महिलांसाठी मसाज किती महत्वाचा आहे हे याआधीही आम्ही अनेक लेखांमधून मांडले आहे. महिन्यातून एकदा तरी मसाज केला तर स्नायू रिलॅक्स होतात आणि शरीराचे कार्य उत्तम राहते. महिलांमध्ये साधारण 25 वर्षानंतर कॅल्शिअम कमी होऊ लागते. त्यामुळे हाड ठिसूळ होण्याची अधिक शक्यता असते. याशिवाय त्वचा ही उतरु लागते.स्तनांचा आकार बदलतो. स्तनांचा आकार चांगला राहावा असे वाटत असेल स्तनांचा मसाज हा फारच गरजेचा आहे. पण नुसता स्तनांचा आकार योग्य राहण्यासाठी किंवा उभारी देण्यासाठीच नाही तर अन्य काही महत्वाच्या कारणांसाठीही महिलांना स्तनाचा मसाज करणे फार गरजेचे असते. जाणून घेऊया महिलांनी नेमका कोणत्या कारणांसाठी करायला हवा स्तनांचा मसाज
कानांचा मसाज करुन काहीच मिनिटात घालवा तुमचा stress
नसा होतात मोकळ्या
स्तनांना योग्य वयात मसाज केला तर बाळंतपणानंतर जाणवणाऱ्या तक्रारी जाणवत नाहीत. काही जणांना बाळंतपणानंतर दूध येण्यास अडथळा निर्माण होतो. असे म्हणतात जर स्तनांच्या नसा मोकळ्या झाल्या नाही तर असा त्रास होऊ शकतो. जर तुम्ही असा मसाज केला तर तुमच्या नसा मोकळ्या होण्यास मदत मिळते. बदलते लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्यांच्या सवयीमुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतात. जर तुमच्या छातीच्या खालची त्वचा ही कडक झाली असेल तर तुम्ही मसाज करा त्यामुळे तुमच्या नसा मोकळ्या होण्यास मदत मिळते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला त्रास होणार नाही.
वर्कआऊटनंतर मिळतो आराम
जर तुम्ही जिममध्ये जात असाल आणि वेट्सने वर्कआऊट करत असाल तर चेस्ट वर्कआऊट करताना बरेचदा छातीकडील भाग हा ताठ होतो. बरेचदा नसावर नसा चढतात. पण त्या आपल्याल जाणवत नाही. काहींना हालचाल करताना त्रास होतो. पण सगळ्यांनाच असा त्रास जाणवोच असे नाही. जर तुम्ही चेस्ट वर्कआऊट करत असाल तर हमखास मसाज करा. त्यामुळे छातीकडे निर्माण झालेले टेन्शन कमी होण्यास मदत मिळेल.
चेहऱ्याला सतत मसाज करत असाल तर आताच थांबवा कारण…
स्तनांना मिळते उभारी
स्तनांची उभारी ही महिलांची ओळख असते. ज्यांच्या स्तनांचा आकार मोठा असतो त्यांनी स्तनांचा मसाज करायला हवा. स्तनांना योग्य मसाज करत राहिला तर स्तनांचा आकार चांगला राहतो. शिवाय ज्यांना स्तनांचा आकार आकर्षक हवा असेल अशांनीही मसाज केला तरी देखील स्तनांना उत्तम उभारी मिळते. त्यामुळे स्तनांच्या सौंदर्यांसाठी असा मसाज करायला हवा.
तिळाचे तेल आहे फायद्याचे
मसाजसाठी विशिष्ट तेलाचा वापर करणे हे खूप गरजेचे असते. जर तुम्ही मसाज करुन घेत असाल तर तिळाच्या तेलाचा वापर करा. तिळाच्या तेलामध्ये अधिक उष्णता असते. या उष्णतेमुळे आराम मिळण्यास मदत मिळते. खूप जण नारळाच्या तेलाचा उपयोग करतात. पण त्याचा तितकासा फायदा होत नाही. पण तिळाच्या तेलाच्या मालिशमुळे खूपच फायदा होतो. त्यामुळे आवर्जून तिळाच्या तेलाचा वापर करुनच मसाज करा.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्तनांचा मसाज का फायदेशीर आहे हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच महिन्यातून एकदा तरी मसाज करा.