ADVERTISEMENT
home / बिग बॉस
akshay-waghmare

Bigg Boss Marathi: अक्षय वाघमारे करणार मरणोत्तर अवयव दान

बिग बॉस मराठी सीजन ३ (Bigg Boss Marathi 3) च्या दुसऱ्या आठवड्याला सुरूवात होताच स्पर्धकांमध्ये परस्परांविरूद्ध शाब्दिक टशन दिसू लागली आहे. बुद्धीचातुर्य आणि शक्तीच्या या खेळात अनेकांनी घातलेले सभ्यतेचे मुखवटे आता गळून पडले असून, त्यांचे खरे चेहरे बाहेर आले आहेत. मात्र, यामध्ये अक्षय वाघमारे (Akhay Waghmare) हा एकमेव सदस्य अपवाद ठरला. घरात वावरताना असो वा टास्क दरम्यान असो अक्षयने आपला संयम कधीच ढासळू दिला नाही. त्याचा हा संयमीपणा चाहत्यांना आवडत असून ख-या आयुष्यात ही तो तितकाच नम्र आणि संवेदनशील असल्याचं त्याच्या एका कृतीतून दिसून आलं आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अक्षयने मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi : ही जोडी तुटायची नाय…. विशाल-विकासची मैत्री सगळ्यांना आवडणारी

अक्षय करणार अवयवदान 

याबाबत, संबंधित संस्थेकडे त्याने मरणोत्तर अवयवदानाचे संमतीपत्र भरून देखील दिले आहे! त्या संमती पत्रानुसार तो मृत्यूनंतर फुफ्फुस, मुत्रपिंड, स्वादुपिंड, किडनी आणि त्वचा दान करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे,  याबद्दल खूपच कमी जणांना माहिती आहे. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक तर होत आहे, पण त्याबरोबरच त्याने केवळ बिग बॉसच्या घरात नाही तर सर्व चाहत्यांच्या हृदयात आपली जागा मिळवली आहे! बिगबॉस मराठीच्या घरात, आपल्याहून वयाने मोठे असलेल्या सदस्यांचा तो नेहमी आदर करताना दिसून येत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांच्या गुडबुक्स मध्ये तो आला असून, पुढे तो कोणती स्ट्रॅटर्जी वापरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे! तसंच अक्षयचा सध्या गेमही प्रेक्षकांना आवडत आहे. आपल्या वागण्याने तो सर्वांची मनं जिंकून घेत आहे. दरम्यान विशाल निकम (Vishhal Nikam) आणि अक्षयमधील भांडण व्हायला नको होतं असं प्रेक्षकांनाही वाटत आहे.

अधिक वाचा – आदिश वैद्यने का सोडली चांगली टीआरपी असणारी हिंदी मालिका

ADVERTISEMENT

व्यवसायाने मॉडेल 

अक्षय वाघमारे हा व्यवसायाने मॉडेल असून त्याचा 1988 मध्ये मुंबईत जन्म झाला आहे. मुंबईतच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले असून कॉम्प्युटर सायन्समध्ये त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुण्यातून मास्टर्स पूर्ण केले. 2019 मध्ये अक्षय वाघमारेला ‘हॉटेस्ट मॅन ऑफ द मराठी टीव्ही’ असा किताबही मिळाला आहे. तर अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळी यांची मुलगी योगिता गवळी हिच्याबरोबर अक्षयने 2020 मध्ये लग्न केले. काही महिन्यांपूर्वीच अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. इंडस्ट्रीमध्ये आपले नाव व्हावे यासाठी अक्षयने मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी होण्याचे ठरवले असून आता अक्षय होणाऱ्या टास्कमध्ये आपले 100 टक्के देताना दिसून येत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये अक्षयची क्रेझ वाढत चालल्याचे दिसून येत आहे. संयमी आणि हवं तिथेच बोलणारा अक्षय सर्वांनाच त्यामुळे आवडत आहे. तर त्याने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दादा कोंडके यांची तिसरी पिढी अर्थात त्यांचा नातू म्हणून असणारी ओळख फारच कमी वेळात पुसून काढत अक्षयने आपली अशी ओळख निर्माण केली आहे. आता बिग बॉसमध्ये अक्षय कुठपर्यंत मजल मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

अधिक वाचा – अभिनेत्री धनश्री काडगावकरचा कमबॅक, या मालिकेतून येणार प्रेक्षकांसमोर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT