ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
bhul bhulaiya 2

भूल भुलैया 2 चे ट्रेलर झाले लाँच, प्रेक्षकांना आली अक्षय कुमारची आठवण

कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षित ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी  रिलीज झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जुन्या ‘भूल भुलैया’ प्रमाणे, ‘भूल भुलैया 2’मध्येही कॉमेडी तर आहेच पण हा एक भयपट देखील असणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन exorcist झाला आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीने मंजुलिकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर विद्या बालनने यावर सर्वप्रथम प्रतिक्रिया दिली होती. ‘भूल भुलैया’मध्ये अक्षय कुमारसोबत विद्या बालनही होती. विद्याने यात मंजुलिकाची भूमिका केली होती. 

विद्याने इंस्टाग्रामवर  शेअर केले ट्रेलर 

विद्या बालनने हे ट्रेलर तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आणि पोस्टमध्ये लिहिले की, “या झपाटलेल्या कॉमेडी चित्रपटासाठी #BhushanKumar आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. ट्रेलर ओळखीचा दिसत आहे…हा हा…या रोलर कोस्टरची राइड पुन्हा अनुभवण्यासाठी आता जास्त काळ मी थांबू शकत नाही. #भूल भुलैया 2. हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.”

चित्रपटात डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध कसे होते, हे सर्वांनाच माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. आता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात,लेखकांनी ट्रम्पतात्यांच्या ट्वीट्सची खिल्ली उडवली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक संवाद आहे, ‘डोनाल्ड ट्रम्पचे ट्विट आणि चेटकिणींचे पाय नेहमीच उलटे असतात.’

कार्तिकची प्रतिक्रिया

लाँच इव्हेंटमध्ये कार्तिक आर्यनला विचारण्यात आले की, जर चित्रपटाच्या लेखकांना ट्रम्प यांच्या पोस्ट अशा दिसतात, तर त्यांना पंतप्रधान मोदींच्या पोस्ट कशा वाटतात? या प्रश्नावर कार्तिकने थोडा विचार केला आणि मग समोर बसलेल्या आईकडे बघून तो म्हणाला, ‘मोदीजींची प्रत्येक पोस्ट चांगलीच असते.’. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे.जुन्या भूल भुलैयाच्या कास्टपैकी या चित्रपटात फक्त राजपाल यादव आहे. त्याच्या व्यतिरिक्त भूल भुलैयाच्या या दुसऱ्या भागात संपूर्ण नवी स्टारकास्ट आहे. कार्तिक म्हणतो, “हा चित्रपट आधीच्या ‘भूल भुलैया’पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. याची कथा नवीन आहे, यात नवीन पात्रे आहेत. मला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.” 

ADVERTISEMENT

‘लव्ह आज कल’ नंतरचा दुसरा चित्रपट

कोरोनामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मपुरतेच मर्यादित राहिले. मागच्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे बराच काळ चित्रपटगृहे बंद होती, त्यामुळे बहुतेक चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होत होते. मागच्या वर्षी कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. पण समीक्षकांनी या चित्रपटाची फारशी स्तुती केली नव्हती. त्यांना हा चित्रपट रुचला नव्हता.कार्तिक आर्यन या चित्रपटात टीव्ही न्यूज अँकरच्या भूमिकेत होता आणि चित्रपटावर बहुतेक टीव्ही न्यूज अँकरने टीका केली होती. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा कार्तिक आर्यनचा शेवटचा चित्रपट ‘लव्ह आज कल’ होता जो 14 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित झाला होता आणि पहिल्या वीकेंडलाच फ्लॉप घोषित करण्यात आला होता.

अक्षय कुमारशी तुलना

अक्षय कुमारने जुन्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटात त्याच्या अभिनयाने रंगत आणली होती. अक्षय कुमारशी तुलना करण्यात आली तेव्हा कार्तिक आर्यन म्हणाला की, “मला अभिनेता म्हणून अक्षय कुमार आवडतो. मी ‘भूल भुलैया’ पाहिला आहे. मलाही तो चित्रपट खूप आवडला. या दोन चित्रपटांची तुलना करणे चुकीचे आहे. हा चित्रपट उत्तम आणि वेगळा बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यामध्ये बरेच नवीन घटक आहेत.”

भूल भुलैया 2 हा  20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
27 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT