बिग बॉस 13 (Bigg Boss) मध्ये आल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून रश्मी देसाई चर्चेत आहे. सर्वात जास्त चर्चा गाजली ती अरहान खान बरोबर असलेल्या तिच्या नात्यावर. अरहान खान बरोबर असलेलं नातं हे सुरूवातीपासून विवादात्मक ठरलं. पण आता या सगळ्या नाट्यानंतर रश्मीने अरहानबरोबर ब्रेकअप करण्याचं फायनली ठरवलं आहे. तिच्या आणि अरहानच्या नात्यावर खूपच मोठा हंगामा झाला होता. पूर्ण जगासमोर सलमान खानने अरहानचं पहिलं लग्न झालं असून त्याला एक मुलगा आहे हे रश्मीपासून लपवून ठेवल्याचं सांगितलं होतं. त्यानंतरही रश्मीला खूप मोठा धक्का बसला होता. पण या सगळ्यावर खूपच चर्चा झाली आणि रश्मीलादेखील या गोष्टीसाठी वेड्यात काढण्यात आलं होतं. पण आता या सगळ्यावर पडदा टाकण्याचा निर्णय रश्मीने घेतला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिमांशी आणि देवोलीनाबरोबर रश्मीने या गोष्टीची चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे.
हिमांशी आणि देवोलिनाकडून पाठवला निरोप
रश्मी देसाईने शेवटी आपल्या आयुष्याचा योग्य निर्णय घेण्याचं ठरवलं असून हिमांशी आणि देवोलिना यांच्याकडून आपल्या कुटुंबाला आणि टीमला हा मेसेज द्यायला सांगितलं आहे. आपल्याला अरहानबरोबर राहायचं नाही असं तिने सांगितलं आहे. याशिवाय आपल्या आयुष्यात अरहानने कोणत्याही प्रकारे ढवळाढवळ करू नये असंही रश्मीला वाटत आहे. घरातून बाहेर पडण्याच्या आधीच रश्मी अरहानबरोबर ब्रेकअप करत आहे. तिने अरहान बरोबर न राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी अरहानने तिचा गैरफायदा घेत तिच्या घराचा वापर केला आणि तिच्या पैशांचा वापर केल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर सलमाननेदेखील रश्मीची कानउघडणी केली होती. त्यानंतर आलेल्या प्रत्येक सदस्याने रश्मी एका चुकीच्या माणसाच्या सहवासात असल्याचं सांगितलं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून अखेर रश्मीने निर्णय घेतला असल्याचं कळत आहे. तिच्या चाहत्यांना तिच्या या निर्णयाने नक्कीच खूप आनंद झाला आहे. अरहान हा रश्मीसाठी कधीच योग्य नव्हता हेच अनेकांचं म्हणणं होतं आणि आता तिच्या चाहत्यांनीदेखील तिच्या या निर्णयाचा आदर केल्याचं दिसून येत आहे.
जयललितांच्या रुपात भरतनाट्यम करणार कंगना, पोस्टर झाले व्हायरल
हिमांशीवर चिडली रश्मी
रश्मीला आता अरहानबद्दल कोणत्याही गोष्टी ऐकून घ्यायच्या नाहीत असं म्हणत रश्मी हिमांशीवर चिडली. अरहानने रश्मी डिस्टर्ब असून ती बऱ्याच गोष्टींंचा खुलासा करू शकत आहे असंही म्हटलं आहे. तसंच आपण बऱ्याचशा गोष्टीत चुकीचे नसल्याचेही अरहानने सांगितले आहे. पण अरहानबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हतं आणि आता याबाबत आपल्याला कोणतीही चर्चा करायची नाही असंही रश्मीने स्पष्ट केलं आहे. पण या सगळ्यात हिमांशी आणि रश्मीचंही नातं खराब झाल्याचं दिसून येत आहे. अरहानमुळे आधीच रश्मीची बऱ्याच लोकांशी मैत्री तुटली आहे. पण आता अजूनही तिची इतरांबरोबर असलेली बाँडिंग बिघडत असल्याचं दिसून येत आहे. या सगळ्याला रश्मीने उचललेलं चुकीचं पाऊल आणि अरहानबरोबरची मैत्री जबाबदार असल्याचं सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे. पण रश्मीला आता अरहानबरोबर कोणत्याही प्रकारची मैत्रीही ठेवायची नसल्याचं तिने नॅशनल टेलिव्हिजनवर सांगितलं आहे. सलमानने पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरल्यावर रश्मीचा स्वतःवरचा ताबा गेला आणि रागात रश्मीने शेवटी हिमांशीवर चिडत हा निर्णय घेतला.
इनाया नौमी वडीलांसोबत या भाषेत मारते गप्पा
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.