ADVERTISEMENT
home / बिग बॉस
bigg boss 15 चे स्पर्धक

Bigg Boss 15 : जंगलात टिकू शकतील का हे नवे स्पर्धक, असा रंगला ग्रँड प्रिमिअर

आला रे आला हिंदी Bigg Boss चा नवा सीझन 15 सीझन आला.  दरवर्षी या कालावधीत सलमान खान होस्ट करणारा हा शो आला की, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. तीन महिने आता फुल्ल इंटरटेन्मेंटचे असणार यात काही शंकाच नसते. अनेक मोठ्या कलाकारांसह आता पुन्हा एकदा Bigg Boss 15 सुरु झाला आहे. शनिवारी या शो चा ग्रँड प्रिमिअर पार पडला. अगदी ग्रँड अशा या सोहळ्याची थीम यावेळी जंगल असल्यामुळे जंगलातील वेगवेगळी पात्र अशी थीम ठरवण्यात आली होती. त्यामुळे त्या थीमनुसार एकेक सेलिब्रिटी या घराच्या आत गेला.सीझन 15 हा अगदी दमदार होणार आहे कारण या सीझनमध्ये अनेक असे प्रसिद्ध चेहरे आत आहेत. ज्यामुळे या खेळाला एक वेगळी मजा येणार आहे.  जाणून घेऊया या घरातील 15 सेलिब्रिटींची ही यादी

तारक मेहता.. मधील नट्टू काका यांचे निधन

जय भानुशाली

Instagram

टीव्हीवरील नावाजलेला चेहरा जर कोणी असेल तर तो जय भानुशाली. अनेक मालिकांमधून त्याचे लीड रोल साकारले आहेत. इतकेच नाही तर हल्ली सगळ्या रिॲलिटी शोचे होस्टिंगही जय करतो. त्यामुळे जय कायमच काही ना काही कारणास्तव स्क्रिनवर दिसतच असतो. जय भानुशालीला या रिॲलिटी शोमध्ये पहिले जाण्याची संधी मिळाली. खुद्द सलमान खान याने त्याला थेट घरात जाण्याचा मान दिला. त्यामुळे तो किती खास हे नक्कीच कळले असेल. 

विशाल कोटियन

विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला कलाकार विशाल कोटियन हा देखील या खेळाचा भाग आहे.  अकबर बिरबल मालिकेतून बिरबलच्या भूमिकेत गेली कित्येक वर्ष तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सेन्स ऑफ ह्युमरने भरलेला आणि दगडी चाळीत वाढलेला हा कलाकार अस्सल मुंबईकर आहे. त्याच्या नसानसात मुंबईचा खुलेपणा भरलेला दिसून येतो.

ADVERTISEMENT

करण कुंद्रा

Instagram

 एका नावाची चर्चा जी फारच जोरात सुरु होती तो चेहरा म्हणजे करण कुंद्रा. आता हिंदी मालिकांमध्ये काम केलेला हा चेहरा कोणाला माहीत नसेल तर विरळाच. कितनी मोहब्बते, लव स्कुल, मुबारका, हॉरर स्टोरी अशा काही मालिका आणि चित्रपटातून झळकलेला हा चेहरा खूप जणांच्या आवडीचा आहे.  करण कुंद्रा कोणाला माहीत नाही असे मुळीच होणार नाही. करणसोबत रिलेशनशीपच्या चर्चाही अधिक रंगतात. आता या घरात तो पुन्हा कशासाठी प्रसिद्ध होईल ते पाहावे लागेल.

तेजस्वी प्रकाश

 मराठमोळा चेहरा पुन्हा एकदा हिंदी बिग बॉसचा भाग आहे तो म्हणजे तेजस्वी प्रकाश वायंगणकर. पेहरेदार मे पिया की, स्वरागिनी, रिश्ता लिखेंगे हम नया अशा मालिकांमधून तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चुलबुली अशी तेजस्वी प्रकाश घरात गेल्या गेल्याच आपल्या स्वभावाने अनेकांची मते जिंकताना दिसत आहे. 

लेशान सेहगल

Instagram

मॉडेल आणि अभिनेता अशी ओळख असलेला लेशान हा देखल या खेळाचा भाग आहे.  त्याची कारकिर्द ही खूप जणांना माहीत नसली तरी या घरातील तो एक चार्मिंग चेहरा जरुर असणार आहे. फिटनेस आणि परफेक्ट बॉडीसाठी ओळखला जाणारा लेशान हा या घरातील एक हॉट फेस नक्कीच आहे.

सिंबा नागपाल

 अभिनेता सिंबा नागपाल ही यंदाचा स्पर्धक आहे. शक्ति एक अस्तित्व की लढाई या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. हँडसम आणि परफेक्ट असा हा चेहरा यंदा अनेकांना घायाळ करणार आहे हे नक्की! सिंबाचा अर्थ सिंह असा होतो असेच त्याचे गुण जादूई मिररने देखील दाखवले आहेत. त्यामुळेच की काय घरात त्याचा चांगलाच बोलबाला होणार आहे.

ADVERTISEMENT

डोनाल बिष्ट

 जस्मिन भसीन गेल्यावर्षी बिग बॉसच्या घऱात गेल्यानंतर तिच्या मालिकेतील रोलला रिप्लेस करणारी ही अभिनेत्री यंदा घरात आहे. तिचे अनेक चाहते आहेत. तिने अनेक मालिकांमधून काम केले असून ती एक नावाजलेला असा चेहरा आहेत. डोनाल बिष्ट हीने हॉट आणि सिझलींग असा लाल रंगाचा गाऊन घातला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती.

उमर रियाझ

असीम रियाझचा भाऊ उमर रियाझ हा देखील या खेळाचा भाग आहे.  दिलजित दोसांज याच्या एका म्युझिकल व्हिडिओमध्ये तो दिसला होता. अत्यंत देखणा असा हा चेहरा या वेळी घरात अनेकांचे मन जिंकून घेण्यासाठी सज्ज झाला आहे.  उमर हा एक डॉक्टर असून त्याने अभिनय सोडून पुन्हा एकदा प्रॅक्टिस सुरु केली होती. पण आता या नव्या रिॲलिटी शोमुळे त्याला पुन्हा एकदा येण्यास नक्कीच फायदा होणार आहे.

साहिल श्रॉफ

 मॉडेल म्हणून गेली अनेक वर्ष हा चेहरा कित्येकांच्या समोर आला आहे. डॉन 2 या चित्रपटातून झळकलेा हा मॉडेल देखील यंदा या खेळाचा भाग आहे.  साहिल श्रॉफने अनेक मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे. हा आणखी एक चेहरा घरातील हँडसम मुलांना टक्कर देणारा आहे.

अफसाना खान 

 जिच्या गाण्याने सगळ्यांना वेड लावले अशी गायिका अफसाना खान या खेळाचा भाग आहे. ‘यार मेरा तितलिया वर्गा’ हे गाणं सगळ्यांना आतापर्यंत नक्कीच माहीत असेल हे गाणं गाणारी ही सेलिब्रिटी या खेळात दिसणार आहे. अत्यंत शांत स्वभावाची ही सेलिब्रिटी घरात गेल्यानंतर खेळ कसा दाखवेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ADVERTISEMENT

शमिता शेट्टी 

शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री अशी ओळख असलेली शमिता शेट्टी ही देखील या खेळाचा भाग आहे. नुकत्याच झालेल्या ओटीटीमध्ये ती होती. या आधीही शमिता या खेळाचा भाग राहिलेली आहे. पण ती या खेळात जिंकू शकलेली नाही. आता या सगळ्या सेलिब्ससोबत ती नेमकी कशी राहील आणि टिकू शकेल का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे

प्रतीक सेहजपाल

अभिनेता आणि मॉडेल अशी ओळख असलेला कॉन्ट्राव्हर्सीजचा पिटारा असलेला हा कलाकार देखील याचा भाग आहे. अनेकांनी याला आधीच ओटीटीवर पाहिलेले आहे. त्याचा खेळ अनेकांना आवडतो. त्यामुळेच की काय त्याला पुन्हा एकदा या घरात राहण्याची संधी मिळाली आहे. 

आकशा सिंह

नागीनागीन, खिंच मेरी फोटो अशा गाण्यांमधून पुढे आलेली आकशा सिंह ही देखील यंदा या खेळाचा भाग आहे. उत्तम गाण्यासोबत ती सुंदर सुद्धा आहे. त्यामुळे नक्कीच तिच्या येण्याने घरात वातावरण हे हॉट आणि सिझलिंग होणार आहे यात काहीही शंका नाही

निशांत भट

ओटीटीचा आणखी एक चेहरा, कोरिओग्राफर आणि उत्तम खेळाडू अशी ओळख असलेला निशांत भट हा देखील याचा भाग आहे. त्याने उत्तम कामगिरी करत या खेळात आपले स्थान पटकावले आहे. आता या खेळाचा पॅटर्न त्याला आधीच माहीत असल्यामुळे तो नेमका कसा खेळणार हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे.

ADVERTISEMENT

माएशा अय्यर

स्प्लिट्सव्हिला फेम माएशा अय्यर देखील या खेळाचा भाग आहे.  या आधी ती एस ऑन स्पेस नावाच्या कार्यक्रमात प्रतीक सेहजपालसोबत होती. त्यामुळे ती प्रतीकच्या परिचयाची आहे.  खेळात हुशार असलेली माएशा आणि प्रतीक यांच्यामध्ये नेमके काय नाते आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

हे आहेत यंदाचे मंजे खिलाडी. जे सगळ्यांचे मनोरंजन करतील यात काहीही शंका नाही.

04 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT