केस चांगले असावे असे कोणाला वाटत नाही. केसांची काळजी घेण्यासाठीचा एकही उपाय आपण टाळत नाही. केसांना मसाज करणे, केस विंचरण्याची पद्धत, केस धुण्याची योग्य पद्धत हे सगळे काही आपण केस चांगले राहण्यासाठी फॉलो करत असतो. पण केसांची अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने काळजी घेतली तरी देखील केस चांगले राहण्यास मदत मिळत असते. दिवसभरात केसांची निगा राखण्यासाठी आपल्याला तितकासा वेळ मिळत नसेल पण तुम्ही रात्री केसांची अगदी सोप्या पद्धतीने काळजी घेऊ शकता. अशी काळजी घेतली तर तुमचे केस नक्कीच चमकदार दिसतील. चला जाणून घेऊया चमकदार केसांसाठी नेमकं काय करायला हवं ते
केसांच्या जटा सोडा
खूप जणांना केस विंचरण्याचा कंटाळा असतो. तुम्ही दिवसभर केस विंचरले नाही तरी चालतील पण रात्री झोपताना तुम्ही केस अगदी आतपासून नीट विंचरा. दिवसभर आलेला घाम आणि प्रदूषण या सगळ्याचा परिणाम हा केसांवर होत असतो. खूप जणांच्या केसांच्या आतल्या भागात केसांच्या गाठी झालेल्या असतात. केसांच्या गाठी होणे हे केसांच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत कारण त्या गाठी सोडवल्या नाहीत तर केस तुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या जटा सोडवा. आधी नुसत्या बोटांनी आणि मग कंगव्याने हळुवार गाठी सोडवा.त्यामुळे केसांना आराम मिळतो. केस श्वास घेऊ शकतात.
स्काल्प मसाज
केस सोडवल्यानंतर डोक्यात हात घालून स्काल्पला चांगला मसाज करा. या मसाजसाठी तेलाची अजिबात गरज नाही. फक्त बोटांनी हा मसाज केला तरी पुरेसा आहे. अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी हा मसाज करा. तुम्हाला अगदी निवांत झाल्यासारखे वाटले. काही जण विशिष्ट हेअरस्टाईल करतात. अशावेळी केसांची मुळ ताणली जातात. केसांच्या मुळांना आराम मिळवून देण्यासाठी अशा पद्धतीने केलेला स्काल्प मसाज हा फारच कामी येतो. म्हणूनच तुम्ही अगदी आवर्जून स्काल्प मसाज करायला विसरु नका.
केसांना ताणून बांधू नका
रात्रीच्या वेळी केस हे बांधायला हवेत हे आपण सगळेच जाणतो. केस बांधण्याचे अनेक फायदे आहेत. केसांच्या जटा या त्यामुळे होत नाहीत. शिवाय केसांच्या वाढीला चालना मिळते असे देखील म्हणतात. त्यामुळे रात्री झोपताना केसांची वेणी घालून झोपा. जर तुम्हाला केस कुरळे झालेले आवडत नसतील तर हलका पोनीटेल बांधला तरी देखील चालू शकेल. त्यामुळेही केस चांगले राहतात. सकाळी उठल्यावर केस चांगलेही दिसतात. त्यामुळे शक्य असेल तर केस हलके बांधा. झोपतानाही केस तुम्हाला अडथळा करणार नाही. फक्त केस अजिबात ताणून बांधू नका. त्याऐवजी ते हलके बांधले तर तुटतही नाहीत.
उठल्यावर केस सोडा
सकळी उठल्यानंतर केस बांधले असतील ते सोडा आणि पुन्हा एकदा स्काल्पवरुन मसाज करा म्हणजे तुम्हाला छान वाटेल. शिवाय केस स्टायलिंग करण्यासाठी तयार होतील. त्यामुळे उठल्यावर केस सोडायला अजिबात विसरु नका.
तुमचा दिवस संपला की मग तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला हवे असलेले रुटीन फॉलो करा.