टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉसचा नवा 14 वा सीझन आता लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीचा या शो च्या ग्रँड प्रिमियरची तारीख घोषित करण्यात आली आहे. सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली आहे आणि या शो च्या इतर गोष्टींच्या तयारीलाही सुरूवात झाली आहे. 3 ऑक्टोबर 2020 पासून रात्री 9 वाजता हा शो प्रसारित होणार आहे. नेहमीप्रमाणे यावेळी शो मध्ये कोणते स्पर्धक असतील याची उत्कंठा आता वाढीला लागली आहे. पण तत्पूर्वी बिग बॉस 14′ मधील सर्व स्पर्धकांची कोरोना चाचणी होणार असून 20 सप्टेंबर पासून हे सर्व स्पर्धक विविध ठिकाणी क्वारंटाईन राहणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
लेटेस्ट निऑन आयमेकअप लुकसाठी हिना खानकडून घेता येईल प्रेरणा
कोरोनामुळे निर्णय
गेले 6 महिने देशभरात कोरोना महामारीचे संकट पसरले आहे. पण त्यामुळे अनेक कामे ठप्प झाली होती. पण आता गेल्या एक महिन्यापासून मनोरंजन क्षेत्रानेही योग्य काळजी घेत विविध ठिकाणी कामे सुरू केली आहेत. आता सर्वांचा आवडता रियालिटी शो देखील यामध्ये मागे नाही. लवकरच या शो ची सुरूवात होत आहे. मात्र यावर्षी सर्व स्पर्धकांना कोरोनामुळे किमान 10 दिवस आधीपासून क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्याआधी त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येईल. ती झाल्यानंतरही स्पर्धकांना क्वारंटाईन राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच या कोरोना कालावधीमुळे अनेक नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. अति काळजी घेत हा शो सुरू करण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धकांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. साधारण 20 ते 21 तारखेपासून या स्पर्धकांना या ठिकाणी क्वारंटाईन व्हावे लागेल अशी माहिती आता समोर आली आहे. शो ग्रँड प्रिमियरपर्यंत या सर्व स्पर्धकांना हे सर्व नियम पाळावे लागणार आहेत. तसंच घराच्या आत जाण्यासाठी घ्यावी लागणारी सर्व काळजी आणि वैद्यकीय चाचणी हेदेखील करण्यात येणार आहे.
सौरव गांगुलीवर येणार बायोपिक, हा अभिनेता साकारणार का भूमिका
अजूनही नावं गुलदस्त्यात
यावेळी कोण स्पर्धक आहेत हे जरी अजून गुलदस्त्यात असले तरीही सध्या काही नावांचा अंदाज लावला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींना हा शो नाकारला असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे नक्की या शो मध्ये आता कोणकोण सेलिब्रिटी असणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. पण अंदाज लावल्याप्रमाणे यामध्ये जस्मीन भासिन, अली गोनी, एजाज खान, सारा गुरपाल, नेहा शर्मा, पवित्रा पुनिया, नैना सिंह, निक्की तांबोळी, निशांत मलखानी यांची नावे घेण्यात येत आहेत. याशिवाय बिग बॉस हाऊसमध्ये 4 युट्यूबर्सदेखील असतील असा अंदाज आहे. या युट्यूबर्सना मुंबईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. हे सर्व दिल्लीतून मुंबईत आल्याचे सांगण्यात आले आहे. तर आता अजून कोणाकोणाची नावे समोर येतील याबद्दलही प्रेक्षक उत्सुक आहेत.
अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज आता ‘Amazon Alexa’ला
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक