यावर्षी बिग बॉसचा (Bigg Boss 14) सीझन गाजवला तो मराठमोळ्या राहुल वैद्यने (Rahul Krushna Vaidya). कोणत्याही स्पर्धकाशी सामना असो अथवा कोणत्याही स्पर्धकाला पाठिंबा देणं असो, रूबीनाबरोबर वाद असो अथवा अलीबरोबरची मैत्री असो. राहुलच्या प्रत्येक गोष्टीसाठी राहुल वैद्यला पाठिंबा मिळाला. त्याच्या चाहत्यांमध्येही (RKVians) वाढ झाली. इतकंच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही राहुल वैद्यला पाठिंबा दिला. अनेक वेळा राहुल वैद्यला टारगेट करण्यात आलं पण राहुल वैद्यने आपल्या वागण्याने मात्र प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. तर याच शो मध्ये त्याने आपलं प्रेम अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) वर असल्याचं सांगून दिशालाही सुखद धक्का दिला होता. राहुलने दिशाचं मन तर जिंकलंच पण आता सलमान खान (Salman Khan) आणि प्रेक्षकांचं मनही जिंकलं आहे. सलमानने नुकतंच विकेंड का वार (Weekend ka War) मध्ये राहुल अत्यंत संवेदनशील माणूस असल्याचं म्हणत राहुलविषयी आपलं मत व्यक्त केलं. तर राहुल फिनालेमध्ये जाणारा पहिला स्पर्धक ठरला आहे. दरम्यान राहुल आणि दिशा कधी लग्न (Rahul and Disha wedding) करणार आणि कोणता मुहूर्त निघाला आहे याची वाट चाहते पाहत आहेत. कारण मध्यंतरी राहुलची आई गीता वैद्य शो मध्ये येऊन गेली तेव्हा तिने लग्नाच्या तयारीला सुरूवात केली असल्याचं स्पष्ट केलं होतं.
अट मान्य असेल तरच लग्न करेन, प्रियांका चोप्राने केला निकसह लग्नाचा खुलासा
जूनमध्ये राहुल आणि दिशाच्या लग्नाची तारीख
दिशा परमारला राहुलने लग्नाची मागणी घातल्यानंतर दिशाला सगळ्या जगातून भाभी असंच म्हटलं जात आहे. राहुलची आई गीता वैद्य यांनी लग्नाची तयारी सुरू केली असल्याचे एका मुलाखतीत सांगितले आहे. इतकंच नाही तर जूनमध्ये दोघांचं लग्न ठरणार असून अजून लग्नाची तारीख मात्र ठरवण्यात आलेली नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. राहुल शो मधून बाहेर आल्यानंतर लग्नाची तारीख निश्चित करावी अशी सर्वांची इच्छा असल्याचं राहुलच्या आईने सांगितलं आहे. त्यानेही काही योजना आखल्या असतील. त्यामुळे त्याच्या आवडीनुसार पुढच्या सगळ्या गोष्टी होतील असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण लग्नाच्या बेसिक गोष्टींंना आम्ही सुरूवात केली आहे असंही त्यांनी सांगितलं. राहुलने दिशाला मागणी घातल्यानंतर सर्वांनाच सुखद धक्का मिळाला होता. पण त्यानंतर दिशाच्या आईवडिलांशी भेट घेऊन राहुलच्या आईवडिलांनी लग्नाची बोलणी केली आणि दिशाचे आईवडिलही अत्यंत उत्साही असल्याचे सांगितले आहे.
Good News: ही प्रसिद्ध गायिका लवकरच होणार आई, शेअर केला फोटो
राहुल आणि दिशाची लव्ह स्टोरी (Love story of Rahul and Disha)
राहुल आणि दिशा यांची भेट कॉमन मित्रमैत्रिणींद्वारे झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांनाही आपलेपणा वाटला होता. दोघे नेहमी आपल्या मित्रमैत्रिणींसह फिरायला जात होते. पण एकमेकांबद्दल प्रेम अथवा लग्न याबद्दल दोघांनाही काहीही माहीत नव्हते. पण बिग बॉसमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिशाबद्दल मैत्रीपेक्षाही अधिक काही भावना असल्याचे राहुलला जाणवले आणि दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने नॅशनल टेलिव्हिजनवर आपल्या प्रेमाची कबुली देत दिशाला लग्नासाठी मागणी घातली होती. त्यानंतर दिशाने आपला होकारही कळवला. दोन आठवड्यात शो संपणार असून राहुल वैद्य जिंकावा अशीच चाहत्यांची इच्छा आहे.
बॉलीवूड सुपरस्टार्स ज्यांनी हॉलीवूड चित्रपटांना दिला नकार
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक