लग्न म्हटले की, आपण काही खास साड्यांची निवड करतो. अशा साड्या ज्या साड्या परंपरेने आपण घेत असतो. उदा. पैठणी, कांजिवरम, प्युअर सिल्क, चंदेरी अशा साड्याची निवड केली जाते. पण साऊथ इंडियन पद्धतीच्या काही साड्या या लग्नांसाठी फारच सुंदर आणि वेगळा असा पर्याय आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीच्या साड्या निवडायच्या असतील तर त्यांचे काही प्रकार आम्ही तुमच्यासाठी निवडले आहेत. तुम्हाला हव्या तशा हेव्ही प्रकारात या साड्या तुम्हाला मिळू शकतात. त्याही तुमच्या बजेटमध्येच. चला जाणून घेऊया साड्यांचे असे काही प्रकार जे लग्नासाठी आहेत फारच परफेक्ट
साऊथ इंडियन प्रकारातील ही अंकित पट्टू साडी लग्न आणि कोणत्याही मंगल कार्यासाठी खूपच सुंदर दिसते. अंकित पट्टू साडीचा काठ हा थोडासा मोठा असतो. या साड्यांच्या काठावर हत्ती, मोर, फुलांची अशी नक्षी असते. या साडीच्या अंगभर वेगवेगळ्या बुट्टी असतात. सिल्क अशा प्रकारातील या साड्या असल्यामुळे या साड्या नेसायला खूप सोप्या असतात. या साड्या चापून चोपून बसतात. लग्नासाठी अशा साड्या घेतल्या असतील तर त्या अगदी व्यवस्थित नेसा. या साडयांवर हेवी ब्लाऊज घातले तर ते अधिक चांगले दिसतात.
साऊथ इंडियन प्रकारातील आणखी एक साडी म्हणजे चेत्तिनाड साडी. या साडीचे नावही तुम्ही नक्कीच ऐकले असेल. चेत्तिनाड सिल्क साडी या साडीचा काठ आकर्षक असतो. साडीचा काठ वगळता या साड्यांवर लहान लहान आकाराच्या बुट्टी असतात. या साड्यांचे काठ इतके सुंदर असतात की, या साड्यांचे काठच सुंदर असल्यामुळे अशा साडया नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसतात. जर तुम्ही लग्नासाठी अशा साड्या घेणार असाल तर तुम्ही साड्यांचे गडद रंग निवडा. म्हणजे ते दिसायला अधिक सुंदर दिसतात.
साऊथ इंडियन साड्यांमधील आणखी एक प्रकार म्हणजे धरमवरम साडी. हा साडीचा प्रकार तुम्हाला थोडासा बनारसी साड्यांच्या जवळ जाणारा वाटेल. या साड्यांचे काठ मोठाले असतात. या साड्यांचे काठ गोल्डन, सिल्व्हर अशा स्वरुपात मिळतात. त्यामुळे तुम्ही थीमनुसार साड्यांची निवड करु शकता. या प्रकारातील साड्या हेव्ही असतात. त्यामुळे त्या लग्नात नवरीलाही नेसता येतात.
कोनार्ड साडी हा प्रकार त्याच्या काठांमुळे ओळखला जाणारा असा प्रकार आहे. या साड्यासुद्धा सुंदर आणि आकर्षक प्रकारातील आहेत. कोनार्ड साड्यांमध्ये गोल्डन जरींमध्ये असतात. याचे काठ, प्लेन किंवा त्यावर भरलेले मिळतात. हे काठ आकर्षक असल्यामुळे तुम्हाला या कोनार्ड साड्या नेसता येतात. याशिवाय साडीच्या संपूर्ण बॉडीवर तुम्हाला बुट्टी असते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बुट्ट्यांची निवड करु शकता.
कांचिपुरम साडी ह प्रकार देखील आता काही नवा राहिलेला नाही. खूप जणांना कांचिपुरम साड्या या खूप आवडतात. कांचिपुरम साड्या या खास लग्नासाटई असतात. कांचिपुरम साड्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार नक्कीच पाहायला मिळतील. कांचिपुरम साड्या ब्रोकेट, बुट्टी अशा प्रकारातही मिळतात. कांचिपुरम साड्या या चापूनचोपून नेसल्या की, त्या छान दिसतात.
आता लग्नासाठी या काही साड्या तुम्ही नक्की निवडा. तुम्हाला या साड्या नक्की आवडतील.
अधिक वाचा
शिफॉन साड्यांची काळजी घ्या अशी, वापरा या ट्रिक्स