ADVERTISEMENT
home / मनोरंजन
bigg-boss-3-marathi-actress-sneha-wagh-will-play-negative-role-in-hindi-serial-in-marathi

‘बिग बॉस मराठी’नंतर स्नेहा वाघ पुन्हा हिंदी मालिकेकडे, साकारणार नकारात्मक भूमिका

स्नेहा वाघने (Sneha Wagh) मराठी आणि हिंदी मालिकांमधून आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) तिसऱ्या सीझनमध्येदेखील स्नेहाने आपले असे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यानंतर तिच्या चाहत्यांना वाटले होते की, स्नेहा पुन्हा एकदा मराठी मालिका अथवा एखाद्या मराठी कार्यक्रमातून दिसेल. मात्र त्यानंतर स्नेहा केवळ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. मात्र आता स्नेहाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, स्नेहा पुन्हा एकदा मालिकेतून समोर येत आहे. मात्र पुन्हा एकदा स्नेहाने हिंदी मालिका निवडली आहे. ‘ना उम्र की सीमा हो’ या मालिकेतून स्नेहा नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने शेअर केले आहे. 26 जुलैपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून इक्बाल खान (Iqbal Khan) आणि रचना मिस्त्री (Rachana Mistry) मुख्य भूमिकेत आहेत. तर स्नेहासह अभिनेत्री समिधा गुरू (Samidha Guru) आणि वर्षा दंडाले (Varsha Dandale) देखील या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 

मराठी चाहत्यांची निराशा

स्नेहा वाघचे अनेक चाहते आहेत. बिग बॉसनंतर स्नेहा कोणत्यातरी मराठी प्रोजेक्टमधून समोर येईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र स्नेहा आता पुन्हा हिंदी मालिकेतूनच प्रेक्षकांसमोर येत आहे. बिग बॉसनंतर स्नेहाचीदेखील मराठीत काम करण्याची इच्छा होती. मात्र तिला वेगळ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर यायचे होते. आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून स्नेहाने काम केले आहे. काही दिवसांपूर्वी एका मराठी रियालिटी शो च्या सूत्रसंचालनासाठी स्नेहा सज्ज झाली आहे असंही सांगण्यात येत होते. पण स्नेहा अत्यंत शांत आणि मितभाषी असल्याने सूत्रसंचालन करणे स्नेहाला किती झेपेल आणि तिच्या व्यस्त वेळापत्रकातून शो साठी ती किती वेळ काढू शकेल असाही प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. पण आता या हिंदी मालिकेबाबत घोषणा झाल्यामुळे स्नेहा अन्य कोणत्याही अशा शो मध्ये दिसणार नसल्याचे समोर आले आहे. 

स्नेहा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

स्नेहा वाघचे सोशल मीडियावर खूपच चाहते आणि फॉलोअर्स आहेत. बिग बॉस मराठीनंतर तिच्या चाहत्यांमध्ये वाढच झालेली दिसून येत आहे. आपल्या चाहत्यांसाठी स्नेहा नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसून येते. फोटो, व्हिडिओ आणि रिल्सच्या माध्यमातून स्नेहा नेहमी आपल्या चाहत्यांशी जोडलेली राहाते. पण आता पुन्हा एकदा स्नेहा मालिकेतून समोर येणार असल्याने चाहत्यांनाही आनंद झाला आहे आणि तिच्या या पोस्टवर भरभरून चाहते कमेंट्स करत आहेत. पण याचसह स्नेहाने मराठी मालिका अथवा मराठी चित्रपटांमधूनही काम करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. आता ही इच्छा स्नेहा नक्की कधी पूर्ण करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा स्नेहा हिंदी मालिकांकडे वळली असल्याचेही दिसून आले आहे. कोणत्याही माध्यमातून का असेना पण स्नेहा आपल्या चाहत्यांसमोर येत आहे यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
25 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT