हिंदीमधील सुप्रसिद्ध असा रिअॅलिटी शो बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. पण यंदा हा शो टीव्हीवर नाही तर OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. याची घोषणा नुकतीच सलमान खानने ईदच्या मुहूर्तावर केली आहे. गेली दोन वर्ष मनोरंजन इंडस्ट्रीला बसला आहे. या इंडस्ट्रीला तारण्याचे काम सध्या करत आहेत. त्यामुळेच की काय आता हा एवढा मोठा रिअॅलिटी शो असून देखील त्याने OTT वर येण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती
साऊथ अभिनेत्री नयनताराचा बॉलीवूड डेब्यू, शाहरूखसोबत झळकणार
लवकरच सुरु होणार बिग बॉस
बिग बॉस रिअॅलिटी शो हा येत्या 8 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची घोषणा सलमान खानने केली आहे. बिग बॉसचा यंदाचा 15 सीझन असणार आहे. त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. हा शो कधी सुरु होणार असा प्रश्न पडलेला असताना आता हा शो OTT वर सुरु होणार असल्यामुळे आता हा शो कधीही आणि कुठेही फोनवर पाहता येणार आहे. OTTचा फायदा असा असतो की, त्यावर टीव्हीच्या आधी तुम्हाला अनसीन अशा गोष्टी पाहता येणार आहे. सध्या या शोचे काही प्रोमोज बाहेर येत आहे. हे प्रोमोज पाहिल्यांनतरच या गोष्टीची माहिती समोर आलेली आहे.
आदित्य नारायणकडे येणार नवा पाहुणा, घेणार ब्रेक दिला इशारा
सेलिब्रिटींची यादी जाहीर नाही
बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी येणार आहेत. याची माहितती अद्याप कोणीही दिलेली नाही. पण नावांची एक भलीमोठी यादी समोर आली होती. यामध्ये खूप जणांच्या नावांचा समावेश होता. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे सतत चर्चेत असलेली रिया चक्रवर्तीदेखील यामध्ये येणार असल्याचे सांगितले जात आहे. पण अद्याप ही यादी जाहीर न केल्यामुळे अनेकांच्या मनात सेलिब्रिटी यादींची उत्सुकता आहे. पण या नव्या सीझनमध्ये कपल्स येणार असल्याचे सांगितले जात आहे. गेला सीझन हा चांगलाच गाजला होता. या सीझनमधील अनेक सेलिब्रिटींची आजही चर्चा होत असते. राहुल वैद्यला देखील यामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. शेवटच्या सीझनच्या शेवटपर्यंत राहुल वैद्य आणि रुबिना दिलैक गेले होते. पण शेवटी मतामध्ये रुबिना दिलैकने बाजी मारत तो सीझन जिंकला खरा. पण राहुल हा चाहत्यांसाठी व्हिनर होता.
अटकेत असलेल्या राज कुंद्रावर सेलिब्रिटींच्या उमटत आहेत प्रतिक्रिया
मराठी बिग बॉसची लवकरच
मराठी बिग बॉसची देखील गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा केली जात आहे. मराठीमध्ये देखील अनेक सेलिब्सच्या नावाची चर्चा होत आहे. अनेक मोठे कलाकार यामध्ये सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. याची एक यदी देखील समोर आली आहे. पण अद्याप त्या यादीवरही कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे आता मराठी बिगबॉस कधी सुरु होईल हे देखील स्पष्ट झालेले नाही.