ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी: गॉसिपला उधाण, हे कलाकार करणार प्रवेश

बिग बॉस OTT ला सुरुवात झाल्यापासून मराठीत बिग बॉस कधी सुरु होणार अशी चर्चा रंगली होती. पण आता ही चर्चा संपली आहे. कारण पुढच्या महिन्यापासून म्हणजेच सप्टेंबर महिन्यापासून बिग बॉस मराठी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. यंदा येणारा बिग बॉसचा तिसरा सीझन असून ‘इंटरटेन्मेंट अनलॉक’ अशी याची टॅगलाईन असणार आहे. वर्षभराच्या कोव्हिड विश्रांतीनंतर हा मराठी रिअॅलिटी शो येणार असून आता त्याच्या गाॅसिप्सना चांगलेच उधाण आले आहे. बिग बॉस मराठीमध्ये नेमकं काय काय असेल? कोणते नवे कलाकार असतील या संदर्भात ही चर्चा रंगलेली आहे. दरम्यान, अनेक कलाकारांच्या नावांचा उल्लेख यामध्ये केला जात आहे.

बिग बॉस’ मराठीचे तिसरे पर्व 19 सप्टेंबरपासून, प्रतीक्षा संपली

कलाकार असू शकतात शो मध्ये

ज्या दिवसापासून या शोची घोषणा झाली आहे. त्या दिवसापासून यामध्ये कोणते कलाकार येणार याची चर्चा सुरु झाली आहे. काही महिन्यांपूर्वीसुद्धा एक यादी समोर आली होती. आता पु्न्हा एकदा नव्या यादीसह ही चर्चा सुुरु झाली आहे.  नवीन आलेल्या यादीनुसार या रिअॅलिटी शोमध्ये चिन्मय उद्गीरकर, निशिगंधा वाड, पल्लवी शुभाष, केतकी चितळे, आनंद इंगळे, नम्रता संभेराव, अंशुमन विचारे, शुभंकर तावडे, खुशबू तावडे अशा काही नावांचा समावेश आहे. हे चेहरे आतापर्यंत सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. या चेहऱ्यांना तुम्ही आतापर्यंत मालिका, चित्रपटातून आणि सीरिजमधून पाहिलेले आहे. त्यामुळे ते खऱ्या आयुष्यात नेमके कसे आहेत हे पाहताना नक्कीच मजा येणार आहे. 

देवमाणूस’नंतर किरण गायकवाड दुसऱ्या भूमिकेसाठी झाला सज्ज

ADVERTISEMENT

बडे कलाकार मोठे इंटरटेन्मेंट

बिग बॉस मराठीच्या या पर्वासाठी अनेक नावाजलेले कलाकार येणार आहेत. हे कलाकार  मोठे आहेत. मराठी प्रेक्षक या कलाकारांशी फारच जास्त जोडला गेलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांना स्क्रिनवर पाहणे हे फार औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान अद्याप नावांची चर्चा होत असली तरी देखील या विषयी कोणतीही खात्रीशीर माहिती चॅनलकडून किंवा कलाकारांकडून देण्यात आलेली नाही. कारण या गोष्टी अगदी घरात जाईपर्यंत गुप्त ठेवलेल्या असतात. त्यामुळे यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पण या नावांमुळे बिग बॉस मराठी चांगलेच चर्चेत आहे.

बिग बॉस ओटीटी करतेय धमाल

हिंदीमध्ये बिग बॉस यंदा वेगळ्याच स्वरुपात भेटीला आला आहे. यंदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो सुरु झाला असून तो 24 तास प्रेक्षकांना पाहता येत आहे. यंदा आलेले सेलिब्रिटी हे फारसे नावाजलेले नसल्यामुळे सगळ्यांसाठीच त्यांना पाहणे नवे आहे. मनोरंजन विश्वाशी आणि सोशल मीडियाशी जोडले गेलेले हे काही कलाकार फार स्क्रिनवर न पाहिल्यामुळे त्यांना पाहणे हे मजेशीर वाटत आहे. तर प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये मराठमोळा राकेश बापट आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी ही देखील आहे. पण हे दोन चेहरे मोठे असले तरीदेखील इतरांच्या तुलनेत इंटरटेन्मेंटसाठी ते मागेच आहेत. शमिता शेट्टी ही या रिअॅलिटी शोमध्ये पुन्हा एकदा आली आहे. त्यामुळे तिचे पारडे यात काही जड नाही असे दिसत आहे. पण अनेक चुकीच्या गोष्टीत तिला सपोर्ट मिळत असल्याचे देखील दिसत आहे. 

आता मराठी बिग बॉस सुरु होण्याची प्रतिक्षा आहे. 

तारा सुतारियाने का नाकारली कार्तिक आर्यनसोबत ‘फ्रेडी’मधली भूमिका

ADVERTISEMENT
30 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT