‘मास्टर माईंड’ अशी ओळख असलेल्या विकास गुप्ताचे अनेक ब्रेक डाऊन यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे त्याचा या सीझनमधील खेळ फारसा टिकू शकला शकला नाही. या घरात असताना त्याची लैंगिकता, त्याचे कुटुंब, त्याची कामाची पद्धत आणि त्याच्या रिलेशनशीपवरुन घरात अनेक वादाचे प्रसंग निर्माण झाले. त्याने कितीही स्पष्टीकरण दिले तरी देखील अनेकांनी त्यांच्यावर लैगिंक शोषणाचे आरोप केले. पण आता विकास गुप्ता घराबाहेर आला असून त्याने अधिक मजबूतीने सगळे काही लढायचे ठरवले असेच दिसत आहे. त्याच्या विरोधात सातत्याने बोलणाऱ्या काही सेलिब्रिटींवर त्याने मानहानीचा दावा केला आहे. त्याची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत त्याने त्यांची चांगलीच कानउघडणी देखील केली आहे.
माझ्यासारखी दुसरी अभिनेत्री मिळणे नाही,कंगनाला प्रशांत भूषणने दिले असे उत्तर
काय म्हणाला विकास गुप्ता ?
विकास गुप्ता सातत्याने Bigg Boss च्या घरात लैगिंक शोषण,MeToo मुळे चर्चेत होता. त्याने आरोपाचे अनेकदा खंडन केले पण तरीही त्याच्याबद्दल अनेकांनी वाईट मत प्रकट केली. पण आता या आरोपांना कंटाळलेल्या विकासने त्याच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्यावर आरोप करणाऱ्या प्रियांक शर्मा, विकास खोकर ( रोडीज), पार्थ समांथन या तीन सेलिब्रिटींवर मानहानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. विकास म्हणाला की, माझ्यावर सातत्याने या तिघांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप होत आहेत. पण त्यांच्याकडे या संदर्भात कोणताही पुरावा नाही. आतापर्यंत आमच्यामध्ये जे काही बोलणं झालं त्या सगळ्याचे चॅट माझ्याकडे आहेत. मी या तिघांच्या मागे लागलो नाही तर हेच मला भेटण्यासाठी सतत मेसेज करत होते. जर मी यांच्यावर लैंगिक अत्याचार केला असता तर मी त्यांना भेटण्यासाठी मिनतवाऱ्या केल्या असत्या त्यांनी नाही. त्याने याच्या पुराव्यादाखल स्क्रिन व्हिडिओही शेअर केला आहे.
मागावी माफी
विकास गुप्ताने हा व्हिडिओ करत या तिघांची पोलखोल केली असली तरी देखील त्याने लगेचच टोकाचे पाऊल उचलले नाही. तो अद्यापही शांत आहे. त्याने या तिघांना बदनाची करण्यासाठी माफी मागण्यास सांगतले आहे. जर त्यांनी विकासच्या दिलेल्या काळात माफी मागितली नाही तर विकास त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचे देखील त्याने यामध्ये म्हटले आहे. विकास गुप्ताने घेतलेली तिन्ही नाव ही प्रसिद्ध असून त्यांच्या या आरोपामुळे विकासचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. त्याच्या कुटुंबापासून तो दुरावला गेला आहे. त्यामुळेच त्याने माफीची मागणी केली आहे. अन्यथा कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.
Bigg Boss 14: राहुल वैद्य आणि दिशा करणार या महिन्यात लग्न, आईने केला खुलासा
विकासला मिळाली संधी
विकासची लैंगिकता कळाल्यानंतर त्याच्यावर अनेक आरोपप्रत्यारोप करण्यात आले. विकासने अनेक तरुण मुलांचे लैंगिक शोषण केले आहे. त्यांच्याकडून अश्लील फोटोची मागणी केल्याचेही काही आरोप त्यामध्ये आहेत.या पैकी कोणताही आरोप आतापर्यंत सिद्ध होऊ शकलेला नाही. विकासला Bigg Boss 14 च्या माध्यमातून आणखी एक संधी मिळाली. पण त्याकाळातही तो आजारी असल्यामुळे जास्त काही करु शकला नाही.
आता विकासने या तिघांवर मानहानीचा दावा केला तर काय होईल? हे पाहावे लागेल.
तुझ्यात जीव रंगला’ मधील या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, चाहत्यांना सुखद धक्का