ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
मुंबईतील बेस्ट साऊथ इंडियन रेस्टॉरंट – Best South Indian Restaurants In Mumbai

मुंबईतील बेस्ट साऊथ इंडियन रेस्टॉरंट – Best South Indian Restaurants In Mumbai

 

दाक्षिणात्य खाद्यपदार्थ सर्वांनाच आवडतात. अनेकांची तर दिवसाची सुरूवातच इडली, डोसा, अप्पम, मेदूवडा या नाश्त्याने होते. साऊथ इंडियन खाद्यपदार्थांमुळे तुमचं पोटही भरतं आणि शरीराचं योग्य पोषणही होतं.गरमागरम इडली, डोसासोबत सर्व्ह केली जाणारी चटणी आणि सांबर तर अतिशय स्वादिष्ट लागतं. मुंबईत अनेक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहेत. मुंबईतील मांटुगा हे शहर तर साऊथ इंडियन रेस्टॉरंटसाठी प्रसिद्धच आहे. तुम्ही देखील जर साऊथ इंडियन पदार्थांचे चाहते असाल तर या फेमस रेस्टॉरंट्सनां नक्कीच भेट द्या. 

कॅफे मद्रास (Cafe Madras)

 

माटुंग्यात दक्षिण भारतीय रेस्टॉरंट्स अनेक आहेत. कॅफे मद्रास हे माटुंग्यातील लोकप्रिय हॉटेल गेली अनेक वर्ष ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे. इथे तुम्ही इडली, डोसा, पायनॅपल शिरा, नीर डोसास, रसम वडा, फिल्टर कॉफी असे अनेक प्रसिद्ध साऊथ इंडियन पदार्थ मिळतात. इथलं वातावरण अतिशय शांत रम्य असून इथे आल्यावर तुमचा  मूड नक्कीच चांगला होऊ शकतो. 

  • पत्ता – कामाक्षी बिल्डिंग, नं. 391/बी, भाऊदाजी रोड, माटुंगा, मुंबई 400019
  • वेळ – सकाळी 7 ते दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 4 ते 10:30
  • दोन माणसांचा खर्च – अंदाजे 250 रू. 
  • Zomato रेटिंग – 4.3

वाचा – मुंबई मधील सर्वोत्तम रूफटॉप रेस्टॉरन्ट

कॅफे मद्रास रेस्टॉरंट

Instagram

ADVERTISEMENT

बनाना लीफ (Banana Leaf)

 

बनाना लीफ या साऊथ इंडियन रेस्टॉरंटची साखळी मुंबईत अनेक ठिकाणी आहे. मात्र सोयीसाठी आम्ही तुम्हाला अंधेरीमधील एका रेस्टॉरंटची माहिती देत आहोत. या ठिकाणी तुम्हाला दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, खाद्य पदार्थ मिळू शकतात. इथली थाळी, फिल्टर कॉफी, नीर डोसा, अप्पम, कुर्ग इडली, इडली प्लॅटर प्रसिद्ध आहे. 

  • पत्ता – शुभम सोसायटी, विक्रम पेट्रोल पंपजवळ, जुहू वर्सोवा लिंक रोड, सात बंगला, अंधेरी पश्चिम.  मुंबई
  • वेळ – सकाळी 11 ते रात्री 12:30 
  • दोन माणसांचा खर्च – अंदाजे 900 रू.
  • Swiggy रेटिंग – 4.3
बनाना लीफ रेस्टॉरंट

Instagram

रामाश्रय (Ram Ashray)

 

मुंबईत माटुंगा हे असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला अनेक साऊथ इंडियन रेस्टॉरंट मिळतील. माटुंग्यातील रामाश्रय हे असंच एक लोकप्रिय हॉटेल आहे. जिथे तुम्ही तुमची दाक्षिणात्य पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण  करू शकता. तुमच्या आवडीचे पदार्थ या ठिकाणी तुम्हाला हे खास पदार्थ केळीच्या पानात सर्व्ह केली जातात. या ठिकाणी सकाळी नाश्ता करण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागते. कारण इथे दररोज फार गर्दी असते. मात्र घाबरण्याचं काहीच कारण नाही इथली सेवा फारच तत्पर आहे. शिवाय इथली चव तुम्हाला पुन्हा पुन्हा रामाश्रयमध्ये ओढून आणते. 

  • पत्ता – भांडारकर रोड, माटुंगा पूर्व
  • वेळ –  सकाळी 5 ते रात्री 9:30 
  • दोन माणसांचा खर्च – अंदाजे 200 रू. 
  • Zomato रेटिंग – 4.3

वाचा – खवय्ये असाल तर नक्की भेट द्या दक्षिण मुंबईतल्या बेस्ट रेस्टॉरंट्सना

ADVERTISEMENT
रामाश्रय रेस्टॉरंट

Instagram

दक्षियायन (Dakshinayan)

 

जर तुम्ही जुहूमध्ये फिरत असाल आणि तुम्हाला दाक्षिणात्य पदार्थांची चव  चाखायची असेल तर या रेस्टॉरंटमध्ये जरूर जा. इथली फिल्टर कॉफी, साधा डोसा, रवा डोसा, मसाला डोसा, रसम वडा, इडलीचे विविध प्रकार आणि अप्पम नक्कीच खास आहेत. शिवाय इथलं वातावरणही तुम्हाला नक्कीच आवडेल. 

  • पत्ता- हॉटेल आनंद, गांधीग्राम रोड, हरे कृष्ण मंदिराजवळ, जुहू, मुंबई
  • वेळ – सकाळी 11 ते रात्री 11 
  • दोन माणसांचा खर्च – अंदाजे  400 रू. 
  • Zomato रेटिंग – 4.2
दक्षियायन रेस्टॉरंट

Instagram

आर्या भवन (Arya Bhawan)

 

जर तुम्ही या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी जाण्याचा विचार करत असाल तर  तुम्हाला सकाळी लवकर इथे जावं लागेल. कारण या ठिकाणी नेहमीच फार गर्दी असते. भरपूर भुक लागल्यावर तुम्ही या हॉटेलमध्ये गेलात तर अगदी खाऊन भरपेटच घरी जाल इतके पदार्थ तुम्हाला खाण्यासाठी मिळतील. 

ADVERTISEMENT
  • पत्ता – माटुंगा रेल्वे स्थानकासमोर, माटुंगा
  • वेळ – सकाळी 7:30 ते रात्री 11 
  • दोन माणसांचा खर्च – अंदाजे खर्च 400 
  • Zomato रेटिंग – 4.2

मुंबईतील पावभाजीची प्रसिद्ध ठिकाणं

आर्या भवन रेस्टॉरंट

Instagram

रामा नाईक उडपी श्री कृष्ण बोर्डिंग

 

दाक्षिण्यात खाण्याची चंगळ म्हणजे माटुंग्यातील विविध साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स. यापैकीच आणखी एक खास दाक्षिणात्य हॉटेल म्हणजे रामा नायक यांचं उडपी श्रीकृष्ण बोर्डिंग. खास केळीच्या पानात वाढलेले पदार्थ तुमच्या डोळे आणि रसनेला सुख देतात. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या हॉटेलची चव हीच यांची खरी ओळख आहे. 

  • पत्ता – पहिला मजला, एल.बी. एस मार्केट बिल्डिंग, माटुंगा स्टेशनजवळ, माटुंगा.
  • वेळ – सकाळी 10:30 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10
  • दोन माणसांचा खर्च – अंदाजे 400 रू.
  • Zomato रेटिंग – 4.2
रामा नाईक उडपी श्री कृष्ण बोर्डिंग

Instagram

ADVERTISEMENT

शारदा भवन (Sharda Bhavan)

 

आतापर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की मुंबईतील सर्वच साऊथ इंडियन रेस्टॉरंट माटुंगामध्येच आहेत. तेव्हा जर तुम्हाला दाक्षिणात्य पदार्थांची चव चाखायची असेल तर तुम्हाला माटुंग्याला जायलाच हवं. शारदा भवन हे आणखी एक त्यापैकी एक हॉटेल. तुम्ही दिवसाची मस्त सुरूवात करण्यासाठी या ठिकाणी इडली, डोसा खाण्यासाठी नक्कीच जाऊ शकता. 

  • पत्ता – माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ
  • वेळ – सकाळी 7:30 ते रात्री 8:30
  • अंदाजे दोन माणसांचा खर्च – 200 रू.
  • Zomato रेटिंग – 4
शारदा  भवन  रेस्टॉरंट

Instagram

डिलक्स हॉटेल (Hotel Deluxe)

 

जर तुम्हाला घरगुती केरळी पदार्थ खायचे असतील तर तुम्हाला मुंबईतील या साऊथ इंडिअन रेस्टॉरंटबाहेर रांग लावावी लागेल. या हॉटेलमध्ये तुम्हाला पारंपरिक मल्याळी खाद्यपदार्थ चाखायला मिळतील. इथलं बनाना फ्राय, राईस अडा, अप्पम तुम्हाला नक्कीच आवडेल. शिवाय या हॉटेलमध्ये तुम्हाला केरळी नॉनव्हेजची लज्जतही चाखायला मिळेल. 

  • पत्ता – 10 – ए, पीटा रोड, सिटी बॅंक समोर, फोर्ट, मुंबई
  • वेळ – सकाळी 11 ते रात्री 11
  • दोन माणसांचा खर्च – अंदाजे 450 रू. 
  • Zomato रेटिंग – 4.2
डिलक्स हॉटेल

Instagram

ADVERTISEMENT

दक्षिण कल्चर करी (Dakshin Culture Curry)

 

या हॉटेलमध्ये तुम्हाला साऊथ इंडियन, चेट्टीनाड, हैद्राबाद, आंध्र आणि केरळमधील विविध खाद्यपदार्थ मिळतात. त्यामुळे या हॉटेलची ओळख मिनी इंडिया अशी झाली आहे. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर इथलं चिकन चेट्टीनाड, पोर्तुगिज चिकन, अप्पम, सी फूड चाखायलाच हवं. याचप्रमाणे इथे नीर डोसा आणि मलबारी पराठा ही खास लोकप्रिय आहेत. 

  • पत्ता – हिंदुजा हॉस्पिटल जवळ, माहिम, मुंबई
  • वेळ – दुपारी 12 ते दुपारी 3:30 सायं 7 ते रात्री 12:30
  • दोन माणसांचा खर्च – अंदाजे 1700 रू.
  • Zomato रेटिंग – 4.2
दक्षिण कल्चर करी

Instagram

दी तंजोर टिफीन रूम (The Tanjore Tiffin Room)

 

जर तुम्ही मुंबईतील एखाद्या अप्रतिम साऊथ इंडियन रेस्टॉरंटच्या शोधात असाल तर या ठिकाणी अवश्य जा. इथे तुम्हाला चेट्टीनाड आणि साऊथ इंडियन खाद्यपदार्थ मिळतील. इथल्या अप्पम, कॉकटेल्स, पेपर चिकन, मैसूर पाक, चिकन कोरमाची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. 

  • पत्ता – ज्वैल शॉपिंग सेंटर, सात बंगला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम
  • वेळ – दुपारी 12 ते रात्री 12
  • दोन माणसांचा खर्च – अंदाजे 1500 रू. 
  • Zomato रेटिंग – 4.3
दी तंजोर टिफीन रूम

Instagram

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

घाटकोपरच्या खाऊ गल्लीत काय आहे चविष्ट पदार्थ, टाकूया एक नजर

मुंबईत पावभाजीचा घ्यायचाय आस्वाद तर नक्की द्या ‘या’ ठिकाणांना भेट

मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ

26 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT