केसांवर केमिकल्सचा वापर कमी व्हावा यासाठी तुम्ही सल्फेट फ्री (Sulphate free) शॅम्पूच्या शोधात आहात का? मग आता केसांची चिंता काळजी करणं सोडून द्या. कारण आम्ही तुमच्यासोबत जगभरातील बेस्ट सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate free shampoo) शेअर करत आहोत. धुळ, प्रदूषणाचा सतत होत असलेला मारा आणि केसांवर केलेल्या निरनिराळ्या ब्युटी ट्रिटमेंट्स यामुळे तुमचे केस आतून कमजोर होतात. बाजारात केस स्वच्छ करण्यासाठी विकण्यात येणाऱ्या अनेक शॅम्पूमध्ये हानिकारक केमिकल्सचा वापर केलेला असतो. या शॅंम्पूमधील सोडियम लॉयर्ल सल्फेट (Sodium Lauryl Sulfate) हे केमिकल केसांना सहन न झाल्याने ते अधिकच तुटू लागतात आणि निस्तेज दिसतात. कारण अशा हार्श केमिकल्समुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते. सहाजिकच तुमच्या अशा केविलवाण्या केसांना गरज असते थोडंसं प्रेम आणि केमिकल फ्री सौंदर्यप्रसाधनांची. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत असे काही शॅंम्पू शेअर करत आहोत जे सल्फेट फ्री नक्कीच आहेत.
बॉडी शॉपचा हा सल्फेट फ्री शॅम्पू नॉर्मल पासून अगदी ड्राय केसांपर्यंत सर्व प्रकारच्या केसांसाठी उत्तम आहे. हा शॅम्पू जेल बेस असल्यामुळे त्यामुळे तुमचे केस व्यवस्थित स्वच्छ होतात. शिवाय यामध्ये कंडिशनिंग ऑईलचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे केस धुतल्यानंतरही तुमचे केस मऊ आणि मुलायम राहतात.
फायदे –
तोटे –
या शॅंम्पूमध्ये अनेक अशा नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे ज्यामुळे तुमचे फ्रेश आणि चमकदार दिसू लागतात. शिवाय यामध्ये न्यट्रासर्फ टेक्नॉलॉजिचा फॉर्म्युला वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमचे केस स्वच्छ तर होतात पण तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल निघून जात नाही.
फायदे –
तोटे –
ऑर्गनिक्सच्या हा सल्फेट फ्री शॅम्पू ड्राय आणि डॅमेज केसांसाठी सोयीचा आहे. कारण यामध्ये नारळाचे तेल, अॅव्होकॅडोचे तेल, मॅकाडॅमिया, ऊस, बांबू आणि कोरफड यासारख्या नैसर्गिक घटकांचे उत्तम मिश्रण वापरण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुमचे केस फारच कोरडे असतील तर तुमच्यासाठी हा सल्फेट फ्री शॅंम्पू बेस्टच आहे.
फायदे –
तोटे –
जर तुम्हाला केसांना छान व्हॉल्युम मिळावा असं वाटत असेल तर हा शॅंम्पू सल्फेट फ्री असूनही तुमच्या सोयीचे नक्कीच आहे. कारण यामुळे तुमच्या केसांचे नुकसान न होता तुम्हाला छान बाऊंसी केस मिळू शकतात. शिवाय या शॅम्पूच्या उत्पादनासाठी प्राण्यांचा वापर न केल्यामुळे ते पूर्ण पणे वेगन आहे. यात कोरफडाचा रस, किवीचा गर, पपईचा गर, आंब्याचा गर अशा नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे.
फायदे –
तोटे –
या शॅंम्पूमध्ये चारकोल, ऑलिव्ह ऑईल आणि बदामाच्या तेलाचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमचे केस स्वच्छ तर होतातच शिवाय तुमच्या केसांना नैसर्गिक चमकदेखील मिळू शकते. जर तुम्ही एका परफेक्ट सल्फेट फ्री शॅम्पूच्या शोधात असाल तर हा शॅम्पू तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण यामुळे तुमचे कोरडे, निस्तेज आणि डिहायड्रेट झालेले केस पुन्हा मजबूत आणि चमकदार होऊ शकतात.
फायदे –
तोटे –
जर तुम्हाला सलॉन इफेक्ट हवा असेल तर हा सल्फेट फ्री शॅंम्पू तुम्ही वापरू शकता. यामध्ये वेला प्रोफेशनल्सनी न्यूट्री कॉम्प्लेक्स फॉर्म्युला वापरला आहे ज्यामुळे तुमच्या केसांचे अधिक संरक्षण होऊ शकते. हा शॅम्पू खास कोरड्या केसांसाठी तयार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हे क्रीम स्वरूपात असल्यामुळे तुमच्या केसांना एक छान सॉफ्टनेस मिळतो.
फायदे –
तोटे –
जर तुम्ही तुमच्या केसांची निगा राखण्यासाठी आणि दररोज वापण्यासाठी एखाद्या चांगल्या सल्फेट फ्री शॅम्पूच्या शोधात असाल तर हा शॅम्पू तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण हा सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे. शिवाय पुरूष आणि महिला अशा दोघांच्याही उपयोगाचा आहे. यात रिठा, शिकेकाई, आवळा, कडुलिंब, लिंबू, ब्राम्ही, तुळस, मेथी, मेंदी अशा आर्युवेदिक घटकांचा वापर केलेला आहे.
फायदे –
तोटे –
केसांमध्ये कोंडा होणे ही समस्या आजकाल अनेकांचा जाणवत असते. मात्र बऱ्याचदा कोंडा कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त शॅम्पूमुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. यासाठी सल्फेट फ्री अॅंटि डॅंड्रफ शॅंम्पूचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतों. लॉरिअर कंपनीने तुमच्या गरजांचा विचार करूनच हे उत्पादन तयार केलेले आहे.
फायदे –
तोटे –
बायोटिक कंपनीचा हा शॅम्पू तुमच्या केसांच्या स्वच्छतेसाठी सुरक्षित आहे. कारण यामध्ये ग्रीन अॅपल, नारळाचे तेल, बदामाचे तेल, शिकेकाई, हिमालयातील शुद्ध पाणी अशा अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यांची त्वचा तेलकट आहे अशा लोकांसाठी हा एक उत्तम सल्फेट फ्री शॅम्पू आहे. कारण त्यामुळे तुमच्या स्काल्पवरील नैसर्गिक तेल काढून टाकले जात नाही. शिवाय हा शॅंम्पू तुम्हाला भारतात कुठेही सहज मिळू शकतो.
फायदे –
तोटे-
हा शॅम्पू खास त्या लोकांच्या केसांसाठी तयार करण्यात आलेला आहे ज्यांचे केस कधीच मॅनेज होत नाहीत. कारण या शॅम्पूमुळे केस व्यवस्थित स्वच्छ होतात शिवाय मऊदेखील होतात. ज्यामुळे तुमच्या केसांवर कोणतीही स्टाईल करणं सोपं जाऊ शकतं. शिवाय यामध्ये अशा काही फॉर्म्युलाचा वापर केला गेला आहे ज्यामुळे तुमचे केस अधिक लवचित आणि मजबूत होतात.
फायदे –
तोटे –
महागडे आहे
शॅम्पूमधील सल्फेट म्हणजे नेमके काय ?
बाजारातील केमिकलयुक्त शॅंम्पूमध्ये सोडियम लॉयर्ल सल्फेट (Sodium Lauryl Sulfate) वापरण्यात येते. सल्फेट हे एक क्लिंझिंग असल्यामुळे तुमचे केस स्वच्छ होण्यास मदत होते. मात्र सल्फेटच्या अती माऱ्यामुळे तुमच्या केस आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं. कारण त्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांवरील नैसर्गिक तेल पूर्णपणे निघून जातं.
शॅम्पूमधील सल्फेट आरोग्यासाठी हानिकारक असते का ?
तुम्ही किती प्रमाणात सल्फेट युक्त अथवा केमिकल युक्त उत्पादने वापरता यावर हे अवलंबून आहे. कारण याचा अती वापर केल्यामुळे तुमच्या डोळे, त्वचेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आजकाल मोठ्या प्रमाणावर सल्फेट फ्री उत्पादने वापरण्यावर भर दिला जात आहे.
सल्फेट फ्री शॅम्पू दररोज वापरता येऊ शकतात का ?
जर तुम्हाला नियमित केस धुत असाल तर ते केसांच्या आरोग्यासाठी नक्कीच योग नाही. आठवड्यातून तीन ते चार वेळा केस धुवावेत. ज्यामुळे त्यांचे जास्त नुकसान होत नाही. मात्र सल्फेट फ्री शॅंम्पू नियमित वापरण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामध्ये केसांच्या आरोग्यासाठी कोणतेही हानिकारक घटक नक्कीच नसतात.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर आहेत ‘हे’ अँटी हेअर फॉल शॅम्पू (How To Control Hair Fall In Marathi)
तुमचेही केस कोरडे आहेत का? मग हे शॅम्पू तुमच्यासाठी आहेत बेस्ट (Shampoo For Dry Hair)
Hair Spa: घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल (Hair Spa At Home In Marathi)