आपल्या देशात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या केल्या जातात याला काहीतरी पूर्वापार अशी परंपरा आहेत आणि काही कारणं देखील आहेत. आता कमरेतील कडदोराच (Waist Chain) घ्या ना. लहान बाळाच्या कमरेला अनेकदा तुम्ही कडदोरा बांधलेला नक्कीच पाहिला असेल. इतकेच काय तर खूप मोठ्यांच्याही कमरेला कडदोरा बांधलेला असतो. पण कमरेत कडदोरा नेमका कोणत्या कारणासाठी बांधला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया कडदोरा बांधण्याचे कारण. या शिवाय काळा दोरा पायात का बांधला जातो ते देखील वाचा.
कडदोरा म्हणजे काय?
भारतात दागिने घालण्याची परंपरा आहे. शरीराचा ठळक दिसणाऱ्या भागावर कायम काहीना काही दागिने घातले जातात. आपआपल्या ऐपतीनुसार सोने, चांदी, तांबे आणि त्या खालोखाल दोरा असे आपल्या शरीराला सजवण्याची खूपच जुनी अशी आपली परंपरा आहे. पण या परंपरेसोबत काही कारणांसाठी हे दागिने घालते जातात. वेगवेगळ्या अवयवांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना असलेली बाधा दूर कऱण्यासाठी ते घातले जातात.
कडदोरा किंवा करदोरा याच्याबाबतीतही असेच काहीसे सांगितले जाते. कमरेत बांधला जातो त्यासाठी त्याला कडदोरा असे म्हटले जाते. आता वर सांगितल्याप्रमाणे ज्याला जसे परवडते त्यानुसार त्या प्रकारात कडदोरा हा बांधला जातो.
कडदोरा बांधण्यामागे असू शकतात ही काही कारणे
कमरेला कडदोर बांधण्याची अनेक कारणं आहेत. त्यामागील काही शास्त्रीय कारणे देखील आहेत. ही शास्त्रीय कारणे कोणती आहेत. ती जाणून घेऊया.
- कमरेत काळा दोरा बांधण्यामागे कारण असे की, त्यामुळे इडापीडा दूर राहते.त्यामुळे येणारे आजारपणे हे दूर राहण्यास मदत मिळते.
- कंबर हा शरीराचा रुंद असा भाग आहे. आरोग्याच्या अनेक तक्रारी या पोटापासून सुरु होतात. अशावेळी कंबरेला दोरा बांधल्याने त्याला होणारी बाधा ही आवळली जाते. त्यामुळे पोटदुखी होत नाही.
- कमरेत ज्यावेळी आपण दोरा बांधतो. त्यावेळी दोऱ्याचे कमरेशी घर्षण होत असते. त्यामुळे कमरेला ॲक्युप्रेशर मिळण्याचे काम मिळते. त्यामुळेही कमरेच्या किंवा पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.
- पूर्वीच्या काळी डॉक्टर पावला पावलावर नव्हते. त्यामुळे एखादा इलाज करायचा असेल तर त्यासाठी वाट पाहावी लागायची. अशावेळी कडदोरा हा तात्पुरता आराम देण्यासाठी चांगला आहे असे मानले जात होते. म्हणून प्रत्येकाच्या कमरेला कडदोरा बांधला जायचा.
- जंगल किंवा शेतात काम करताना पोटाला कडदोरा बांधला जाई. कारण अशाठिकाणी सर्प दंशाची भिती अधिक होती. सर्पदंश शरीरात भिनू नये यासाठी कमरेत कडदोरा बांधला जाई. ज्याचा उपयोग करुन सर्पदंशाचेे विष टाळता येते. प्रथमोपचार म्हणून हाच कडदोरा घट्ट बांधला जात होता. ज्यामुळे सर्पदंशटाचा विपरित परिणाम होत नसे.
आता कडदोरा बांधताना तुम्हाला नेमक्या कोणत्या कारणासाठी तो बांधायचा आहे. हे जाणून मगच तो कंबरेला बांधा.