बिग बॉस 13 हा शो रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. यावर्षी या शो मध्ये अनेक असे चेहरे दिसले जे गेममध्ये खूपच चांगले आहेत. त्यापैकी एक चेहरा म्हणजे असिम रियाज. असीमने जेव्हा सुरुवातीला या शो मध्ये प्रवेश केला तेव्हा असिमला कोणीही ओळखत नव्हते. पण आता चार महिन्यानंतर बिग बॉस 13 मधील सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारा स्पर्धक म्हणून असीमची ओळख आहे. असिम पहिले पंधरा दिवस खूपच सावध खेळत होता पण त्यानंतर त्याचा गेम खूपच स्ट्राँग झाला. आता मिळालेल्या माहितीनुसार असिम रियाजला मोठा ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. असिमला सनी लिओनबरोबर चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार असून हा ब्रेक चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट देणार असल्याची चर्चा आहे. असिम रियाज हा चित्रपट बिग बॉसच्या घरात असतानाच साईन करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे असिमबरोबर या चित्रपटात सनी लिओन दिसणार आहे.
Bigg Boss 13: स्ट्राँग स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाची एक चूक महागात, झाला बेघर
अधिकृत घोषणा अजूनही नाही
असिमच्या या पहिल्या चित्रपटाविषयी अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण जर ही बातमी खरी ठरली तर असिम आणि त्याच्या चाहत्यांसाठीही ही सर्वात मोठी आनंदाची बाब असेल. महेश भट यांनी सनी लिओनलादेखील जिस्म 2 साठी बिग बॉसमध्ये साईन केलं होतं. त्यामुळे आता असिमच्या बाबतीतही महेश भट हाच निर्णय घेणार का याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. असिम हा बिग बॉसमधील तगड्या स्पर्धकांपैकी एक आहे. सुरुवातील त्याला पाहिल्यानंतर कोणीही असा अंदाज लावू शकत नव्हतं. पण असिमने आपला गेम तगडा करत सर्वांना मात देत स्वतःला चांगला फॅन फॉलोईंग निर्माण केला आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज हे दोघेही स्पर्धक चर्चेत आहेत. त्यामुळे सीझनच्या सुरूवातीपासूनच यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. सुरुवातीला या दोघांना राम – लक्ष्मणची जोडी म्हटलं जायचं. पण काही दिवसांनंतर या दोघांमध्ये आलेला दुरावा आता मिटू शकत नाहीये. आता दोघेही एकमेकांना अजिबात आवडत नाहीत आणि दोघांमधील वाद विकोपाला गेले आहेत. पण तरीही जिंकण्याच्या रेसमध्ये या दोघांमध्येच चुरस आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्येही वार चालू असतात.
Bigg Boss 13: सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल गजाआड
असिम एक इंटरनॅशनल मॉडेल
असिम रियाज हा बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी एक प्रोफेशनल मॉडेल म्हणून काम करत होता. त्याने ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकामध्येही मॉडेलिंग केले असून तो मूळचा काश्मिरचा रहिवासी आहे. याशिवाय त्याने काही लहान – मोठ्या जाहिरातींमधूनही काम केलं आहे. पण त्याला खरी ओळख मिळाली आहे ती बिग बॉसमधून. त्याशिवाय बिग बॉसमधील दुसरी स्पर्धक हिमांशी खुराणावरील त्याचं प्रेमही त्याने व्यक्त केलं होतं आणि त्याविषयीदेखील अनेक चर्चा रंगल्या. हिमांशीने पण असिमचं प्रेम आता स्वीकारलं असून असिम बाहेर आल्यानंतर आता या दोघांचा नक्की काय निर्णय असेल हे बघावं लागणार आहे. कारण असिमने सलमान खानसमोर कायम हिमांशीची काळजी घेऊ असंही बिनधास्त सांगितलं आहे. हिमांशीचं घरात येण्याआधी लग्न ठरलं होतं. पण आता ते लग्न मोडलं असून हिमांशीनेही आपलं असिमवरील प्रेम व्यक्त केलं आहे.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.