चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास हा खूप जणांना असतो. चेहऱ्याला पिंपल्स आले की, जीव अगदी नकोसा होऊन जातो. हे पिंपल्स वेगवेगळ्या स्वरुपात येतात. काही जणांना अगदी बारीक बारीक पुटकुळ्या येण्याचा त्रास असतो. काहींना पस असलेले मध्यम आकाराचे पिंपल्स येतात. तर काहींना मात्र अगदी मोठे मोठे पिंपल्स चेहऱ्यावर येतात. यामध्ये पू साचलेला असतो. असे पिंपल्स दिसायला जितके वाईट दिसतात त्याहीपेक्षा अधिक असे मोठे पिंपल्स पटकन जात नाही. ते जो पर्यंत फुटत नाही तोपर्यंत त्यातून मुळीच सुटका नसते. पण असे पिंपल्स फोडणेही चांगले नाही. जर नखांचा उपयोग करुन तुम्ही ते फोडले तर त्या ठिकाणी कायमचा डाग पडण्याची शक्यता असते. पण जर तुम्हाला असा डाग पडलेला नको असेल तर तुम्ही काही सोपे उपाय किंवा काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊया तुम्हाला नेमके काय करायला हवे.
पिंपल्स दूर करण्यासाठी मखाणा आहे बेस्ट, असा करा वापर
डॉक्टरांचा सल्ला
असे मोठे फोड चेहऱ्याला आल्यानंतर डॉक्टर हा सगळ्यात सोपा आणि उत्तम पर्याय आहे. तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला ही फोड अधिक योग्य पद्धतीने फोडून मिळते. पण ती फोडण्याआधी काही अशी औषध सेवनासाठी आणि लावण्यासाठी दिली जातात. त्यामुळे तुमच्या पिंपल्सच्या आजुबाजूला आलेली सूज निघून जाते. ती फोड तेवढीच निर्जंतुकीकरण केलेल्या सुईने फोडली जाते. त्यातून सगळा पस बाहेर काढला जातो. त्यावर पट्टी बांधली जाते. त्यामुळे ही जखम लवकर बरी होण्यास मदत मिळते. शिवाय डॉक्टरांनी योग्य पद्धतीने कट दिल्यामुळे त्याचा डागही राहात नाही. त्यामुळे सगळ्यात आधी डॉक्टराचा सल्ला घ्या.
फक्त 15 दिवस लावा कांद्याचा रस आणि मिळवा दाट केस
गरम पाण्याचा शेक
जर हा फोड तुम्हाला नेहमीच येत असेल तर तुम्ही गरम पाण्यात कपडा बुडवून त्याचाही शेक घेऊन शकता. स्वच्छ कपडा घेऊन तो गरम पाण्यात बुडवून पिळून काढा आणि आता तो पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत मिळते. शिवाय पुळीला उष्णता मिळाल्यामुळे ती आपोआपच फुटते. त्यामुळे तुम्हाला नखांचा वापर करावा लागत नाही. पण याचा वापर सतत करु नका दिवसातून दोनवेळा याचा वापर पुरेसा आहे. जर तुम्हाला फारच दुखत असेल अशावेळीही तुम्ही हा शेक दिला तरी चालू शकेल. पण असे करताना पुळी फुटते हा पाहण्यासाठी अतिरिक्त दाब देऊ नका.
घरीच करा लिप स्पा, फॉलो करा या सोप्या टिप्स
जास्वंदाचा पाला
अशा पिंपल्सवर जास्वंदाचा पालाही लाभदायक असतो. त्यामुळेही सूज उतरण्यास मदत मिळते. जर तुम्हाला खूप मोठा पिंपल आला असेल तर एखादे जास्वंदाचे पान घेऊन ते स्वच्छ धुवून त्याला खलबत्त्यात कुटा. तो चिकट पाला तुम्ही आता तुमच्या पिंपल्सवर लावा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळतो. जास्वंदाचा पाला थंडावा देत असला तरी तो शरीरातील उष्णता काढून टाकण्यासही मदत करतो. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास जास्वंदाचा पाला हा लावायला हवा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच थोडा आराम मिळेल.
तांदुळाची पिठी
तांदुळाची पिठी देखील तुम्हाला या पिंपल्सवर अगदी सहज लावता येते. तुम्हाला फक्त तांदुळाचे अगदी थोडेसे पीठ घेऊन त्यामध्ये नुसते पाणी घालायचे आहे. त्याची पेस्ट पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावायच आहे. तांदुळाची पिठी लावल्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. पिंपल्स बसण्यास किंवा फुटण्यास त्यामुळे नक्कीच मदत मिळेल.
आता मोठे पिंपल्स आल्यानंतर तुम्ही हे काही प्रयोग नक्की करुन बघा