वाढदिवस हा नेहमीच लक्षात राहायला हवा. यासाठी त्याचे प्लॅनिंग हे देखील तसेच असायला हवे. तुमच्याही कोणत्या ओळखीच्या व्यक्तिचा, मित्राचा, प्रियकराचा, नवऱ्याचा, बायकोचा किंवा आई-बाबा यापैकी कोणचाही वाढदिवस असेल तर तुम्ही त्या वाढदिवसाचे प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने केले तर वाढदिवस हा कायमच सगळ्यांच्या लक्षात राहील. वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपण वाढदिवस तर करतोच पण घरी राहून वाढदिवसाचे बेस्ट प्लॅन करायचे असेल तर तुम्ही काही खास डेकोरेशन घरी राहूनच करु शकता.हे डेकोरेशन करणे फारच सोपे आहे. चला जाणून घेऊया कसे करायचे हे डेकोरेशन
बोअरींग पार्टीला आणा पार्टी गेम्सनी रंगत (Fun Party Game Ideas In Marathi)
साहित्य: नेटेड कपडा, बारीक लाईट, मेट्रेस किंवा कुशन, एक फ्लॅट टेबल, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स
- वाढदिवसासाठी काही खास डेकोरेशन डोक्यात असेल तर तुम्ही काही नेटचा कपडा वापरा. घराचा एखादा कोपरा हा तुम्हाला हे डेकोरेशन करण्यासाठी निवडायचा आहे.
- तुम्हाला टेंडसारखी बांधणी करायची आहे. त्यासाठी एक तुकडा घेऊन तुम्हाला वरच्या दिशेला बांधायचा आहे. त्या कपड्याला थोडेसे डेकोरेशन करण्यासाठी तुम्हाला त्यावर लाईट सोडायचा आहे. जर तुमच्याकडे नेटचा कपडा नसेल तर पातळ कपडा निवडा. एखादी साडी निवडली तरी देखील चालू शकेल.
- त्याच्यामधोमध एक जागा करुन त्यामध्ये एक छोटे टेबल ठेवा. त्याच्या आजुबाजूला तुम्हाला लाईट ठेवायचा आहे. त्यामुळे ती जागा एखाद्या कँडल लाईट टेबल प्रमाणे दिसेल . आता तुम्ही त्या टेबलर केक ठेवून सरप्राईड बर्थडे करु शकता
स्पेशल पार्टीसाठी मेन्यू ठरवत आहात, मग हे वाचाच (Party Menu Ideas In Marathi)
सरप्राईज 2
- जर तुम्हाला नेटचा सेटअप करायचा नसेल तर तुम्ही लाईट्स आणि कँडलच्या मदतीने देखील असे सरप्राईज प्लॅन करु शकता. तुम्हाला या साठी जास्तीत जास्त लाईट्स लागतील. जेवढच्या जास्त लाईट्स तेवढा एखादा अंधारा कोपरा चांगला दिसतो. त्यामुळे तुम्हाला आवडत असतील अशा भरपूर लाईट्स तुम्ही निवडाय त्याचा उपयोग करुन तुम्ही मस्त टेबल सजवा.
- यासाठी तुम्हाला एक छोटासा टेबल लागेल. तो जास्त उंचीचा नसावा.. जर तो जास्त उंचीचा असेल तर तुम्हाला उभ्याने केक कापण्यासाठीची तयारी करावी लागेल.
- जर याला अधिक चांगल्या पद्धतीने करायची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला काही फुगे फुगवून देखील त्याची अरेंजमेंट करु शकता. भीतींला रेडीमेड मिळणारे वाढदिवसाचे तोरण देखील तुम्हाला यामध्ये लावता येईल.
अशापद्धतीने वाढदिवसासाठी बेस्ट डेकोरेशन तुम्ही घरीच करा आणि वाढदिवस एकदम हटके पद्धतीने साजरा करा. त्यामुळे तुम्ही ज्याच्यासाठी ही सगळी तयारी केली आहे त्याला देखील याचा आनंद होईल.