शाहिद कपूर चित्रपट निर्माता अली अब्बास जफरसोबत एक चित्रपट करत आहे. हा चित्रपट Nuit Blanche या फ्रेंच थ्रिलरचा हिंदी रिमेक असणार आहे. मूळ फ्रेंच चित्रपटाच्या या हिंदी रिमेकमध्ये शाहिद एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. हिंदी वर्जन बनवताना या चित्रपटात भारतीय प्रेक्षकांच्या आवडीनुसार अनेक बदल केले जातील. निर्मात्यांना हा चित्रपट अशा प्रकारे बनवायचा आहे जो पाहताना प्रेक्षक अक्षरशः थक्क होतील. अर्थातच या वर्षाच्या शेवटी चित्रपटच्या शूटिंगलाही सुरूवात केली जाईल. मात्र त्याआधीच चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये पुन्हा बदल केला जाणार आहे.
अमिताभ बच्चन यांना बॉलीवूडमध्ये पूर्ण झाली 52 वर्ष, शेअर केल्या जुन्या आठवणी
का नाही करायचं भूमीला या चित्रपटात काम
अली अब्बास जफरच्या या चित्रपटाचे नाव अजून जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र चित्रपटाचे कथानक एका अशा वडिलांभोवती फिरणारे आहे जो त्याच्या किडनॅप झालेल्या मुलाला गुंडापासून वाचवतो. वडिलांची म्हणजे नायकाची भूमिका अर्थातच शाहिद साकारणार असून नायिकेसाठी भूमील पेडणेकरची निवड करण्यात आली होती. या चित्रपटाच्या नायिकेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी रितसर भूमीला अप्रोच केलं. ज्यामध्ये भूमीला शाहिदच्या पत्नीची आणि किडनॅप झालेल्या मुलाच्या आईची भूमिका साकारावी लागणार होती. नायकासोबत नायिकेची भूमिकाही महत्त्वाची असल्यामुळे निर्मात्यांनी यासाठी भूमीची निवड केली होती. काही आठवडे आधीच भूमीला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. मात्र भूमीने या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे.
Bigg Boss 15: शमिता शेट्टीला मिळतोय का अधिक फायदा, इतर स्पर्धकांवर होतोय अन्याय
कारण जाणूवन व्हाल हैराण
भूमी पेडणेकरने या थ्रीलर अॅक्शन चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूमीला ही भूमिका तिच्यासाठी योग्य नसून या पात्राला चित्रपटात विशेष स्थान नसल्याचं वाटत आहे. चित्रपट नायकाभोवती फिरत असून नायिकेचा यामध्ये फआर सहभाग नाही असं तिचं मत आहे. ज्यामुळे तिने चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. आता निर्माते शाहिदच्या अपोझिट दुसऱ्या एखाद्या नायिकेच्या शोधात आहेत.अली अब्बास जफरने या आधी मेरे ब्रदर की दुल्हनिया, सुलतान, गुंडे, टायगर जिंदा है, भारत अशा अनेक चित्रपटांना दिग्दर्शित केलं आहे. शाहिदनेही त्याच्या करिअरमध्ये पद्मावत, कबिर सिंहसारख्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारलेल्या आहेत. आता चाहत्यांना जफर आणि शाहिदची केमिस्ट्री या नव्या चित्रपटातून पाहायची आहे.
“रावरंभा” च्या निमित्ताने गिरीश कुलकर्णी, ओम भूतकर पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात एकत्र