ADVERTISEMENT
home / Acne
मुरूमांपासून सुटका मिळविण्यासाठी उत्तम ऑर्गेनिक उत्पादने

मुरूमांपासून सुटका मिळविण्यासाठी उत्तम ऑर्गेनिक उत्पादने

त्वचा निरोगी आणि सुंदर असेल तर आपोआप आत्मविश्वास वाढतो. मात्र तेच जर तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर वारंवार मुरूम अथवा पिंपल्स येत असतील तर तोच आत्मविश्वासा नकळत कमी होत जातो. अशा वेळी मुरूमांची समस्या स्वीकारत योग्य पद्धतीने त्वचेची निगा राखायला हवी. कारण तेलकट त्वचेवर सतत घेणाऱ्या चिकटपणामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरूम ( Acne) निर्माण होतात. जर अशा त्वचेवर चुकीची उत्पादने वापरली तर तुमची समस्या अधिक वाढू शकते. यासाठी जाणून घ्या मुरूमांपासून सुटका मिळविण्यासाठी उत्तम ऑर्गेनिक उत्पादने, जी तुमच्याकडे असायलाच हवीत (Best Organic Products for Acne free skin)

Best Organic Products for Acne free skin

ऑर्गेनिक हारवेस्ट नीम फेस वॉश ( Neem Face Wash)

तेलकट त्वचेमुळे तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतात. यासाठीच नियमित त्वचेची निगा राखण्यासाठी चेहरा वारंवार धुणं गरजेचं असतं. मात्र यासाठी तुम्ही कोणता फेसवॉश वापरता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण जर चुकीचा फेस वॉश वापरला तर तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होणार नाही आणि त्वचेशी सतत धुळ, माती, जीवजंतूंचा संपर्क झाल्याने तुमच्या त्वचेवर पुन्हा पिंपल्स येत राहतील. यासाठी ऑर्गेनिक हारवेस्टचा हा अॅंटि फंगल आणि अॅंटि बॅक्टेरिअल घटक असलेला नीम फेस वॉश बेस्ट आहे. यात नैसर्गिक कडूलिंबाचा अर्क असल्यामुळे त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होईलच शिवाय जीवजंतूदेखील नष्ट होतील.

नीम, टी ट्री अॅंड बेसिल अॅंटि अॅक्ने फेस स्क्रब (Neem, Tea Tree And Basil Anti Acne Face Scrub)

ऑर्गेनिक हारवेस्टप्रमाणेच तुम्ही शोधत असलेली नैसर्गिक उत्पादने तुम्हाला सेंट बोटानिकामध्येही मिळतात. या कंपनीचं हे अॅंटि एक्ने फेस स्क्रब तुम्ही तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी वापरू शकता. यामध्ये कडूलिंब, टी ट्री ऑईल आणि बेसिलच्या अर्काचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ, माती आणि प्रदूषण तर कमी होतेच शिवाय त्वचा मुळापासून स्वच्छ आणि मऊ होते. तेलकटपणामुळे ब्लॉक झालेले पोअर्स मोकळे होतात आणि त्वचेला पुरेसं ऑक्सिजन मिळतं. ज्यामुळे तुमची त्वचा पुन्हा टवटवीत दिसू लागते.

माय ग्लॅम सूपर फूड किवी अॅंड कोकोनट सनस्क्रिन  (Myglamm Superfood Kiwi And Coconut Sunscreen) 

तेलकट त्वचेला पिंपल्सपासून सुरक्षित करणं जितकं गरजेचं आहे तितकंच या त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेला एका बेस्ट सनस्क्रिनची गरज असते. मात्र इतर सनस्क्रिनमधील केमिकल्समुळे तुमच्या मुरूमांची समस्या अधिक वाढते. म्हणूनच नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेलं हे मायग्लॅमचं किवी आणि कोकोनट सनस्क्रिन तुम्ही तुमच्या त्वचेवर नक्कीच वापरू शकता. 

ADVERTISEMENT

दी मॉम कं. नॅचरल क्ले फेस पॅक (The Moms Co. Natural Clay Face Pack )

या फेसपॅकची खासियत ही आहे की, यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होते. कारण या फेसपॅकचा वापर केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा, ब्लॅक हेड्स, पिंपल्स आणि काळे डाग कमी होत जातात. त्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तुम्ही एखादा छान पॅक शोधत असाल तर तुमचा शोध नक्कीच संपला आहे असं म्हणावं लागेल. जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होईल, त्वचेची छिद्रे धुळ आणि अस्वच्छतेमुळे बंद झाली आहेत असं वाटेल तेव्हा तुम्ही हा मल्टी टास्किंग फेसपॅक नक्कीच वापरू शकता. 

कामा आर्युवेदा प्युअर रोज वॉटर (Kama Ayurveda Pure Rose Water)

जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी नैसर्गिक उत्पादनाच्या शोधात असाल, तर नियमित वापरा कामा आयुर्वेदाचे गुलाबपाणी. नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं हे गुलाबपाणी तुमच्या त्वचेला थंडावा नक्कीच देईल. त्वचेला आराम देण्यासाठी टोनर प्रमाणे तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवरील पिंपल्स कमी होतातच शिवाय चेहऱ्यावरील डाग आणि व्रणही विरळ होतात. त्वचेला स्वच्छ करण्यासोबत गरज असते हाडट्रेट ठेवण्याची… अशा वेळी तुमच्याजवळ हे नैसर्गिक गुलाबपाणी असायला हवं. 

ऑर्गेनिक व्हिटॅमिन बी सीरम ( Organic Vitamin B Serum)

त्वचेच्या योग्य पोषणासाठी त्वचेवर सीरम लावणं गरजेचं आहे. ज्यामुळे त्वचेला पोषणही मिळतं आणि फ्री रेडीकल्सपासून त्वचेचं संरक्षणही होतं. मात्र जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही सीरम लावण्याचा कंटाळा करता. अशा वेळी खास एक्ने कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेलं ऑर्गेनिक हारवेस्टचं हे व्हिटॅमिन बी सीरम तुम्ही त्वचेवर नक्कीच लावू शकता. यात पालकसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा घट्ट होते, टेक्स्चर सुधारतो आणि त्वचेवरील अतिरिक्त साठलेलं तेल निघून जातं. या सीरमचा वापर केल्यानंतर तुमच्या मुरूम असलेल्या त्वचेवर दाह होत नाही. तेलकट आणि मुरूम असलेल्या त्वचेसाठी हे उत्तम ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे.

आम्ही शेअर केलेली ही ऑर्गेनिक उत्पादने तुम्हाला कशी वाटली आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

20 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT