ADVERTISEMENT
home / मनोरंजन
एक महिन्यातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने केले ब्रेकअप, कारण जाणून वाटेल आश्चर्य

एक महिन्यातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने केले ब्रेकअप, कारण जाणून वाटेल आश्चर्य

‘बिग बॉस’मधील स्पर्धक हे घरात असताना आणि त्यानंतरही कायम चर्चेत असतात. त्यापैकी पुन्हा एकदा मागच्या महिन्यात चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजेजसलीन माथरू. काही दिवसांपूर्वी पारस छाब्राच्या स्वयंवरमध्ये सहभागी झालेली जसलीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती आयुष्याचा जोडीदार मिळाला म्हणून. जसलीनला इतक्या सगळ्या शोधानंतर आता आपल्या आयुष्याचा खरा जोडीदार सापडला असल्याचा तिने खुलासा केला होता. मात्र आता एक महिन्यातच अभिनेत्री आणि गायिका असणाऱ्या जसलीनने आपला बॉयफ्रेंड डॉ. अभिनीत गुप्ता यासह ब्रेकअप केल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच भोपाळच्या कॉस्मेटिक सर्जन अभिनीतला आपण डेट करत असल्याचं जसलीननं मान्य केलं होतं मात्र आता स्वभाव जुळत नसल्याने ब्रेक अप करत असल्याचं सांगितलं आहे. 

‘बिग बॉस’फेम अभिनेत्रीला मिळाला आयुष्याचा जोडीदार, केला खुलासा

कारण ऐकून वाटेल आश्चर्य

जसलीनने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की अभिनीतसह तिने ब्रेकअप केले आहे. मात्र याचे कारण समजल्यावर नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ‘हो आमचं लग्न झालं नव्हतं. वास्तविक आमची कुंडली जुळत नाही. माझ्या आई-वडिलांना लग्नाच्या बाबतीत कुंडलीवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या इच्छेच्या विरूद्ध जाऊन मी काहीही करणार नाही. आईवडिलांना कोणताही तणाव मला द्यायचा नाही. तसंच या दरम्यान आमच्या दोघांच्या विचारातही खूप तफावत असल्याचे मला जाणवले म्हणून ब्रेकअप केले’ असं जसलीनने सांगितले आहे. अभिनीत आणि त्याच्या पूर्वपत्नीची सध्या न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे हेदेखील एक कारण असल्याचं तिने पुढे सांगितलं, ‘त्या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया चालू असून घटस्फोट होण्यास बराच वेळ लागेल. तसंच आमच्या दोघांचा कोणताही ताळमेळ बसत नाही.  आम्ही दोघे एकमेकांसाठी योग्य नाही असं मला वाटतं’. अचानक एक महिन्यात जसलीनने ब्रेकअप केल्याने तिच्या चाहत्यांमध्येही नाराजी पसरली आहे. 

बिग बॉसच्या स्पर्धकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडे केली तक्रार

ADVERTISEMENT

अनुप जलोटांनी घडवली होती भेट

जसलीनची अभिनीत गुप्ताशी ओळख ही तिचे गुरू अनुप जलोटा यांच्यामार्फतच झाली. अनुप जलोटा यांनीच या दोघांची भेट घालून दिली होती. त्यानंतर या दोघांची ओळख वाढली. मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या काळात दोघांमधील जवळीक जास्त वाढली आणि दोघे एकमेकांच्या संपर्कात जास्त आले. जसलीनची अभिनीतशी पहिली ओळख ही भोपाळमध्येच झाल्याचे तिने स्पष्ट केले होते. जसलीन काही महिन्यांपूर्वी पारस छाब्राच्या स्वयंवरमध्येही सहभागी झाली होती. मात्र यामध्ये ती टिकू शकली नाही. तर त्याआधी अनुप जलोटाची गर्लफ्रेंड म्हणून तिने बिग बॉस गाजवले होते. 

एका नामांकित वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जसलीनने सांगितले होते की, ‘मी मनात जशी छबी तयार केली होती अभिनीत तसाच आहे. तुम्ही जेव्हा फोनवर कोणाशी बोलता तेव्हा ती व्यक्ती वेगळी असते आणि तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला व्यक्तीगत जाऊन भेटतात तेव्हा ती व्यक्ती कशी आहे ते तुम्हाला कळतं. अभिनीत जसा फोनवर बोलत होता तो व्यक्तीगत आयुष्यातही तसाच आहे.’ मात्र आता एक महिन्यातच ब्रेकअप करून पुन्हा एकदा जसलीन सिंगल झाली आहे. जसलीन सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. याआधी काही महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांना धमक्यांचा फोन आल्यामुळेही जसलीन चर्चेत होती. तर सुरुवातीपासूनच तिचं नाव सतत कोणाशी ना कोणाशी जोडले जात आहे. आता अभिनीतनंतर पुन्हा जसलीनच्या आयुष्यात  कोण येणार या नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. 

अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड म्हणवणाऱ्या जसलीन मथारुने शेअर केले हॉट फोटो

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

ADVERTISEMENT
19 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT