ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
best time to apply body lotion in marathi

बॉडीलोशन लावताना करू नका ही चूक, योग्य वेळ आहे महत्त्वाची

हिवाळा सुरू होताच त्वचेची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. कारण हिवाळ्यामुळे त्वचा कोरडी होते आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात. त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठी हिवाळ्यात त्वचेला योग्य पोषणाची गरज असते. कोल्ड क्रिम, बॉडी लोशन, बॉडी क्रिम, लिप बाम अशा अनेक सौंदर्य उत्पादनांनी तुम्ही त्वचेचे पोषण करू शकता. त्वचेची निगा राखण्यासाठी नियमित बॉडी लोशन लावणं खूप गरजेचं असतं. पण तुम्ही योग्य वेळी बॉडी लोशन लावता का? जर स्किन केअर रूटिनप्रमाणे बॉडी लोशन योग्य वेळी लावलं नाही तर त्याचा काहीच फायदा होत नाही. 

त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन (Body Lotion For Healthy Skin)

बॉडी लोशन नेमकं कधी लावावं

बॉडी लोशन तुम्ही कधी आणि कसं लावता यावर तुमच्या त्वचेचं संरक्षण ठरत असतं.

सकाळी अंघोळीनंतर

सकाळी अंघोळ केल्यावर तुमची त्वचा जास्त कोरडी आणि रूक्ष होते. अशा वेळी त्वचेला सर्वात जास्त पोषणाची गरज असते. बॉडीलोशन हे नेहमी अंघोळीनंतर त्वचेला लावावं. ज्यामुळे ते त्वचेत चांगलं मुरतं आणि तुमच्या त्वचचं प्रदूषण, धुळ, माती, हवामानात होणारे बदल यापासून रक्षण करतं. सकाळी त्वचेवर लावलेलं बॉडीलोशन दिवसभर त्वचेवर संरक्षण कवच बनून राहतं.

ADVERTISEMENT

तुमच्या तेलकट त्वचेसाठी हे फेस वॉश आहेत एकदम परफेक्ट (Face Wash For Oily Skin In Marathi)

रात्री झोपताना 

रात्री झोपताना जर तुम्ही अंघोळ करून झोपणार असाल तर अंघोळीनंतर त्वचेला बॉडीलोशन तुम्ही नक्कीच लावू शकता. कारण रात्री हवेतील गारवा जास्त वाढलेला असतो. त्यामुळे या काळात तुमच्या त्वचेला पोषणाची जास्त गरज असते. शिवाय रात्री झोपल्यावर त्वचेचा योग्य आराम मिळतो. त्यामुळे या काळात तुमची त्वचा क्रीम अथवा लोशन चांगल्या पद्धतीने शोषून घेते. 

विमानातून प्रवास करताना

जर तुम्ही सतत विमानातून प्रवास करत असाल तर तुमच्या त्वचेला जास्त पोषणाची गरज आहे. कारण वातावरणात होणारा बदल आणि वाऱ्यामुळे तुमच्या त्वचेवर लगेच परिणाम होतो. यासाठी विमान प्रवासादरम्यान तुमच्याजवळ चांगलं बॉडीलोशन अथवा मॉइस्चराझर असायलाच हवं. विमानात जर तुम्ही जास्त तास घालवणार असाल तर एखादा चांगला बॉडी मॉइस्चराइझिंग मास्क चेहरा अंगाला लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होईल आणि ती लवकर खराब होणार नाही. 

कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट (Best Facial Kits For Dry Skin In Marathi)

ADVERTISEMENT

या व्यतिरिक्त चेहरा धुतल्यावर, अंघोळीनंतर, व्यायामानंतर, चेहरा स्वच्छ केल्यावर तुम्ही चांगलं मॉईस्चराइझर नक्कीच वापरायला हवं. मात्र लक्षात ठेवा कोणतंही बॉडी लोशन अथवा क्रीम चेहरा अथवा इतर भागाच्या त्वचेवर लावण्याआधी ती स्वच्छ करा. कारण जर आधीच त्वचेवर धुळ, माती असेल तर मॉइस्चराइझर अथवा बॉडी लोशनसोबत ती धुळ, माती, प्रदूषणही तुमच्या त्वचेत मुरेल आणि बॉडी लोशन, क्रीमचा काहीच फायदा तुम्हाला होणार नाही. 

14 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT