‘बिग बॉस 7’ (Bigg Boss 7) विजेती गौहर खान (Gauahar Khan) सध्या तिच्या आयुष्यातील उत्कृष्ट वेळ घालवताना दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडियावर ती वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असते आणि मजाही करत असते. आपल्या चाहत्यांनाही गौहर आपल्या मजेत समाविष्ट करून घेताना दिसते. पण आता तिने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे सर्वांनाच डोकं खाजवून विचार करण्याची नक्कीच वेळ आली आहे. तिचा तथाकथित बॉयफ्रेंड झेद दरबारबरोबर (Zaid Darbar) हा व्हिडिओ असून दोघेही यात नाचताना दिसत आहेत. पण पबजी मध्ये व्यग्र असलेल्या आपल्याला बॉयफ्रेंडला डायमंड रिंग देण्याचा हट्ट करणारी गर्लफ्रेंड गौहरने अप्रतिमच वठवली आहे. मात्र व्हिडिओच्या शेवटी झेदने दिलेल्या अंगठीनंतर हे केवळ गाण्यापुरतं आहे की, खरंच गौहरला झेद लग्नाची मागणी घालत आहे असा प्रश्न आता चाहत्यांनाही पडला आहे.
प्रेग्नेंसीनंतर नताशा पंड्याचा हॉट अंदाज, फोटो वायरल
#GaZa असे नावही होत आहे ट्रेंडिंग
गौहर आणि झेदचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या शेवटी झेदने गुडघ्यावर बसून गौहरच्या बोटात अंगठी घातल्याचे दिसत आहे. पण हा केवळ अभिनयाचा भाग आहे की, मनातली गोष्ट? गौहरनेदेखील अशीच कॅप्शन या व्हिडिओखाली दिली आहे. ‘हा गाण्याचा परिणाम आहे की मनातली गोष्ट??? लवकर सांग…#GaZa किलिंग इट..#dropYourLove @zaid_darbar Ssshhhhhhh’ अशा प्रकारची कॅप्शन गौहरने लिहिली आहे. त्यामुळे आता प्रत्येकालाच गौहर लवकरच झेदबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार असे वाटू लागले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांचेही अधिकृत सोशल अकाऊंट एकमेकांच्या फोटो आणि व्हिडिओने भरलेले दिसून येत आहे. तसंच आता #GaZa हे नावही ट्रेंडिंग होत आहे. चाहत्यांनाही गौहर आणि झेदची केमिस्ट्री खूपच आवडत असून त्यांचे हे निकनेमही त्यांना आवडल्याचे दिसून आले आहे.
अखेर कंगनाची मुक्ताफळं थांबवायला रवीना सरसावली, दिले सडेतोड उत्तर
दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त
गेल्या काही दिवसांपासून झेद दरबार आणि गौहर खान एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त आहे. अजूनही दोघांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरीही. गौहरच्या लॉकडाऊनमधील वाढदिवसालाही झेद हजर होता. केवळ हजर नव्हता तर तिचा वाढदिवस अधिक स्पेशलही झेदने बनवला. झेद दरबार हा संगीत दिग्दर्शिक इस्माईल दरबार यांचा मुलगा असून गौहरपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. पण प्रेमाला अर्थातच वय नसतं हे आतापर्यंत अनेक जोड्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. तसंच दोघांच्याही सोशल मीडिया अकाऊंट्सवर एकमेकांचे खूप फोटो पाहायला मिळतात. त्यामुळे गौहर आणि झेद आता कधी लग्नाची गोड बातमी देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी लग्न केले आहे. त्यामुळे गौहरही आता झेदबरोबर लग्नाच्या बेडीत अडकणार का? असा प्रश्नही चाहत्यांना आता पडला आहे. झेदच्या आधी गौहर कुशाल टंडनला डेट करत होती. बिग बॉसमध्येच दोघांची ओळख झाली होती. मात्र त्यांचं हे नातं टिकू शकलं नाही. पण तरीही हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र असून सामंजस्याने वेगळे झाले आहेत.
आई झाल्यावर या अभिनेत्रींनी केला बॉलीवूडमध्ये दमदार कमबॅक
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा