ADVERTISEMENT
home / बिग बॉस
Bigg Boss 14: शार्दुल पंडित खेळातून बाहेर, रुबिनाला वोटिंगमध्ये दिली टक्कर

Bigg Boss 14: शार्दुल पंडित खेळातून बाहेर, रुबिनाला वोटिंगमध्ये दिली टक्कर

बिग बॉसच्या घरातून आता आणखी एका सदस्याला बेघर करण्यात आले आहे. हा बेघर झालेला सदस्य आणखी कोणी नसून आरजे शार्दुल पंडित आहे. कमी वोट्स मिळाल्यामुळे शार्दुल या खेळातून बाहेर पडत असला तरी देखील रुबिनाला टक्कर देत त्याला मत मिळाली आहेत.रुबिनासारखी टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री असून आणि शार्दुल पंडितचा फारसा फॅन फॉलोनिंग नसूनसुद्धा त्याने एका मोठ्या सेलिब्रिटीला टक्कर दिल्याचे या शोचा होस्ट सलमान खान याने देखील सांगितले आहे. शार्दुल या खेळातून बाहेर पडल्यानंतर आता या घरात टॉप 10 स्पर्धक राहिले आहेत. यांच्यातच हा सगळा सामना रंगणार आहे.

Bigg Boss 14: राहुल वैद्यने जान सानूवर केले नेपोटिझमचे आरोप

शार्दुल पंडितची आई होती आजारी

शार्दुल पंडित हा रेडिओ मिरचीचा एक चांगला रेडिओ जॉकी आहे. पण लॉकडाऊनच्या काळात कोणतेही काम नसल्यामुळे त्याच्यावर अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली होती. त्याच्याकडे पैसा आणि काम दोन्ही नव्हते. घराचा गाडा व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांनी बिग बॉस शोसाठी होकार दिला. त्याने त्याची कहाणी सांगितल्यानंतर अनेकांना त्याचे शो मध्ये येणे अनेकांना आवडले होते. पण या शोमध्ये येण्यापूर्वी त्याच्या आईची तब्येत फार बिघडली होती. त्या काळातही पैसे मिळावेत म्हणून त्याने हा शो स्विकारला. सलमानने त्याला घराबाहेर येण्याची आज्ञा देण्याआधी त्याची आई आजारी असल्याचे सांगितले शिवाय जर तुम्हाला काही मदत हवी असेल तरीदेखील आम्हाला सांगावे असे सांगितले होते. त्यामुळे शार्दुल पंडित स्वत:हून घराबाहेर पडला की, त्याच्या आईच्या कारणामुळे त्याला घराबाहेर काढण्यात आले असा अनेकांना संशय आहे.

Bigg Boss 14 च्या या स्पर्धकाविषयी काय म्हणाला पारस छाबडा

ADVERTISEMENT

शार्दुल घरात होता फारच शांत

बिग बॉसच्या खेळा नेहमी चटपटीत आणि काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्ननकरणारे कलाकार फारच आवडतात. शार्दुल पंडित हा इतर कलाकारांपुढे फार काही विशेष कामगिरी करु शकला नाही. तो घरात गेल्यापासून फार काही दिसला नाही. तो या घरात तीन आठवडे राहिला. पण तरी त्याचे अस्तित्व फार जाणवले नाही. त्यामुळेच आधीपासून तो दिसत नसल्याची अनेकांची मतं होती. त्याचा फटका  शार्दुलला नॉमिनेशनसाठी बसला आणि तो यंदा आऊट झाला. त्या आधी या घरातून नैना सिंह देखील आऊट झाली. नैना सिंहने खेळाचा योग्य अभ्यास करुन सुद्धा लोकांना तिला सहजपणे या घरामध्ये पसंत केले नाही. याचा फटयचा तिला नॉमिनेशनध्ये झाला. 

आता पुढे काय?

सलमानने सांगितल्याप्रमाणे आणि खेळाला पाच आठवडे उलटल्यानंतर आता या स्पर्धेने अर्धा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार केल्यानंतर आता स्पर्धा अधिक कठीण होत जाते. पण या नव्या सीझननुसार कधी सीन पलटेल हे काही केल्या सांगता येत नाही. त्यामुळे आता या स्पर्धेत आणखी काय होईल याची प्रतिक्षा आहे. दरम्यान, शार्दुल पंडित घराच्या बाहेर गेल्यानंतर घरातल्यांना काहीही फरक पडलेला नाही. उलट आता गेम अधिक वेगळ्या पद्धतीने आणि फार कठीण होत जाणार आहे. 

सध्या घरात कोणाची मैत्री कोणाशी हे फारसे कळत नसले तरी काही नवी नाती जुळताना आणि नवी नाती तुटताना दिसत आहेत. 

Bigg Boss 14 : राहुल वैद्यची वाढतेय क्रेझ, प्रेक्षकही देतायत दाद

ADVERTISEMENT
16 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT