ADVERTISEMENT
home / मनोरंजन
jay-dudhane-and-meera-jagannath-released-new-album

मीरा जगन्नाथ, जय दुधाणे बिग बॉसनंतर पहिल्यांदाच एकत्र

बिग बॉस (Bigg Boss Marathi 3) या रिअॅलिटी शोचा उपविजेता जय दुधाणे (Jay Dudhane) आणि याच शोधमील स्पर्धक असलेली अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र आले आहेत. “जोडी दोघांची दिसते चिकनी” (Jodi Doghanchi Diste Chikani) हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच झाला आहे. सप्तसूर म्युझिकच्या “जोडी दोघांची दिसते चिकनी” म्युझिक व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच ही जोडी काम करत आहे.  सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी “जोडी दोघांची दिसते चिकनी” या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. तर बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या नव्या दमाच्या गायकांनी हे गाणं गायलं आहे. राजेंद्र वैद्य कल्याणकर यांच्या शब्दांना  अमेय मुळे यांनी स्वरसाज चढवला आहे. जोडी दोघांची दिसते चिकनी, कोलीवाऱ्याची राजा नी राणी असे शब्द असलेलं हे गाणं अतिशय श्रवणीय आहे. सहजपणे ओठी रुळणारे आणि उडती चाल ही गाण्याची वैशिष्ट्यं आहेत. 

अधिक वाचा – लता मंगेशकर यांची मराठी भावगीत | Lata Mangeshkar Marathi Songs

जय आणि मीराची मैत्री बाहेरही कायम 

एमटीव्हीवरच्या स्प्लिट्सव्हिला (Splitsvilla) या रिअॅलिटी शोच्या तेराव्या सीझनमधून जय दुधाणे प्रकाशझोतात आला. देखणा आणि उत्तम शरीरयष्टी असलेल्या या अभिनेत्यानं बिगबॉसच्या अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद मिळवलं. तर मीरानं ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकातून आपला अभिनय प्रवास सुरू केला. बिग बॉसमध्ये मीराचाही समावेश होता. बिग बॉसचा सीझन संपल्यानंतर मीरा आणि जय पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओतून एकत्र झळकले आहेत.  साईनाथ राजाध्यक्ष निर्मित “तुझी माझी यारी” या प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या वेबसिरीजमध्ये मीरा जगन्नाथ ने मुख्य भूमिका केली आहे. तर आता पहिल्यांदाच ही जोडी अल्बममध्येही एकत्र काम करत आहेत. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर दोघेही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहेत. याशिवाय दोघेही आपल्या चाहत्यांबरोबरही सतत संवाद साधत असतात. त्यामुळे आता या दोघांनाही एकत्र बघून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद वाटत असणार. 

अधिक वाचा – या कारणामुळे लता मंगेशकर राहिल्या अविवाहित

ADVERTISEMENT

गाण्यातील मराठमोळा साज 

Jay Dudhane and Meera Jagannath

या गाण्यामध्यो मीरा आणि जय दोघांचाही मराठमोळा साज दिसून येत आहे. जय दिसायला देखणा असल्याने या व्हिडिओमध्येही अगदी हिरोप्रमाणेच दिसत आहे. तर मीराही त्याला शोभून दिसत आहे. दोघांचीही जोडी ही अगदी नावाप्रमाणे चिकनी दिसत असते. या व्हिडिओला प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत असलेला सोशल मीडियावर दिसून येत आहे. तर अनेकांनी या जोडीने एखादी मालिका अथवा चित्रपट एकत्र करावा अशाही कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे आता पुढे कोणत्या प्रोजेक्टमध्ये हे दोघे एकत्र दिसणार अथवा जय आणि मीराचे अगदी वैयक्तिकही कोणते नवे प्रोजेक्ट असणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे डोळे लागून राहिले आहेत. तर जय आणि उत्कर्षला पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर आहेत. जय – उत्कर्ष आणि अक्षय वाघमारे ही तिगडीदेखील कमाल असल्याने त्यांच्या कामाकडेही आता सर्वांचे लक्ष असून उत्सुकता आहे. 

अधिक वाचा – भारताचा ‘सूर’ हरपला, लता मंगेशकर यांचे निधन

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT