रिएलिटी शो बिग बॉसच्या फॅन्सना आता जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. कारण या सिझनचा प्रीमियर अगदी काही दिवसांवर आहे. बिग बॉसच्या फॅन्सना माहीत असेलच की, प्रत्येक सिझनमध्ये काहीतरी हटके अंदाजात बिग बॉस येतं. मग त्याला हा 13 सिझन तरी अपवाद कसा असेल.
बिग बॉस 13 मध्ये बघायला मिळतील हे 10 मोठे बदल Bigg Boss 13 with a new twist In Marathi
शो सुरू होण्याआधीच या सिझनमध्ये नक्की कोण कोण कंटेस्टंट असणार याबद्दल उत्सुकता आहे. तसंच प्रेक्षकांना हेही जाणून घ्यायचं आहे की, यंदाच्या सिझनमध्ये काय हटके असणार आहे. तर सूत्रानुसार, लोकेशन, थीम, टाईमिंग, कन्सेप्ट सर्वकाही वेगळं आणि अजून इंटरेस्टींग असणार आहे. चला जाणून घेऊया हे 10 मोठे बदल जे जाणून प्रेक्षकच नाहीतर या शोमध्ये सहभागी होणारे कंटेस्टंट्सही हैराण होतील.
1. नवीन लोकेशन
प्रत्येकवेळी बिग बॉसचा सेट मुंबईजवळील लोणावळा इथे असायचा. पण यंदाचा सिझन मात्र याला अपवाद आहे. कारण सिझन 13 चा सेट मुंबईतील फिल्म सिटीमध्ये तयार करण्यात आला आहे. यामागील कारण मात्र अजून समोर आलेलं नाही.
2. हॉरर थीम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा प्रेक्षकांना ‘बिग बॉस’ मध्ये हॉरर थीम पाहायला मिळू शकते. कारण सध्या टीव्हीवर हॉरर शोजना चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातल्या भूत आणि हॉरर थीमबाबत उत्सुकता आहे.
3. नवा आवाज
बिग बॉसची खरी ओळख आहे, यातील सूत्रधार बिग बॉसचा आवाज. पण असं कळतंय की, यंदाच्या बिग बॉस सिझनमध्ये बिग बॉसच्या आवाजात एक महिला सूत्रधाराला नेमण्यात येणार आहे. बिग बॉसच्या इतिहासात असं पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. या आधी शोमध्ये अतुल कपूरचा आवाज ‘बिग बॉस चाहते हैं’ कमांड देताना ऐकू यायचा. पण यंदा मात्र हा आवाज कदाचित ऐकायला मिळणार नाही.
4. सलमानचा नवा अवतार
खरंतर बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये सलमानचा नवा अवतार पाहायला मिळतोच. पण सिझन 13 मध्ये भाईजानचं कडक रूप दिसण्याची शक्यता आहे. आता तो फक्त घरातील सदस्यांनी चूक केल्यावर ओरडणार नाहीतर त्यांना शिक्षाही देऊ शकतो.
5. सलमान आणि को-स्टार
सूत्रानुसार, यंदा भाईजान एकटे नाहीतर त्यांच्यासोबत एक फीमेल को-स्टारही दिसू शकते. आता ही होस्ट नेमकी कोण असेल याचा खुलासा शोच्या प्रीमियरच्या दिवशी होईल.
6. टीव्हीच्या सुनांची लागणार लाईन
आतापर्यंत बिग बॉसमध्ये जास्तकरून टीव्ही पर्सनॅलिटीज कंटेस्टंट्स म्हणून पसंती मिळत होती. त्यातही खासकरून छोट्या पडद्यावरील सुनांना. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये मेकर्स टीव्हीवरील सुनांचा सहभाग वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रीमीयरआधी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे, पवित्रा पुनिया, मेघना मलिक, देबीना भट्टाचार्य, रश्मी देसाईसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींच नाव समोर येत आहे.
7. फक्त दिसणार सेलिब्रिटी
बिग बॉसच्या मागच्या सिझनमध्ये आपल्याला सेलिब्रिटीजसोबत काही कॉमनर्ससुद्धा कंटेस्टंट्स म्हणून दिसले होते. यंदा मात्र शोचा फॉर्मेट वेगळा असणार आहे. यंदा फक्त आणि फक्त सेलिब्रिटीजच शोमध्ये सहभागी होतील.
8. चार आठवड्यातच कंटेस्टंट्स पोचणार फिनालेमध्ये
या शोच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोनुसार चार आठवड्यातच फिनाले असेल. पण अशीही हिंट दिली आहे की, हा शो चा शेवट नाही. त्यानंतर असेल नवीन ट्वीस्ट ज्यासोबत शो पुढे जाईल. ज्यामध्ये कंटेस्टंट्सना नवीन चॅलेंजसना सामोर जावं लागेल.
9. प्राईज मनी आधीपेक्षा जास्त
असंही कळतंय की, बिग बॉस सिझन 13 ची प्राईज मनी मागच्या सिझन्सपेक्षा जास्त असेल. कारण यंदाच्या शोमध्ये काही इंटरनॅशनल सेलिब्रिटीजही सहभागी होण्याची शक्यता आहे. तर सलमान भाईजान या पूर्ण सिझनसाठी तब्बल 400 करोड रूपये घेणार आहे
10. तडका आणि ट्वीस्ट
सिझन-13 मध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीबाबतही जबरदस्त प्लॅनिंग करण्यात आलं आहे. अशीही बातमी आहे की, या शोमध्ये राखी सावंत आणि दीपक कलाल एंट्री घेऊ शकतात. बिग बॉसचं टेम्प्रेचर यंदा आधीच्या तुलनेत नक्कीच हाय असलेलं दिसणार आहे. बिग बॉस सिझन 13 मध्ये मेकर्स मोठे बदल करून अनेक मजेशीर ट्वीस्ट टाकणार आहेत.
P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.
हेही वाचा –
‘या’ कारणामुळे उतरन फेम रश्मी देसाईचा बिग बॉस 13 मध्ये भाग घेण्यास नकार
स्वप्नं पूर्ण होतात….शिव ठाकरेने दिला चाहत्यांना संदेश