Power Nap म्हणजे डुलकी अथवा छोटी झोप. ज्यामुळे तुमच्या शरीर आणि मनाला आराम मिळतो. सात आठ तासांची गाढ झोप न घेताही तुम्हाला यामुळे पटकन फ्रेश वाटू लागतं. बरेच लोक लंच ब्रेकमध्ये जेवण झाल्यावर काही मिनीटं डुलकी घेतात. असं करणं योग्य की अयोग्य असा प्रश्न वादाचा ठरू शकतो. कारण कामाच्या ठिकाणी झोपणं ही चुकीची गोष्ट आहे. कामाच्या ठिकाणी काम करण्यासाठी पैसे दिले जातात मग या वेळेत झोपणं योग्य ठरू शकत नाही असं अनेकांचे मत असेल. पण मुळातच पॉवर नॅप अथवा डुलकी म्हणजे झोप नाही. त्यामुळे कामाचा ताण वाढल्यास असं करण्यास काहीच हरकत नाही असं अनेक आरोग्य तज्ञ्जांचं म्हणणं आहे. पॉवर नॅप म्हणजे कामामध्ये घेतलेला एक छोटा ब्रेक असतो. असा ब्रेक घेतल्यामुळे काम करण्याचा उत्साह अधिक प्रमाणात वाढतो. अनेक संसोधनात असं आढळून आलं आहे की, डुलकी घेतल्यानंतर माणूस जास्त फ्रेश होतो, ज्यामुळे त्याची काम करण्याची क्षमता आणि इच्छा वाढते. तुमच्या स्मरणशक्तीतही यामुळे वाढ होते. म्हणूनच खूप वेळ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही अशी पॉवर नॅप घेण्यास काहीच हरकत नाही.
कामाच्या ठिकाणी पॉवर नॅप घेण्याचे फायदे – Benefits of taking power nap at work in marathi
कामाच्या ठिकाणी झोप घेणं चुकीचं असलं तरी काही मिनीटांसाठी पॉवर नॅप घेण्यात काहीच अयोग्य नाही. जर तुम्ही खूप वेळ काम करत असाल तर असा छोटा ब्रेक घेतल्यानंतर तुमचा कामाचा शीण त्वरीत दूर होतो.
मूड चांगला होतो
डुलकी अथवा पॉवर नॅप घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे तुमचा मूड चांगला होतो. बऱ्याचदा एकच प्रकारचे काम करून, कामाचा ताण वाढल्यामुळे तुमची चीडचीड होत असते. याचा नकळत परिणाम तुमच्या कामावर आणि सहकाऱ्यांसोबत असलेल्या सबंधांवर होत असतो. एखाद्या मीटिंगआधी अथवा एखाद्या खास प्रेझेंटेशनआधी जर तुम्ही पॉवर नॅप घेतली तर तुमच्या कामावर चांगला परिणाम होऊ शकतो. कारण डुलकी घेतल्यामुळे तुमचा मेंदूला आराम मिळतो, तुमची एकाग्रता आणि सावधपणा वाढतो. ज्याचा तुमच्या कामावर चांगला परिणाम होतो.
एनर्जी वाढते
लंच केल्यावर कामावर लगेच फोकस करणं कठीण असतं. त्यामुळे अशा वेळी फ्रेश होण्यासाठी काही लोक जेवणानंतर कॉफी अथवा धुम्रपानाची मदत घेतात. पण कॉफी आणि धुम्रपान दोन्ही तुमच्या आरोग्यासाठी हितकारक नाहीत. त्याऐवजी जर तुम्ही एक छोटी डुलकी कामाच्या ठिकाणी घेतली तर तुम्हाला लगेच फ्रेश वाटतं आणि काम करण्याचा स्टॅमिना वाढतो. काही संशोधकांच्या मते बर्नआऊट ही एक आरोग्य समस्या आहे. काही लोकांना कामाच्या ठिकाणी आलेल्या ताणामुळे हा त्रास जाणवतो. अशा लोकांनी जर पंधरा मिनीटांसाठी पॉवर नॅप घेतली तर त्यांना बर्नआऊटचा त्रास कमी करण्यास मदत होते. यामुळे तुमच्या ह्रदयाचे कार्य तर सुधारतेच पण शरीराला चांगली ऊर्जादेखील मिळते.
कितीवेळ घ्यावी पॉवर नॅप
किती वेळ पॉवर नॅप घ्यावी हे त्या व्यक्तीच्या कामाचे स्वरूप आणि शरीर प्रकृतीवर अवलंबून आहे. मात्र पॉवर नॅप साधारणपणे पंधरा मिनीटे ते तीस मिनीटे घ्यायला हवी. काही ऑफिसमध्ये यासाठी खास नियम करण्यात आलेला असतो. कंपनी साधारणपणे तीस मिनीटे कर्मचाऱ्यांना पॉवर नॅप घेण्यासाठी ब्रेक देते. कारण पॉवर नॅप घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढते असा त्यांचा अनुभव आहे. मात्र प्रत्येकाने आपल्या कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण पाहूनच पॉवर नॅप घ्यावी. जर शक्य असेल तर अगदी पाच मीनिटांची डुलकीदेखील तुम्हाला पटकन फ्रेश करू शकते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक