ADVERTISEMENT
home / बिग बॉस
Bigg Boss14: राखी सावंतच्या कथित नवऱ्याने राहुल महाजनच्या ‘त्या’शब्दावर व्यक्त केला राग

Bigg Boss14: राखी सावंतच्या कथित नवऱ्याने राहुल महाजनच्या ‘त्या’शब्दावर व्यक्त केला राग

चॅलेंजर्स घरात आल्यापासून दररोज Bigg Boss 14 च्या घरात काहीना काही घडत आहे. पहिल्या सीझनची स्पर्धक आणि इंटरटेनर राखी सावंत ही प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे. त्यामुळे राखीची सगळ्या प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. खेळात असताना भांडणं ही आलीच आणि या घरात तर ती व्हायलाच हवी असे आहे. राखी सावंत आणि राहुल महाजन हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण त्यांच्यामध्ये घरात असा काही खटका उडाला की, राहुल महाजनने राखीविषयी काढलेला ‘चीप’ हा शब्द तिला खूपच लागला. राहुल महाजनच्या त्या एका शब्दावर राखीचा नवरा रितेश याने नाराजी व्यक्त केल्याचे कळत आहे. मीडिया हाऊसला दिलेल्या रितसर मुलाखतीत त्याने राखीची बाजू मांडली आहे. जाणून घेऊया काय म्हणाला तिचा हा कथित नवरा रितेश

Bigg Boss 14: घरात सुरु झालं आहे जास्मिन-अली-निकी असं लव्ह ट्रँगल

राहुल महाजन आहे तरी कोण?

राहुल महाजनचा समाचार घेताना रितेश म्हणाला की, राहुल आहे तरी कोण? त्याने मुद्दाम त्यांच्या आडनावाचा उल्लेख न करता त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्याच्या आडनावाचा विचार करता त्यांचे घराणे हे राजकारणाशी संबधित आहे. पण राहुलचे आडनाव काढून टाकले तर त्याला कोण ओळखतं? त्याच्याकडे कोणतेही टॅलेंट नाही, त्याला अभिनय येत नाही त्यामुळे तो कोणत्याही चित्रपटात काम करु शकत नाही. ज्याच्यामध्ये टॅलेंट नाही त्याला सेलिब्रिटी का म्हणायचे हा पहिला प्रश्न आहे. यापुढे रितेश म्हणाला की, राहुलकडे पैसा, कुटुंबाचा पाठिंबा आणि या क्षेत्रात येण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत असे असताना त्याने राखीला चीप म्हणणे म्हणजे ज्या जनतेने तुम्हाला जिंकवून मोठे केले त्या जनतेचा अपमान करणे आहे.

राहुलवर दोन गंभीर गुन्हे दाखल

राहुल महाजनविषयी अधिक बोलताना रितेश म्हणाला की, राहुल महाजनचा भूतकाळ काय आहे?हे सगळ्यांना माहीत आहे. राहुल महाजनवर दोन वेळा दोन वेगळ्या महिलांनी घरगुती हिंसा केल्याचे आरोप केले आहे. महिलांना मारहाण केल्याचे आरोप आहेत. अशावेळी जर या व्यक्तीचे आडनाव काढून घेतले तर याचे अस्तित्व काय? जो महिलांचा मान ठेवू शकत नाही आणि ज्याने भूतकाळात या गोष्टी केल्या आहेत .त्याने खेळात आपण काय बोलतोय याचा थोडासा विचार करायला हवा होता. कोणाच्याही खासगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याआधी विचार करणे हे फार महत्वाचे आहे असे रितेश म्हणाला. 

ADVERTISEMENT

2020 मध्ये या हिंदी मालिकांना बसला आर्थिक मंदीचा फटका

राखीचे आयुष्य एक संघर्ष

राखीचा करिअर ग्राफ हा कायम चढता राहिला आहे. आयटम गर्ल अशी तिची ओळख असली तरी तिने स्वत:च्या जीवावर सगळे कमावले आहे. रितेश हा राखी सावंतचा खूप मोठा फॅन आहे. राखीने आतापर्यंत जे काही स्टंट केले आहेत त्या सगळ्याच्या मी पाठिशी आहे कारण त्यामध्ये तिचा उद्देश हा फक्त पैसे कमावणे असा होता.  त्यामुळे तिने जे काही केले ते केवळ कुटुंबाला सांभाळण्यासाठी केले. कुटुंब सांभाळणे त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यासाठी काम करणे हे सगळे राखीने केले आहे. त्यासाठी तिचा मला अभिमान आहे. आजही ती ज्या गोष्टी करते जो लोकांना स्टंट वाटतो त्यामागेही तिचे काही कारण असते. तिच्या अंगावर आई आणि भावंडाची जबाबदारी जी ती एकटी घेत आहे. आजच्या जगात असे कोणीही करत नाही. राखी या जबाबदाऱ्यांमुळे स्वत:चा संसार करु शकली नाही. या जबाबदाऱ्यांनंतर तिने लग्नचा निर्णय घेतला. 

राहुल महाजनचे राखीला ‘चीप’ बोलणे राहुलला नक्कीच महागात पडणार आहे. कारण राखीचा नवरा त्याचे काही प्रश्न घेऊन त्याच्याकडून या सगळ्या गोष्टी नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. असा सज्जड दमही त्याने दिला आहे. आता या कार्यक्रमात राखीचा नवरा येईल का? अशी प्रतिक्षा अनेकांना आहे.

उर्वशी रौतेलाने मित्राच्या लग्नात नेसली लाखोंची साडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

ADVERTISEMENT
27 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT