आयुष्यात आपल्याला नेहमीच काही ना काही ताण असतो. त्यावरचा उपाय म्हणजे स्वतःसाठी वेळ काढून फिरायला जाणं. आपण बऱ्याचदा स्वतःसाठी वेळ काढत नाही. आपलं शिक्षण, करिअर, लग्न याशिवायदेखील आपल्याला आयुष्यात बरंच काही करण्याची गरज असते. तुमच्याजवळ खूप वेळ असला तरीही तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये गुंतलेले असता. मग ते वाचन असो अथवा अन्य कोणते काम अथवा ऑफिसचं काम. जेव्हा तुम्ही आयुष्याकडे मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की, तुम्ही आयुष्यात काही केलंच नाही. पण तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढून एकट्याने नक्कीच फिरायला हवं. आपल्या आयुष्यातील अडचणी वाढतील अथवा जबाबदाऱ्या वाढतील त्यापूर्वी वेळ काढून किमान स्वतःसाठी तरी Solo Trip करायला हवी. यासाठी तुम्हाला काही जास्त तयारी करण्याची गरज नाही तर हे फिरणं नक्कीच तुमच्या बजेटमध्ये होऊ शकतं. त्यासाठी फक्त वेळोवेळी तुम्हाला पैसे बाजूला काढून ठेवायला हवेत. जेणेकरून तुमच्या अंगावर अचानक खर्च येणार नाहीत आणि तुम्ही तुमची ट्रीपदेखील मनापासून एन्जॉय करू शकाल. सोलो ट्रीपसाठी नक्की कुठे कुठे जायचं हे आम्ही तुम्हाला सुचवू शकतो. तुम्हालाही तुमची सोलो ट्रीप ट्राय करायची असेल तर नक्की आता तयारीला लागा. लग्न करण्यापूर्वी नक्कीच तुम्ही हा अनुभव घ्यायला हवा.
1. उदयपूर
तुम्हाला जर शाही थाट हवा असेल अथवा तुम्हाला याची आवड असेल तर तुम्ही उदयपूर निवडा. इथल्या पिछोला तलावाच्या मागे असणारा महाल इतका सुंदर आहे की, तुम्ही इथे फिरताना इतर सर्व गोष्टी विसरून जाल. इथे राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी तुम्ही वेगवेगळे पर्याय शोधू शकता. तुम्हाला बऱ्यापैकी इथे स्वस्त मिळतं. या ठिकाणी तुम्हाला साधारण 400 रुपये एक रात्र राहण्याचे अशा तऱ्हेने dormitories मिळतील. तसंच तुम्ही इथले Street food देखील नक्की खाऊन बघायला हवे. या ठिकाणी मिळणारी दाल-बाटी आणि चूरमा-जिलेबी अप्रतिम असते.
2. वाराणसी
तुम्हाला वाराणसीमध्ये किमान 2-3 दिवस थांबायलाच हवं. भारतातील वाराणसी हा cultural hot-spot समजला जातो. गंगानदीच्या काठावर वसलेलं हे शहर तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे घाटांवर तुम्हाला अनेक cultural flavors चं जेवण मिळेल. तुम्हाला इथे स्वस्तात स्वस्त म्हणजे अगदी 200 रूपयेमध्येदेखील तुम्हाला राहता येतं. तसंच इथे बनारसी पान, बनारसी साड्या आणि ठंडाई या गोष्टी तुम्ही ट्राय करणं अगदी आवश्यक आहे. कारण हे केलं नाही तर तुम्ही तिथे जाण्यात काहीच अर्थ नाही. इथल्या पांडेयपूरमधील लवंगलतादेखील अतिशय प्रसिद्ध आहे. तुम्ही एकट्याने राहणार असाल तर फक्त इथल्या ठिकाणांचा नीट अभ्यास करूनच तुम्ही तिथे राहायला जा.
3. ऊटी
ऊटी इतकी स्पेशल जागा आहे की आजही बरेच जण इथे हनीमूनसाठी जातात. पण तुम्ही याठिकाणी जाऊन सोलो ट्रीप करण्याची मजाच वेगळी आहे. दक्षिण भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन ऊटी आहे. नैसर्गिक सौंदर्यासह तुम्ही इथे tea plantation आणि home-made chocolates देखील ट्राय करू शकता. तुम्हाला इथे सर्वात स्वस्त stay हा साधारण 300 रूपयांमध्ये मिळू शकतो.
4. लोणावळा
मुंबईच्या दगदगीतून वेळ काढून आणि जवळची जागा म्हणजे लोणावळा. याठिकाणी असणारे अनेक धबधबे आणि ट्रेकिंगसाठीदेखील अनेक जागा आहेत. तुम्हाला तुमच्या एकट्यासाठी वेळ काढायचा असेल तर तुम्ही कधीही याठिकाणी जाऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ठिकाण तुम्हाला कधीही जास्त महाग वाटणार नाही. इथे अनेक धर्मशाळा अथवा आश्रम आहेत. तुम्हाला हा पर्याय नको असेल तर तुम्हाला परवडणारी हॉटेल्सदेखील आहेत. तसंच खाण्यासाठी अनेक लहान लहान रेस्टॉरंट्स आहेत आणि त्याशिवाय रोडसाईड कॅफेदेखील आहे. इथे chocolate fudge खाणं कधीही विसरू नका.
5. नैनीताल
सुंदर आणि स्वस्त असं हे hill station असून नैनीताल एकट्याने फिरणं म्हणजे एक वेगळा अनुभवच आहे. याचं मुख्य attraction point आहे नैनी झील आणि त्याच्या आजूबाजूला असणारे डोंगर. हिमालयाच्या snow view साठी लागणारा rope-way चा अनुभव घ्यायला अजिबात विसरू नका. इथे राहण्यासाठी तुम्हाला खूपच चांगलं बजेट आहे. इथे तुम्हाला पंजाबी जेवण अतिशय चांगलं मिळत असून इथलं एका दिवसाचं minimum budget आहे 200 रुपये. बोटिंगसाठी 150 रुपये प्रति तास आणि rope-way साठी150 रुपये per person. त्यामुळे तुमच्या बजेट ट्रीपमध्ये हे तुम्ही आरामत फिरून येऊ शकता.
महाराष्ट्रात फिरा मनसोक्त, जाणून घ्या वैशिष्ट्य
6. हम्पी
History-lovers असाल तर यासारखी दुसरी जागा नाही. विजयनगरचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. तुम्ही जर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात इथे गेलात तर तुम्हाला हम्पी उत्सवाची धमालदेखील पाहायला मिळू शकते. बंगळूरूवरून तुम्ही केवळ 300 रुपयात इथे पोहचू शकता. तसंच इथे अनेक ठिकाणी home-stay आणि guest houses दोन्हीची व्यवस्था होते जी तुम्हाला साधारण प्रतिदिन 200 रुपयेपर्यंत उपलब्ध आहे. Sites बघण्यासाठी तुम्ही घोडागाडी करू शकता. ज्यासाठी तुम्हाला साधारण 50-100 रुपये इतका खर्च येतो.
7. एलेप्पी
तुम्हाला निसर्ग जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही याठिकाणी नक्की जायला हवं. केरळमधील ही जागा तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडेल आणि तुमच्या मनालाही शांतता देऊन जाईल. इथे भरपूर प्रमाणात lagoons आणि waterways आहेत जे पाहण्यासाठी तुम्ही हाऊसबोटचा वापर करू शकता. तसंच नारळाच्या पानातील sea food – Wow याची तर मजाच अनोखी आहे.
पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं
8. गोवा
बजेटमध्ये फिरायचं आहे आणि सोलो ट्रीप करायची आहे तर गोव्याचं नाव येणार नाही असं शक्यच नाही. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तुमचा प्लॅन कधीच यशस्वी होत नसेल तर तुम्ही एकटेच जा. इथले समुद्रकिनारे आणि गोव्याची सुंदरता तुमचा मूड नक्कीच फ्रेश करते. Beaches, forts, portuguese architecture, लोकल मार्केट आणि पब हे सर्व काही तुम्हाला एका फटक्यात मिळतं. तुम्हाला हवं तर तुम्ही स्कूटी किंवा बाईक भाड्याने घेऊन पूर्ण शहर फिरू शकता.
9. ऋषिकेश
तुमच्या तुमच्या रोजच्या आयुष्याला कंटाळला असाल आणि तुम्हाला काहीतरी आव्हानात्मक करायचं असेल तर ही नक्कीच चांगली आयडिया आहे. Water-rafting, beach-camps आणि treks हे अतिशय adventurous आहे. Valley of flowers बघण्यासाठीही तुम्हाला इथे जायला हवं. इथे राहणं आणि खाणं हेदेखील नक्कीच तुमच्या बजेटमध्ये आहे. शिवाय हे क्षेत्र alcohol-free आणि vegetarian अर्थात शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्हाला इथे खूपच मजा करता येते. शिवाय तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यापेक्षा एक वेगळा अनुभव इथे मिळतो.
फिरायला जाणार असाल तर तुमच्या बॅगमध्ये ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात
आम्ही तुम्हाला इथे सोलो ट्रीप आणि बजेट ट्रीपसाठी 9 जागा सांगितल्या. तुम्ही नक्कीच लग्नापूर्वी एकदा याचा अनुभव घेऊन बघा.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.