कलाकारांना नक्की झालंय तरी काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या धक्कादायक आत्महत्येनंतर अनेक कलाकारांच्या आत्महत्येच्या बातम्यांमध्ये भर पडत आहे. हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. पण आता एका भोजपुरी अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी समोर येत आहे. मुंबईतील राहत्या घरी या अभिनेत्रीने आत्महत्या केली असल्याचे लक्षात येत आहे. ही अभिनेत्री भोजपुरी मालिकेतील नावाजलेला चेहरा असून तिचे नाव अनुपमा पाठक आहे. तिने काहीच दिवसांपूर्वी तिच्या आयुष्यात सध्या काय घडत आहे आणि आत्महत्येबद्दल फेसबुक लाईव्हवरुन सांगितले होते. तिने उचलेल्या या पावलामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
अभिनेता जय भानुशाली स्टंट करताना जखमी, शेअर केला व्हिडिओ
मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी
एकदी एकच दिवसापूर्वी म्हणजे 6 ऑगस्टला अभिनेता समीर शर्माने घरात गळफास लावून घेतल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला होता. तर आज सकाळी या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. भोजपुरी मालिकांमधू काम केलेल्या अनुपमा पाठकने तिच्या दहिसर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलिसांना तिच्या घरी चिठ्ठीही सापडली आहे. यामध्ये तिने दोन कारणांमुळे जीवन संपवत असल्याचा उल्लेख केला आहे. तिने चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुरानुसार कोणत्या एका प्रोडक्शन कंपनीमध्ये तिने काही पैसे गुंतवले होते. ते पैसे तिला डिसेंबर 2019 मध्ये मिळणे अपेक्षित होते. पण ते तिला मिळाले नाहीत. तिची फसवणूक करण्यात आली असे तिने म्हटले आहे.
कपूर खानदानात जाणार करण जोहरची दुसरी ‘स्टुडंट’, नात्यावर केलं शिक्कामोर्तब
अनुपमाने फेसबुक लाईव्ह करुन दिली माहिती
अनुपमा आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी लाईव्ह आली होती. 1 ऑगस्ट रोजी तिने उशीरा रात्री लाईव्ह करत तिच्या आयुष्यात सध्या काय घडत आहे हे सांगितले होते. ती या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आत्महत्या माणूस का करतो हे सांगितले शिवाय आत्महत्या केल्यानंतर आपल्याच जवळच्या व्यक्ती कशा दूप जायला पाहतात ते ही सांगितले. पुढे ती स्वत: आत्महत्या केल्यानंतर इतरांना दोषी ठरवू नये असे सांगते कारण जगात कोणावरही विश्वास ठेवू नये असा विश्वास ठेवणे आयुष्यात घातक ठरु शकते. जो माणून आत्महत्या करतो आपले जीवन संपवतो ते स्वत:हून संपवतो. त्यात इतरांना दोष देऊन काही उपयोग नाही. पण कोणावरही विश्वास ठेवणे चांगले नाही हे ती मात्र सातत्याने सांगत राहते.
अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा येत आहे ‘इच्छाधारी नागिण’
आत्महत्येचा दिला होता इशारा
अनुपमा कोणत्या तरी कारणासाठी फारच दु:खी होती. हे तिच्या पोस्टवरुन कळत होते. कारण तिने सुशांतच्या आत्महत्येनंतर या संदर्भातील अनेक व्हिडिओ शेअर केले होते. शिवाय ती बरेचदा असा काही गोष्टी शेअर करत होती.ज्यामध्ये तिने सातत्याने विश्वासाला तडा गेल्याचा उल्लेख केला होता. या परिस्थितीत तिच्या आप्तेष्टांची, मित्र म्हणवून घेणाऱ्यांची साथ नसल्याचे तिने सांगितले होते..
कलाकारांना सध्या आहे त्या परिस्थितीला तोंड देण्याची गरज आहे. काम बंद त्यामुळे कमाई नाही या सगळ्यात कारणामुळे सध्या अनेक कलाकार तणावाखाली आहेत. पण आत्महत्या हा शेवट नाही हे मनापासून समजून घेण्याची गरज आहे.