzyme) आणि हॉर्मोन्सवर (hormone) भर देतं, ज्यामुळे व्यक्तीचा मूड चांगला राहतो आणि आनंदी वाटू लागतं. तिळाच्या तेलामध्ये सेरोटोनिन (serotonin) सुद्धा असतं. एक्सपर्ट्सनुसार, ज्या फूड प्रोडक्ट्समध्ये सेरोटोनिन असतं. त्यांचं सेवन केल्याने व्यक्तीला खूप सकारात्मक जाणवू लागतं आणि याने नैराश्य (stress/ depression) ही दूर होतं.
तिळ्याच्या तेलामध्ये सेसमीन आणि सेसमॉलचं चांगलंच प्रमाण आढळतं. हे आहेत पॉली अनसॅचुरेटेड फॅटी एसिड्स (polyunsaturated fatty acids) जे तुमच्या जेवणाची चव वाढवतात. तसंच हे हृदय प्रणालीलाही संतुलित आणि कॉलेस्ट्रॉल (cholesterol) चा स्तरही कमी करतात. हे शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉलचा स्तर संपवतात. जर तुम्ही खाण्यापिण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर केला तर स्ट्रोक (stroke) आणि हृदयविकाराच्या झटक्यापासून तुमचं संरक्षण होईल.
तिळाच्या तेलामध्ये फाइटेट (phytate) नावाचा कंपाउंड (compound) असतो जो सरळपणे कॅन्सर (cancer) चा विकास रोखण्यासाठी ओळखला जातो. तिळाच्या तेलामध्ये मॅग्नेशिअम (magnesium) चा स्तरही जास्त असतो. जो कोलोरेक्टल कॅन्सर (coloractal cancer) ची शक्यता कमी करण्यात मदत करतो. तिळाच्या तेलातील कॅल्शियम पोटाच्या कॅन्सरपासून बचाव करण्यात सहाय्यक मानलं जातं.
तिळाच्या तेलामध्ये आढळणाऱ्या पॉली अनसॅचुरेटेड फॅटी एसिड्स वजन घटवण्याची महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. हे लॅप्टीनच्या प्लाज्मा (plasma) स्तराला वाढवतात. हा एक असा हार्मोन आहे जो एनर्जी बॅलन्स ठेवतो आणि जेवणाची इच्छाही कमी करतो. जे लोकं नियमितपणे तिळाच्या तेलात बनवलेलं जेवण जेवतात त्यांचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
Shutterstock
लिव्हर (Liver) साठी तिळाचं तेल हे नैसर्गिक टॉनिकच्या रूपात काम करतं. हे रक्तप्रवाह सुधारतं. ज्यामुळे डोळ्यांचं पोषण होतं. ज्या लोकांना धूसर दिसतं किंवा ज्यांचे डोळे थकलेले दिसतात. त्यांनी हे तेल नक्की वापरावं. जर तिळाच्या तेलाने नियमितपणे डोळ्याच्या पाकळ्यांना मसाज केल्यास डार्क सर्कल्स (dark circles) आणि सुरकुत्या (wrinkles) दूर होण्यास मदत मिळते.
तिळाच्या तेलामध्ये लोह (iron) तत्व खूप चांगल्या प्रमाणात आढळतं. याच गुणामुळे हे एनीमियाच्या उपचारात मदत करतं. तिळाचं तेल फक्त एनीमियाच नाही तर संपूर्ण शरीरातील लोह घटकाच्या कमतरतेमुळे होणार्या आजारांवर गुणकारी आहे.
जर 45 दिवस जेवण बनवण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही तेलाऐवजी तिळाच्या तेलाचा वापर केल्यास डायबिटीस (diabetes) म्हणजे मधुमेह पीडित व्यक्तींची ब्लड शुगर लेव्हल कमी होते. तिळाच्या बियांमध्ये मॅग्नेशियमसोबत अनेक इतरही पोषक तत्त्वं आढळतात. हे सर्व मिळून ग्लुकोजचा स्तर कमी करण्यात तिळाचं तेल सक्षम बनतं. ज्यामुळे डायबिटीजचा धोका टाळता येतो.
Shutterstock
तिळाचे फायदे तर आता तुम्हाला कळले असतीलच, आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तिळाच्या तेलाने मालीश करण्याने काय काय फायदे होतात.
1. केसांना तिळाच्या तेलाने मालिश केल्याने पातळ, निर्जीव आणि स्प्लीट एंड्सयुक्त केसांना नीट करता येतं. जर तिळाच्या तेलामध्ये ब्राह्मी किंवा अन्य काही आयुर्वेदीक औषधी घातल्यास खूप फायदा मिळतो.
2. थंडीमध्ये तिळाच्या तेलाने शरीराला मालीश केल्यास सर्दीपासून बचाव होतो. तीळ आणि खडीसाखरेचा काढा बनवून प्यायल्यास कफ बाहेर पडतो.
3. जर छोट्या मुलांना तिळाच्या तेलाने मालीश केल्यास त्यांचा शारीरिक विकास चांगला होतो. 4 आठवड्यांपर्यंत तिळाच्या तेलाने मालीश केल्यास शिशू विकासात सुधार होतो.
4. तिळाचं तेलाने रोज मालीश केल्यास प्रत्येक तऱ्हेच्या चर्म रोगांपासून मुक्तता मिळेल. तसंच त्वचेची आर्द्रताही परत मिळेल.
5. कंबर आणि पाठदुखीच्या परिस्थितीत तिळाच्या तेलात हिंग आणि मीठ मिक्स करून मालिश केल्यास नक्कीच फायदा होईल.
Shutterstock
तिळाच्या तेलाचा वापर आणि मालीश याशिवायही अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया याच्या फायद्यांबाबत
1. कधी कधी जास्त वयाची मुलंही पांघरूणात लघवी करतात. अशा परिस्थितीत 50 ग्रॅम तिळाच्या तेलामध्ये 200 ग्रॅम गूळ मिक्स करून सकाळ-संध्याकाळ मुलांना द्या. याची मात्रा फक्त 5-10 ग्रॅमचं असावी, काही दिवसातच मुलांची ही सवय सुटेल.
2. पोटात दुखत असल्यास कोमट पाण्यात काळे तीळ मिक्स करून प्यायल्यास बरं वाटेल.
4. जर दातांशी निगडीत एखादा त्रास असल्यास सकाळी दात स्वच्छ करण्याआधी रिकाम्यापोटी तीळ चावून खावेत. असं केल्याने दातांना मजबूती मिळते.
5. चेहऱ्यावरील डाग किंवा पिंपल्स घालवायचे असल्यास तीळ वाटून ते त्यावर लावावे. नक्कीच फरक पडेल.
एकीकडे तिळाच्या तेलाचे फायदे आहेत तर दुसरीकडे काही तोटेही आहेत. चला जाणून घेऊया तिळाच्या तेलाचा जास्त वापर केल्यास कसं नुकसानही होऊ शकतं.
1. वजनात वाढही होऊ शकते.
2. तिळाच्या सेवनाने एलर्जी (allergy) ही होऊ शकते. तीळ असो वा तिळाचं तेल जर तुम्हाला याची अलर्जी असेल तर यामुळे पचनसंबंधी समस्या, डोळे सूजणे, नाक वाहणे आणि दमा यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.
3. तिळाच्या तेलाचा जास्त वापर केल्यास कोलन कॅन्सर (colon cancer) चा धोकाही उद्भवू शकतो.
4. जर तुम्ही रक्त पातळ होण्यासाठीचं एखादं औषध घेत असाल किंवा काही औषधं घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच तिळाच्या तेलाचं सेवन करा.
5. तिळाच्या तेलाचं जास्त सेवन केल्याने एपेंडिक्सचं इंफेक्शनही होऊ शकता.
Shutterstock
तुम्हालाही पडतात का, तिळ आणि तिळाच्या तेलाबाबतचे पुढील काही प्रश्न
तिळाचं तेल आणि ऑलिव्ह तेल ही दोन्ही तेल आरोग्यासाठी चांगली असतात. कारण या दोन्ही तेलाच्या नियमित वापराने तुमच्या आरोग्याला नक्कीच फायदा होतो.
जर रिफाईन्ड तिळाचं तेल योग्यरित्या न साठवल्यास ते खराब होऊ शकतं. पण लक्षात घ्या भाजलेल्या तिळाचं तेल हे चांगलं असलं तरी ते लवकर खराब होतं. त्यामुळे जोपर्यंत तिळाच्या तेलाचा वास चांगला येत आहे तोपर्यंतच ते वापरावं.
1/4 कप तिळाच्या बिया 1 तेलात गरम करा. यासाठी कॅनोला किंवा व्हेजिटेबल तेलाचा वापर करा. हे मिश्रण जास्तीत जास्त दोन मिनिटं गरम करा आणि मग यातील बिया गाळून घ्या. तयार आहे तुमचं घरगुती तेल.
नारळ किंवा तिळाचं तेल ही दोन्ही तेल भारतीय जेवणात नियमितपणे वापरली जातात. पण तिळाच्या तेलापेक्षा नारळाचं तेल हे ऑईल पुलिंगसाठी चांगलं मानलं जातं.
पुढे वाचा –